Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

Mumbai News : सातरस्ता येथील BIT चाळीचा पुनर्विकास 13 वर्षांपासून रखडल्याचा आरोप करण्यात आला आहे. 324 कुटुंबांना घरे मिळाली नसल्याचा दावा करत संध्या दोषींनी पालिका प्रशासनाला धारेवर धरलं.

  • By विवेक
Updated On: Sep 29, 2026 | 10:11 PM
saatrasta BIT

saatrasta BIT

Follow Us
Follow Us:
  • सातरस्ता BIT चाळीतील 324 कुटुंबे 13 वर्षांपासून बेघर असल्याचा दावा.
  • विकासक आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये संगनमत असल्याचा संध्या दोषींचा आरोप.
  • न्याय न मिळाल्यास रहिवाशांसोबत नवरात्रीत उपोषण करण्याचा इशारा.
 

Mumbai News : सातरस्ता येथील बी.आय.टी. (BIT) चाळीच्या रखडलेल्या पुनर्विकासावरून शिवसेना (शिंदे गट) नगरसेविका संध्या दोषी यांनी मुंबई महानगरपालिकेत इस्टेट विभागाच्या (मालमत्ता विभाग) अधिकाऱ्यांवर आणि विकासकांवर जोरदार हल्लाबोल केला. विकासक आनंद विलायनूर आणि जैसल अजमेरा यांनी पालिका अधिकाऱ्यांशी संगनमत करून ३२४ मराठी कुटुंबांना १३ वर्षांपासून बेघर ठेवल्याचा व त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. न्याय न मिळाल्यास आगामी नवरात्रीत रहिवाशांसोबत उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला.

सभागृहात उपस्थित केलेल्या हरकतीच्या मुद्द्यामध्ये संध्या दोषी यांनी निदर्शनास आणून दिले की, बी.आय.टी. चाळ क्र. १ ते ४ च्या पुनर्विकासाचे काम ‘आनंद विल्लनूर’ या विकासकाकडे आहे. गेल्या १३ वर्षांपासून हा प्रकल्प रखडला असून, विकासकाने ३२४ भाडेकरूंना हक्काची घरे दिलेली नाहीत. शिवाय, त्यांचे ३८ कोटी रुपयांचे मासिक भाडे आणि १५.७ कोटी रुपयांचा कॉर्पस फंडही बुडवला आहे.

सोसायटीला ४ हजार चौरस फुटांची जागा देण्याचे आश्वासन पाळले नसून २५२ रहिवाशांचे रजिस्ट्रेशनही केलेले नाही. विकासकाने इस्टेट विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून इमारतीच्या आराखड्यात बेकायदेशीर बदल केले आहेत. २०१३ ते २०२३ अशी एल.ओ.आय. (LOI) ची मुदत संपलेली असतानाही अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून त्याने बेकायदेशीर मान्यता मिळवली. विशेष म्हणजे, ७ मे २०२५ रोजी उच्च न्यायालयाने स्थगिती देऊनही प्रशासनाने विकासकाचा एल.ओ.आय. रद्द केला नाही.

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

या बेकायदेशीर कारभाराला पुढे नेत, रहिवाशांची कोणतीही संमती न घेता आनंद विल्लनूरने ‘अजमेरा’ या दुसऱ्या विकासकासोबत बेकायदेशीर करारनामा (Joint Venture) केला. या दोन्ही विकासकांनी मिळून पुनर्विकसित इमारतीमधील ९६ घरांची बेकायदेशीरपणे परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार दोषी यांनी उघडकीस आणला. आनंद विल्लनूर याच्यावर वडाळा येथील ‘स्काय ३१’ इमारतीच्या रहिवाशांनी १०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हा दाखल केला असून, उच्च न्यायालयाने त्याला ‘वॉन्टेड’ (फरार) घोषित केले आहे. अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या विकासकाला पालिका प्रशासन पाठीशी घालत असल्याचा संताप दोषी यांनी व्यक्त केला.

हक्काची मागणी करणाऱ्या रहिवाशांवर खोटे एफ.आय.आर. (FIR) दाखल केले जात असून, त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी चुकीची माहिती देऊन त्यांना कामावरून काढण्यास प्रवृत्त करण्यासारखे नीच पातळीवरचे राजकारण बिल्डरकडून सुरू असल्याचे त्या म्हणाल्या.

या ३२४ मराठी कुटुंबांना न्याय न मिळाल्यास येणाऱ्या नवरात्रीत त्यांच्यावर उपोषणाची वेळ आली, तर मी स्वतः त्यांच्यासोबत दालनाबाहेर उपोषणाला बसेन, असा कडक इशारा संध्या दोषी यांनी प्रशासनाला दिला. या गंभीर प्रकरणाची तत्काळ दखल घेत, महापौर रितू तावडे यांनी प्रशासनाला या प्रकरणी सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे कडक आदेश दिले आहेत. तसेच, जोपर्यंत या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सभागृहात सादर केला जात नाही, तोपर्यंत संध्या दोषी यांचा हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्याचे निर्देशही महापौरांनी प्रशासनाला दिले.

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार

Web Title: Mumbai news satarasta bit chawl redevelopment 324 families sandhya doshi bmc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 10:11 PM

Topics:  

  • BMC
  • Mumbai News
  • shivsena

संबंधित बातम्या

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
1

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Mumbai News: सचिन वाझेंच्या जामिनावर कोर्टाचा निर्णय; अँटिलिया प्रकरणातील साडेपाच वर्षांचा कारावास
2

Mumbai News: सचिन वाझेंच्या जामिनावर कोर्टाचा निर्णय; अँटिलिया प्रकरणातील साडेपाच वर्षांचा कारावास

Mumbai News: पिंडदानामुळे पूर्वजांना मिळेल मुक्ती! पितृ पंधरवड्यात १६ दिवस करणार पूर्वजांचे स्मरण; अनेक ठिकाणी आयोजन
3

Mumbai News: पिंडदानामुळे पूर्वजांना मिळेल मुक्ती! पितृ पंधरवड्यात १६ दिवस करणार पूर्वजांचे स्मरण; अनेक ठिकाणी आयोजन

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार
4

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.