Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक वाचा

मुंबईत उद्या रेल्वेच्या तिन्ही हार्बर, वेस्टर्न आणि सेंट्रल मार्गावर मेगाब्लॉकघेतला जाणार आहे. त्यामुळे मुबंईकरांनी उद्या घराबाहेर पडताना रेल्वेचे वेळापत्रक पाहून घराबाहेर पडावे, असं आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असल्याने उद्या मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 21, 2024 | 09:05 AM
मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक वाचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक वाचा

Follow Us
Follow Us:

Mumbai local mega Block Update: मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनी कृपया इकडे लक्ष द्या. उद्या रविवारी 22 सप्टेंबर रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनी लोकलचे वेळापत्रक तपासूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे. उद्या रविवारी देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी आणि तांत्रिक कारणांमुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहे. तसेच काही गाड्या उशीराने धावणार आहे.

हेदेखील वाचा- तीन महिन्याचे वेतन काढण्यासाठी मागितली 40 हजार रुपयांची लाच, उप शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

उद्याच्या रेल्वे मेगाब्लॉकबाबत रेल्वे प्रशासनाने माहिती दिली आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या अभियांत्रिकी व देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. आज शनिवारी मध्यरात्री १२ ते उद्या सकाळी १० पर्यंत हा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवासासाठी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी आणि रेल्वेच्या वेळापत्रकावर लक्ष द्यावे. मेगाब्लॉक दरम्यान अनेक गाड्या रद्द केल्या जातील तर काही गाड्या उशीराने धावणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे धीम्या मार्गावरील लोकल सेवा मुलुंड – कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या मार्गावरील लोकल ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकावर थांबवण्यात येणार आहे. तर ठाकुर्ली, कोपर या स्थानकांत लोकलला थांबा नसेल.

हेदेखील वाचा- कुडाळमध्ये पालकमंत्री चषक कॅरम स्पर्धेचे आयोजन, २५० स्पर्धक होणार सहभागी

हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला व वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – पनवेल, बेलापूर, वाशी अप व डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तसेच मेगाब्लॉक काळात सीएसएमटी, कुर्ला व पनवेल वाशी या मार्गावर नागरिकांसाठी विशेष लोकल चालवली जाणार आहे. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे, वाशी, नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव व कांदिवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर आज मध्यरात्री १२ ते रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत सर्व अप धीम्या मार्गावरील लोकल बोरिवली ते गोरेगावदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल अंधेरी येथून डाऊन जलद मार्गावर धावणार आहेत. मेगाब्लॉक कालावधीत लोकल गोरेगाव स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर ७ वर थांबणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Web Title: Mumbai local train news mega block on harbour western and central line on sunday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2024 | 09:05 AM

Topics:  

  • Mumbai Local

संबंधित बातम्या

Mumbai: ठाणे-मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठ्या मागण्या; ४८ प्रवासी संघटनांची रविंद्र चव्हाणांसोबत बैठक
1

Mumbai: ठाणे-मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठ्या मागण्या; ४८ प्रवासी संघटनांची रविंद्र चव्हाणांसोबत बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.