Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Metro: मुंबईकरांचा मेट्रोप्रवास गर्दीमुक्त होणार! घाटकोपर-वर्सोवा मेट्रो लवकरच सहा डब्यांची; ‘मेट्रो-वन’ची तयारी

प्रवाशांकडून मेट्रो प्रवासाला मिळाणारा प्रतिसाद आणि दिवसेंदिवस वाढत चाललेली गर्दी लक्षात घेता, आता मेट्रोचे संचलन करणाऱ्या मुंबई मेट्रो-वनने घाटकोपर-वर्सोवा मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या डब्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 04, 2025 | 09:33 PM
मुंबईकरांचा मेट्रोप्रवास गर्दीमुक्त होणार! (Photo Credit - X)

मुंबईकरांचा मेट्रोप्रवास गर्दीमुक्त होणार! (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबईकरांसाठी दिलासा!
  • घाटकोपर-वर्सोवा मेट्रो लवकरच सहा डब्यांची
  • गर्दीमुक्त प्रवासासाठी ‘मेट्रो-वन’ची तयारी’

मुंबई: मुंबईतील लोकलच्या गर्दीतून वाचण्यासाठी मेट्रोचा पर्याय निवडणाऱ्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबईकरांचा मेट्रो प्रवास गर्दीमुक्त होणार आहे. घाटकोपर-वर्सोवा दरम्यान धावणारी मेट्रो-१ ही सहा डब्यांची होणार आहे. प्रवाशांकडून मेट्रो प्रवासाला मिळाणारा प्रतिसाद आणि दिवसेंदिवस वाढत चाललेली गर्दी लक्षात घेता, आता मेट्रोचे संचलन करणाऱ्या मुंबई मेट्रो-वनने घाटकोपर-वर्सोवा मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या डब्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, मेट्रो-१ मार्गिकेसाठी ३२ अतिरिक्त डब्यांच्या खरेदीसाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे. मेट्रो-वनने त्यासाठी ही निविदा काढण्याची तयारी सुरू केली असून, येत्या काही महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

प्रवाशी क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार

मेट्रो १ मार्गावर सध्या ४ डब्यांच्या १६ मेट्रो धावत आहेत. या सर्व मेट्रो ६ डब्यांच्या करण्यासाठी ३२ अतिरिक्त डबे लागणार आहेत.

तपशील सध्याची क्षमता (४ डबे) नियोजित क्षमता (६ डबे)
प्रवाशी वाहतूक एकावेळी १,७५० प्रवासी एकावेळी २,२५० प्रवासी

जर मेट्रोच्या डब्यांची संख्या ४ वरून ६ झाल्यावर प्रवाशांची वाहतूक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यानुसार, मेट्रो-१ वरून दिवसाला १० लाख प्रवासी प्रवास करू शकतील. यामुळे मेट्रो-१ मार्गावरील गर्दी देखील कमी होण्यास मदत होईल.

Mumbai Metro 7: गोरेगाव पूर्व स्टेशनला आता ‘झ्युरिक कोटक गोरेगाव पूर्व’ नाव

अतिरिक्त डब्यांसाठी प्रस्ताव सादर

मुंबई मेट्रो-१ ने मेट्रोच्या डब्यांची संख्या ६ करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात केली आहे. या ३२ अतिरिक्त डब्यांच्या खरेदीसाठी इंडिया डेब्ट रिझोल्यूशन कंपनीमार्फत नॅशनल एसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे (NARCL) प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला कंपनीने हिरवा झेंडा दाखवल्यानंतर हे ३२ अतिरिक्त डबे खरेदी केले जाणार आहेत.

डब्यांची संख्या प्रवाशांची वाहतूक क्षमता
४ डबे १,७५० प्रवासी
६ डबे २,२५० प्रवासी
अतिरिक्त डबे खरेदी ३२ डबे

मार्गीकेची सद्यस्थिती

सध्या मेट्रो-१ मार्गाची लांबी ११.४ किलोमीटर इतकी आहे आणि यावर १२ स्थानके आहेत.

  • या मेट्रो मार्गावर सध्या दिवसाला १६ मेट्रो धावतात.
  • दिवसाला या मार्गावर ४८६ फेऱ्या होतात.
  • गर्दीच्या वेळी धावणाऱ्या दोन मेट्रो गाड्यांमधील वेळेचे अंतर ३.२० मिनिटे इतके असते, तर इतर वेळी हे अंतर ६ मिनिटे असते.

सहा डब्यांची मेट्रो धावण्यास सुरुवात झाल्यावर मुंबईकरांचा प्रवास अधिक सुकर होईल.

Metro Line 2B चा पहिला टप्पा कधी सेवेत येणार? मंडाळा ते चेंबूर प्रवास होणार सोयीस्कर

FAQs (संबंधित प्रश्न)

१. घाटकोपर-वर्सोवा मेट्रोच्या डब्यांची संख्या किती होणार आहे?

सध्या चार डब्यांची असलेली मेट्रो आता सहा डब्यांची होणार आहे.

२. या निर्णयामागचे कारण काय आहे?

प्रवाशांकडून मिळत असलेला प्रतिसाद आणि मार्गावरील वाढती गर्दी कमी करणे, हे या निर्णयाचे मुख्य कारण आहे.

३. अतिरिक्त किती डब्यांची खरेदी केली जाणार आहे?

१६ मेट्रो गाड्यांना ६ डब्यांच्या करण्यासाठी एकूण ३२ अतिरिक्त डब्यांची खरेदी केली जाणार आहे.

४. या विस्तारामुळे प्रवासी क्षमता किती वाढेल?

सध्या चार डब्यांच्या मेट्रोमधून एकावेळी १,७५० प्रवासी प्रवास करतात. सहा डब्यांच्या मेट्रोमधून एकावेळी २,२५० प्रवासी प्रवास करू शकतील.

५. सहा डब्यांची मेट्रो धावल्यास दिवसाला किती प्रवासी प्रवास करू शकतील?

या बदलानंतर मेट्रो-१ वरून दिवसाला सुमारे १० लाख प्रवासी प्रवास करू शकतील.

Web Title: Mumbaikars metro journey will be free from congestion ghatkopar versova metro will soon have six coaches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 09:33 PM

Topics:  

  • Metro
  • Mumbai
  • Mumbai Metro

संबंधित बातम्या

Cabinet Meeting: मुंबई-नाशिक-पुण्यासाठी पायाभूत सुविधांचा ‘मेगा प्लॅन’; उत्तन-विरार सागरी सेतू आता वाढवण बंदरापर्यंत!
1

Cabinet Meeting: मुंबई-नाशिक-पुण्यासाठी पायाभूत सुविधांचा ‘मेगा प्लॅन’; उत्तन-विरार सागरी सेतू आता वाढवण बंदरापर्यंत!

Mumbai Metro 7: गोरेगाव पूर्व स्टेशनला आता ‘झ्युरिक कोटक गोरेगाव पूर्व’ नाव
2

Mumbai Metro 7: गोरेगाव पूर्व स्टेशनला आता ‘झ्युरिक कोटक गोरेगाव पूर्व’ नाव

Cabinet Meeting: गंभीर आजारांसाठी ‘या’ योजनेतून मिळणार 10 लाख रुपये…; मंत्रिमंडळ बैठकीत 21 महत्त्वाचे निर्णय
3

Cabinet Meeting: गंभीर आजारांसाठी ‘या’ योजनेतून मिळणार 10 लाख रुपये…; मंत्रिमंडळ बैठकीत 21 महत्त्वाचे निर्णय

BMC Elections : मोठी बातमी! महापालिकांचे बिगुल वाजण्याची शक्यता, निवडणूकीची तारीख होणार जाहीर
4

BMC Elections : मोठी बातमी! महापालिकांचे बिगुल वाजण्याची शक्यता, निवडणूकीची तारीख होणार जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.