Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये संतापजनक प्रकार! पुरुष प्रवाशाची महिलेला बेल्टने मारहाण; सहप्रवासी मात्र बघ्याच्या भूमिकेत

Mumbai Local Train: मुंबई लोकलच्या जनरल डब्यात एका महिलेला पुरुष प्रवाशाने मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सीटवर झोपल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर आरोपीने महिलेला मारहाण करत बेल्टचा धाक दाखवल्याची घटना समोर आली. या घटनेदरम्यान इतर सहप्रवासी शांत बसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 07, 2026 | 01:16 PM
मुंबई लोकलमध्ये संतापजनक प्रकार! पुरुष प्रवाशाची महिलेला बेल्टने मारहाण; सहप्रवासी मात्र बघ्याच्या भूमिकेत

मुंबई लोकलमध्ये संतापजनक प्रकार! पुरुष प्रवाशाची महिलेला बेल्टने मारहाण; सहप्रवासी मात्र बघ्याच्या भूमिकेत

Follow Us
Follow Us:
  • पुरुष प्रवाशाकडून महिलेला मारहाण
  • सहप्रवासी मात्र बघ्याच्या भूमिकेत; सोशल मीडियावर संताप
  • मुंबई लोकलमधील धक्कादायक घटना
Mumbai Local Train Video Viral: मुंबईतील लोकल ट्रेनमधील (Mumbai Local) सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झालेल्या एका व्हिडिओमध्ये जनरल डब्यात पुरुष प्रवासाकडून महिलेला मारहाण केल्याचं दिसून येत आहे. या धक्कादायक व्हायरल व्हिडीओनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला आहेत. तसेच या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Mumbai Local: ठाणे स्थानकावर महिलांच्या डब्यात सापाची अफवा; 12 मिनिटे लोकल ठप्प, प्रवाशांमध्ये घबराट

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला जनरल डब्यातील एका सीटवर झोपली होती. याच कारणावरून त्याच डब्यातील एका पुरुष प्रवाशाशी वाद झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि संबंधित व्यक्तीने महिलेला थपडा मारत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता त्याने कमरेचा बेल्ट काढून महिलेला मारण्याची धमकीही दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

 

या संपूर्ण प्रकारादरम्यान डब्यात अनेक पुरुष प्रवासी उपस्थित होते. मात्र, कोणीही पुढे येऊन महिलेला मदत करण्याचा किंवा आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला नसल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर केवळ आरोपीवरच नव्हे, तर बघ्याची भूमिका घेणाऱ्या सहप्रवाशांवरही टीका होत आहे.

सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून नेमकी ही घटना कोणत्या लोकल ट्रेनमध्ये आणि कोणत्या मार्गावर घडली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, व्हिडिओच्या आधारे संबंधित आरोपीची ओळख पटवून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी रेल्वे पोलीस तपास सुरू करण्याची शक्यता आहे.

गेल्या काही महिन्यांत मुंबई लोकलमध्ये प्रवाशांमधील वाद, हाणामाऱ्या आणि जीवघेण्या हल्ल्यांच्या घटना समोर आल्या आहेत. या नव्या घटनेमुळे लोकलमधील सुरक्षा, प्रवाशांची जबाबदारी आणि रेल्वे पोलिसांच्या गस्तीसंदर्भातील प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Mumbai Local मध्ये महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय! महिलांचा डबा ओळखणे होणार सोपे; ‘पिंक स्टॉपिंग पॉइंट’चा प्रस्ताव

Web Title: Mumbai local train woman assaulted in mens coach viral video raises safety concerns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • Mumbai
  • Mumbai Local
  • viral video

संबंधित बातम्या

IIT Bombay Student Death: IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित
1

IIT Bombay Student Death: IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित

Ganesh Festival 2026: गणपतीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास धक्का धक्कीचा; रेल्वे फुल्ल, एसटी आरक्षणासाठीही धावपळ
2

Ganesh Festival 2026: गणपतीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास धक्का धक्कीचा; रेल्वे फुल्ल, एसटी आरक्षणासाठीही धावपळ

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
3

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
4

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.