Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

VBA Protest : ‘देवेंद्र-नरेंद्र तुपाशी, शेतकरी उपाशी’ म्हणत राज्यभरात ‘वंचित’ची काळी दिवाळी! चटणी-भाकर खाऊन सरकारचा निषेध

VBA Protest : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात काळी दिवाळी आंदोलन सुरू केले आहे. औरंगाबादसह जालना, बुलढाणा, अकोला आणि सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर चटणी-भाकर खाऊन सरकारचा निषेध करण्यात आला.

  • By विवेक
Updated On: Nov 08, 2026 | 07:49 PM
VBA Protest Diwali

VBA Protest Diwali

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी
  • चटणी-भाकर खाऊन सरकारच्या धोरणांचा निषेध
  • ‘देवेंद्र-नरेंद्र तुपाशी, शेतकरी उपाशी’च्या घोषणा
 

VBA Protest : एकीकडे दिवाळीचा उत्साह आणि रोषणाई सुरू असताना दुसरीकडे राज्यभरात शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. अश्यातच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अपुरी मदत मिळत असल्याचं सांगत वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे.

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात ‘काळी दिवाळी’ आंदोलन सुरू केलं आहे. चटणी-भाकर खाऊन आणि काळी दिवाळी साजरी करत पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला. यावेळी ‘देवेंद्र-नरेंद्र तुपाशी, शेतकरी उपाशी’ अशा घोषणाही देण्यात आल्या.

छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी चटणी-भाकर खाऊन सरकारचा निषेध केला. शेतकरी आणि शेतमजुरांच्या अडचणींकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! दौऱ्याआधीच पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने शिंदेगटात भूकंप, नेमकं काय घडलं?

जालना, बुलढाण्यातही काळी दिवाळी

जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही शेतकरी आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत काळी दिवाळी आंदोलनाला सुरुवात केली. बुलढाण्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी-भाकर खाऊन सरकारच्या धोरणांविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली.

अकोल्यात राजेंद्र पातोडे आंदोलनात सहभागी

अकोल्यातील आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

सोलापुरातही सरकारविरोधात निषेध

सोलापुरातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली.

शेतकऱ्यांसाठी नेमक्या काय आहेत मागण्या?

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, पिकांच्या नुकसानीची भरपाई करावी आणि शेतकरी व शेतमजुरांसाठी विशेष मदत जाहीर करावी, अशा प्रमुख मागण्या वंचित बहुजन आघाडीने केल्या आहेत.

एकूणच, दिवाळीच्या सणात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवत वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

Rohit Pawar : ‘सरकारचं डोकं सटकलंय, भाजपसोबत जास्त काळ राहू नका!’ एकनाथ शिंदेंना रोहित पवारांचा अप्रत्यक्ष सल्ला

💡

Frequently Asked Questions

  • Que: वंचित बहुजन आघाडीने काळी दिवाळी आंदोलन का केलं?

    Ans: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळत नसल्याचा आरोप करत आणि राज्य सरकारचे लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने काळी दिवाळी आंदोलन केलं.

  • Que: काळी दिवाळी आंदोलन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये झालं?

    Ans: छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला आणि सोलापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात आलं.

  • Que: वंचित बहुजन आघाडीने सरकारकडे कोणत्या मागण्या केल्या?

    Ans: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, पिकांच्या नुकसानीची भरपाई आणि शेतकरी व शेतमजुरांसाठी ठोस आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.

Web Title: Vba protest vanchit bahujan aghadi kali diwali farmer protest maharashtra vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 07:46 PM

Topics:  

  • Adv Prakash Ambedkar
  • drought news
  • Maharashtra Drought 2026
  • Vanchit Bahujan Aghadi

संबंधित बातम्या

Mangal Prabhat Lodha : आरेतील आदिवासींसोबत मंगलप्रभात लोढांनी साजरी केली दिवाळी; फराळ वाटप करत घेतला, तारपा नृत्याचा आनंद
1

Mangal Prabhat Lodha : आरेतील आदिवासींसोबत मंगलप्रभात लोढांनी साजरी केली दिवाळी; फराळ वाटप करत घेतला, तारपा नृत्याचा आनंद

Wardha News: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा! १.५१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा
2

Wardha News: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा! १.५१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा

दुष्काळाच्या सावटातही बाजारपेठेत उत्साह; वाशिम-बुलढाण्यात दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी, व्यापाऱ्यांना दिलासा
3

दुष्काळाच्या सावटातही बाजारपेठेत उत्साह; वाशिम-बुलढाण्यात दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी, व्यापाऱ्यांना दिलासा

दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता थेट तालुक्यात, गरजू रुग्णांना मिळणार मोठा दिलासा
4

दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता थेट तालुक्यात, गरजू रुग्णांना मिळणार मोठा दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.