Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! २३८ एसी लोकलची निर्मिती आता रेल्वेच्या ३ कारखान्यांत; २०२७ पासून रेक मिळणार

मुंबईच्या लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. २३८ एसी लोकल रेक उपलब्ध करून देण्यासाठी खासगी कंत्राटदाराची निविदा रद्द करण्यात आली असून, आता भारतीय रेल्वेच्या तीन कारखान्यांमध्ये या रेकची निर्मिती केली जाणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 13, 2026 | 11:16 AM
मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! २३८ एसी लोकलची निर्मिती आता रेल्वेच्या ३ कारखान्यांत; २०२७ पासून रेक मिळणार

मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! २३८ एसी लोकलची निर्मिती आता रेल्वेच्या ३ कारखान्यांत; २०२७ पासून रेक मिळणार

Follow Us
Follow Us:
  • चेन्नई, कपूरथळा आणि रायबरेलीतील रेल्वे कारखान्यांत २३८ एसी रेक तयार होणार.
  • २०२७ पासून एसी लोकल रेक ताफ्यात दाखल होण्यास सुरुवात होणार.
  • नवीन एसी लोकल आल्या तरी नॉन-एसी लोकल सेवा बंद केली जाणार नाही.
मुंबई लोकलची प्रवासी क्षमता वाढविण्यासाठी पायाभूत सुविधांची कामे सुरू असतानाच एसी लोकल रेक वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनने (एमआरव्हीसी) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २३८ एसो रेकच्या बांधणीसाठी खासगी कंत्राटदारासाठी काढलेली निविदा रद्द करून आता भारतीय रेल्वेच्या तीन उत्पादन कारखान्यांत या रेकची समांतर निर्मिती केली जाणार आहे. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी, कपूरथळा येथील रेल कोच फॅक्टरी आणि रायबरेलीतील मॉडर्न कोच फॅक्टरी येथे रेकची बांधणी होईल. २०२७ पासून रेक उपलब्ध होण्यास सुरुवात होऊन २०३० पर्यंत सर्व २३८ रेक ताफ्यात दाखल करण्याचे नियोजन आहे, ही माहिती एमआरव्हीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास एस. वाडेकर यांनी बुधवारी (१२ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत दिली. खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून रेक उपलब्ध करून घेण्यास अपेक्षेपेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता होती. निविदा प्रक्रियेनंतर पहिला रेक तयार करून त्याच्या चाचण्या पूर्ण करण्यासाठी सुमारे तीन वर्षांचा कालावधी लागला असता.

Mumbai News: सिटी पार्कच्या वापराबाबत पुन्हा वाद! नागरिकांसाठीच्या उद्यानाचा बांधकाम साहित्य साठवणुकीसाठी केला जातोय वापर

एसीसोबत नॉन-एसी लोकलही सुरू राहणार

सर्व लोकल एसी करण्याचा सध्या कोणताही स्वतंत्र निर्णय झालेला नाही. सध्या मुंबई उपनगरीय रेल्वेकडे २८५ रेक असून, त्यापैकी २३ एसी आणि २६२ नॉन-एसी रेक आहेत. नवीन २३८ एसी रेक ताफ्यात दाखल झाल्यानंतर नॉन-एसी रेक तातडीने सेवेतून हटविले जाणार नाहीत. त्यामुळे एसी आणि नॉन-एसी अशा दोन्ही प्रकारच्या लोकल सेवा सुरू राहणार असल्याचे वाडेकर यांनी म्हटले आहे.

३ कारखान्यांत रेकची होतोय समांतर बांधणी

मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी २३८ अतिरिक्त एसी रेकला यापूर्वी मंजुरी देण्यात आली होती. त्यासाठी खासगी कंत्राटदारामार्फत रेकची बांधणी करण्याची निविदा काढण्यात आली होती, मात्र, निविदा प्रक्रियेतून रेक उपलब्ध होण्यास लागणारा कालावधी लक्षात घेता अपेक्षित वेळेत रेक उपलब्ध होणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे खासगी निविदा रद्द करून आयसीएफ, चेन्नई: आरसीएफ, कपूरथळा आणि एमसीएफ, रायबरेली या तीन कारखान्यांमध्ये एकाच वेळी रेकची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्पादन क्षमता तीन ठिकाणी विभागल्यामुळे रेक टप्प्याटप्प्याने उपलब्ध होतील, असे सांगण्यात आले आहे.

पायाभूत सुविधा, रेकची सांगड

पनवेल-कर्जत, ऐरोली-कळवा, बोरीवली-विरार, कल्याण-बदलापूर, कल्याण-कसारा, बदलापूर-कर्जत आणि आसनगाव-कसारा या मार्गावरील कामांचा त्यात समावेश आहे. १५ फलाटांची लांबी डब्याच्या लोकलसाठी वाढविण्याची कामेही सुरू आहेत. पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण होत असताना त्यासाठी रेक उपलब्ध असणे महत्वाचे आहे.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास एस म्हणाले, “6 खासगी कंत्राटदारासाठी काढलेली निविदा रद्द करून भारतीय रेल्वेच्या तीन उत्पादन कारखान्यांमध्ये २३८ एसी रेकची समांतर बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे २०२७पासून रेक उपलब्ध होण्यास सुरुवात होऊन २०३० पर्यंत संपूर्ण ताफा उपलब्ध होईल. पायाभूत सुविधा आणि रेकची उपलब्धता यांचा ताळमेळ साधून प्रवाशांना त्याचा लाभ लवकर मिळवून देणे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे”.

मोठी बातमी ! राज्यातील 1.80 कोटी मतदारांची नावे वगळणार? अनेकांची नावे अद्याप डिजिटलाईज नाही

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव – मुंबईची लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. मुंबईसाठी २३८ वातानुकूलित लोकलला भारत सरकारने मंजुरी दिली आहे. या लोकलच्या खरेदीसाठी यापूर्वी अवलंबिलेल्या प्रक्रियेत अनेक अडचणी येत होत्या आणि अपेक्षित वेळापत्रकही मान्य नव्हते. त्यामुळे आता नवीन निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय रेल्वेच्या आयसीएफ, आरसीएफ आणि एमसीएफ या तीन उत्पादन कारखान्यांमध्ये या वातानुकूलित लोकलची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे २०२७ पर्यंत पहिली वातानुकूलित लोकल उपलब्ध होऊ शकेल.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mumbai local 238 ac local trains railway factories 2027

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • Indian Railway
  • Local train Mumbai
  • Mumbai News

संबंधित बातम्या

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार
1

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले
2

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
3

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
4

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.