Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News : शिवाजी पार्कमध्ये दिवाळी पहाट रंगली! 10 हजारांहून अधिक रसिकांची उपस्थिती; दुष्काळग्रस्तांसाठी 2.15 कोटींची मदत

Mumbai News : मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये सुगी ग्रुपच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला 10 हजारांहून अधिक रसिकांनी हजेरी लावली. राहुल देशपांडे, संकर्षण कऱ्हाडे आणि प्राजक्ता शुक्रे यांच्या सादरीकरणाने पहाट रंगली. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांसाठी तब्बल 2 कोटी 15 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.

  • By विवेक
Updated On: Nov 08, 2026 | 09:00 PM
Sugi Diwali Pahat

Sugi Diwali Pahat

Follow Us
Follow Us:
  • शिवाजी पार्कमध्ये सुगीच्या दिवाळी पहाटेला रसिकांची तुफान गर्दी
  • महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी 2.15 कोटींची मदत
  • पाच सामाजिक संस्थांना निधीचं वाटप
 

मुंबई : दिवाळीची पहाट, सुरेल संगीत आणि त्याला सामाजिक बांधिलकीची जोड… असा सुंदर योग यंदा मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये पाहायला मिळाला. सुगी ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी पहाट‘ कार्यक्रमाला तब्बल 10 हजारांहून अधिक रसिकांनी उपस्थिती लावत भरभरून प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, या सांगीतिक सोहळ्यातून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि गरजू नागरिकांसाठी तब्बल 2 कोटी 15 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. (Mumbai News)

राहुल देशपांडे यांच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध

दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी आपल्या सुरेल गायनाने वातावरण भारावून टाकलं. अभिनेता आणि सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडे यांनीही आपल्या खास शैलीत कार्यक्रमात रंगत आणली. गायिका प्राजक्ता शुक्रे यांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. अभि मुंडे यांच्या काव्यसादरीकरणाने कार्यक्रमाला वेगळीच उंची मिळाली. अभिनेते स्वप्नील जोशी आणि मकरंद अनासपुरे यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती.

दुष्काळग्रस्तांसाठी 2 कोटी 15 लाखांची मदत

कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक कार्यासाठी जाहीर करण्यात आलेला मोठा निधी. सुगी ग्रुपने एकूण 2 कोटी 15 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Diwali : रुग्णालयाच्या आवारातही फुलवला दिवाळीचा आनंद; 400 जणांना फराळ, 75 महिलांना साड्या

या निधीचं वाटप पाच संस्थांना करण्यात येणार आहे.

  • परिजात फाउंडेशन – 51 लाख रुपये
  • नाम फाउंडेशन – 51 लाख रुपये
  • ग्राम मंगल – 51 लाख रुपये
  • सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्ट – 51 लाख रुपये
  • महाजप फाउंडेशन – 11 लाख रुपये

‘शेतकरी आहेत म्हणून आपण आहोत’, निशांत देशमुख यांचं आवाहन

सुगी ग्रुपचे संस्थापक निशांत देशमुख यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. पाण्याची टंचाई आणि शेतकऱ्यांवरील कर्जाचा वाढता भार पाहता पुढील आठ महिने आव्हानात्मक असतील, असं त्यांनी सांगितलं.
शेतकरी आहेत म्हणून आपण आहोत. त्यामुळे समाजातील प्रत्येकाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावं, असं भावनिक आवाहनही त्यांनी केलं.

एकीकडे संगीताचा आनंद आणि दुसरीकडे गरजूंसाठी मदतीचा हात, अशा दुहेरी उद्देशामुळे सुगीची यंदाची दिवाळी पहाट मुंबईकरांसाठी खास ठरली.

Mangal Prabhat Lodha : आरेतील आदिवासींसोबत मंगलप्रभात लोढांनी साजरी केली दिवाळी; फराळ वाटप करत घेतला, तारपा नृत्याचा आनंद

Web Title: Mumbai news suggi diwali pahat shivaji park 2 15 crore farmer relief vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 09:00 PM

Topics:  

  • Diwali 2026
  • drought news
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Diwali : जिथे अंत्यविधीनंतर कोणी थांबत नाही, तिथेच गायकवाड कुटुंबाची साजरी होते दिवाळी!
1

Diwali : जिथे अंत्यविधीनंतर कोणी थांबत नाही, तिथेच गायकवाड कुटुंबाची साजरी होते दिवाळी!

Diwali : रुग्णालयाच्या आवारातही फुलवला दिवाळीचा आनंद; 400 जणांना फराळ, 75 महिलांना साड्या
2

Diwali : रुग्णालयाच्या आवारातही फुलवला दिवाळीचा आनंद; 400 जणांना फराळ, 75 महिलांना साड्या

Vijay Sales Diwali 2026 : विजय सेल्सचा दिवाळी धमाका ! स्मार्टफोन, टीव्ही आणि होम अप्लायन्सेसवर ऑफर्स; बँककार्डवर २० हजारांची सूट
3

Vijay Sales Diwali 2026 : विजय सेल्सचा दिवाळी धमाका ! स्मार्टफोन, टीव्ही आणि होम अप्लायन्सेसवर ऑफर्स; बँककार्डवर २० हजारांची सूट

VBA Protest : ‘देवेंद्र-नरेंद्र तुपाशी, शेतकरी उपाशी’ म्हणत राज्यभरात ‘वंचित’ची काळी दिवाळी! चटणी-भाकर खाऊन सरकारचा निषेध
4

VBA Protest : ‘देवेंद्र-नरेंद्र तुपाशी, शेतकरी उपाशी’ म्हणत राज्यभरात ‘वंचित’ची काळी दिवाळी! चटणी-भाकर खाऊन सरकारचा निषेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.