Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime News: विश्वासघातकी कर्मचारी निघाले चोर! दिवाळी साफसफाईसाठी बोलावलेल्या तरुणांनी साफ केले महिलेचे कपाट!

Mumbai Crime News: दिवाळीच्या साफसफाईसाठी ऑनलाईन ॲपवरून होम क्लिनिंग सर्व्हिस बोलावणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. मालाड पश्चिम येथील घरातून साफसफाईच्या बहाण्याने १२ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना मालाड पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 02, 2026 | 03:08 PM
Mumbai Crime News: विश्वासघातकी कर्मचारी निघाले चोर! दिवाळी साफसफाईसाठी बोलावलेल्या तरुणांनी साफ केले महिलेचे कपाट!

Mumbai Crime News: विश्वासघातकी कर्मचारी निघाले चोर! दिवाळी साफसफाईसाठी बोलावलेल्या तरुणांनी साफ केले महिलेचे कपाट!

Follow Us
Follow Us:
  • ऑनलाईन कामगारांनी साफसफाईदरम्यान १२ लाखांचे दागिने लांबवले
  • मालाड पोलिसांनी तांत्रिक तपासाने तिघांना बेड्या ठोकल्या
  • पोलिसांनी सर्व ऐवज पूर्णपणे हस्तगत केला
Mumbai Crime News: दिवाळीच्या साफसफाईसाठी ऑनलाईन ॲपद्वारे होम क्लिनिंग सर्व्हिस बूक करणे एका ५२ वर्षीय महिलेला चांगलेच महागात पडले आहे. घराची साफसफाई करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनीच संधी साधून घरातील सोन्या-चांदीचे दागिने लांबवल्याची खळबळजनक घटना मालाड पश्चिम परिसरात घडली आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी तांत्रिक तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही दिवसांत तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत, तसेच त्यांच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.

हेही वाचा: Mumbai Nurse Suicide Case: पती डॉक्टर, पत्नी नर्स अन् संसारात तिसरीची एन्ट्री! मुंबईतील खळबळजनक प्रकरण उघड…

नेमकी काय घडली घटना?

मालाड पश्चिम येथे राहणाऱ्या ५२ वर्षीय महिलेने दिवाळीनिमित्त घराची साफसफाई करण्यासाठी ‘होम ट्रँगल’ या ऑनलाईन ॲपवरून होम क्लिनिंग सर्व्हिस बूक केली होती. या सर्व्हिसनुसार चार कर्मचारी त्या महिलेच्या घरी साफसफाईचे काम करण्यासाठी आले होते. हे कर्मचारी काम संपवून निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी संबंधित महिलेने बेडरूममधील कपाटात ठेवलेले दागिने तपासले असता, तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

कपाटातील ५० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, १० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, सोन्याचे बिस्किट आणि ५०० ग्रॅम वजनाची चांदीची वीट असा एकूण अंदाजे १२ लाख रुपयांचा ऐवज गायब असल्याचे तिच्या निदर्शनास आले. यानंतर घाबरलेल्या महिलेने तात्काळ मालाड पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात चोरांविरोधात चोरीची तक्रार दाखल केली.

हेही वाचा: Mugdha Murder Mystery: घरच्यांपासून लपवून गहुंजेच्या आलिशान सोसायटीत वास्तव्य; लंडनहून आलेल्या तरुणीचा दुर्दैवी अन् रहस्यमय अंत!

पोलिसांची धडक कारवाई; पालघर-वसईतून आरोपी जेरबंद

तक्रार दाखल झाल्यानंतर मालाड पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे होम क्लिनिंगसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती गोळा केली. तपासादरम्यान संबंधित आरोपी वारंवार आपले मोबाईल फोन बंद करून वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले, ज्यामुळे संशय बळावला.

मालाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमर शिंदे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत नालासोपारा, वसई आणि पालघर परिसरातून दोन आरोपींना ताब्यात घेतले, तर मुख्य आरोपीला बोईसर येथून पकडण्यात आले. सखोल चौकशीदरम्यान सत्यम राजेश शुक्ला (२६), अनिश ब्रिजभूषण चौरसिया (१८) आणि पवन ओमप्रकाश धीवर उर्फ राहुल गौड (२६) या तिघांनीच मिळून हा चोरीचा कट रचल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेला १०० टक्के मुद्देमाल यशस्वीरित्या हस्तगत केला आहे. या प्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे आणि कशी घडली?

    Ans: मालाड पश्चिम येथे दिवाळी साफसफाईसाठी ऑनलाईन ॲपद्वारे बोलावलेल्या कर्मचाऱ्यांनी घरातील दागिन्यांची चोरी केली.

  • Que: चोरांनी किती लाखांचा मुद्देमाल लांबवला होता?

    Ans: चोरांनी ५० ग्रॅम सोन्याचा नेकलेस, मंगळसूत्र, सोन्याचे बिस्किट आणि ५०० ग्रॅम चांदीची वीट असा एकूण सुमारे १२ लाख रुपयांचा ऐवज चोरला होता.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: मालाड पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे नालासोपारा, वसई, पालघर व बोईसर येथून ३ आरोपींना अटक करून १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला.

Web Title: Mumbai malad news online home cleaning workers arrested for stealing gold jewelry sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • Gold Jewellery
  • Mumbai crime news
  • Theft Case

संबंधित बातम्या

Minor Girl Suicide Case: पहाटे १:५३ वाजता उघडकीस आला थरार; कांदिवलीत उच्चभ्रू इमारतीत अल्पवयीन मुलीची आत्महत्या!
1

Minor Girl Suicide Case: पहाटे १:५३ वाजता उघडकीस आला थरार; कांदिवलीत उच्चभ्रू इमारतीत अल्पवयीन मुलीची आत्महत्या!

Auto Rickshaw Theft: चोरीची रिक्षा अन्‌ चोरांचा धागादोरा नव्हता, मात्र ‘तांत्रिक विश्लेषणाने’ कुळगाव पोलिसांनी केले जेरबंद!
2

Auto Rickshaw Theft: चोरीची रिक्षा अन्‌ चोरांचा धागादोरा नव्हता, मात्र ‘तांत्रिक विश्लेषणाने’ कुळगाव पोलिसांनी केले जेरबंद!

Dhanteras Gold Investment Offer : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर! 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 25% जास्त सोनं
3

Dhanteras Gold Investment Offer : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर! 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 25% जास्त सोनं

Dhanteras Gold Investment Offer : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर!1 लाखांच्या गुंतवणुकीवर 25% जास्त सोनं; जाणून घ्या भन्नाट ऑफर
4

Dhanteras Gold Investment Offer : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर!1 लाखांच्या गुंतवणुकीवर 25% जास्त सोनं; जाणून घ्या भन्नाट ऑफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.