गोरेगाव पूर्व स्टेशनला आता ‘झ्युरिक कोटक गोरेगाव पूर्व’ नाव (Photo Credit - X)
मुंबई, नोव्हेंबर ३, २०२५: मुंबईतील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी! झ्युरिक कोटक जनरल इन्शुरन्स कंपनीने मुंबई मेट्रो लाईन ७ वरील गोरेगाव पूर्व स्टेशनला आता ‘झ्युरिक कोटक गोरेगाव पूर्व’ असे नाव दिले आहे. उद्योग, नवप्रवर्तन आणि श्रमजीवी व्यावसायिकांचे लक्ष वेधून घेणारे प्रसिद्ध व्यावसायिक केंद्र नेस्को (NESCO) च्या अगदी जवळ असलेले हे मेट्रो स्टेशन भारताच्या आर्थिक राजधानीतील लाखो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावते. हे स्थानक जिथे व्यवसाय, नावीन्यता आणि गतीशीलता एकत्र येतात, त्या मुंबईची खरी लाइफलाइन बनले आहे.
कंपनीच्या मुख्यालयाजवळ असलेले ‘झ्युरिक कोटक गोरेगाव पूर्व’ मेट्रो स्टेशन मुंबईच्या उपनगरातील रहिवाशांसाठी अत्यंत सोयीस्कर ठरले आहे. हे स्टेशन प्रमुख निवासी क्षेत्रांना गोरेगाव आणि अंधेरी अशा मोठ्या व्यावसायिक क्षेत्रांशी जोडते. यामुळे प्रवाशांना सहज आणि सुलभपणे प्रवास करण्याची सुविधा मिळत असून, कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
झ्युरिक कोटक गोरेगाव पूर्व मेट्रो स्टेशनच्या अनावरण समारोहनंतर, झ्युरिक कोटक जनरल इन्शुरन्स कंपनी (इंडिया) लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक (MD) व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. अलोक अग्रवाल म्हणाले, “मुंबई मेट्रो भारताच्या गतीशीलता क्रांतीचे दर्शन घडवते. ही मेट्रो लाईन आता शहरासाठी वास्तविक लाइफलाइन बनली असून, शहरातील रहिवाशांना त्यांच्या ध्येयांकडे झपाट्याने घेऊन जात आहे.”
ते पुढे म्हणाले, “आम्हाला आधुनिक पायाभूत सुविधामधील या महत्त्वपूर्ण टप्प्याशी जोडले गेल्याचा अभिमान आहे. भारतातील आमचा प्रवास भारतीयांचे भविष्य सुरक्षित करण्याच्या आमच्या कटिबद्धतेतून दिसून येतो. सरासरी मुंबईकर त्यांच्या ध्येयांकडे वाटचाल करत असताना, झ्युरिक कोटक गोरेगाव पूर्व मेट्रो स्टेशन निरंतर प्रगती, स्थिर प्रवास आणि सुरक्षित महत्त्वाकांक्षेसाठी अर्थपूर्ण उत्प्रेरक ठरेल.”
झ्युरिक कोटक जनरल इन्शुरन्स कंपनी (इंडिया) लिमिटेडच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर श्रीमती सुरभी कांजीलाल यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “मेट्रो स्टेशन्स दैनंदिन जीवनाचा भाग आहेत; ते असे टचपॉइंट्स आहेत, जे रोजच्या अनुभवांना आकार देतात. झ्युरिक कोटक गोरेगाव पूर्व मेट्रो स्टेशनमधून प्रत्येक प्रवाशासोबत त्यांच्या प्रत्येक टप्प्यावर उपस्थित राहण्याची आमची कटिबद्धता दिसून येते.”
श्रीमती कांजीलाल पुढे म्हणाल्या, “आमची इच्छा आहे की आमचा ब्रँड पाठिंबा, प्रगती आणि आत्मविश्वासासाठी ओळखला जावा, जिथे कुटुंबं संपूर्ण जीवन प्रवासादरम्यान आमच्या ब्रँडवर अवलंबून राहू शकतात. या स्टेशनमधून भारतासाठी नावीन्यपूर्ण व भविष्याकरिता सुसज्ज ब्रँड निर्माण करण्याचे आमचे प्रयत्न दिसून येतात, ज्यात झ्युरिकचा जागतिक अनुभव आणि कोटकला भारतातील ग्राहकांबाबत असलेली सखोल माहिती यांचे प्रभावी संयोजन आहे.”
झ्युरिक कोटक जनरल इन्शुरन्स या महत्त्वपूर्ण क्षणाला साजरे करत असताना, ब्रँड नावीन्यता व ग्राहक-केंद्रितत्वाप्रती कटिबद्ध आहे आणि दूरगामी, विश्वसनीय विमा सहयोगी म्हणून आपली ओळख अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करत आहे.






