Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

1 तासाचा प्रवास 20 मिनिटांत! मेट्रो ३ चा पहिला टप्पा लवकरच होणार सुरू; जाणून घ्या तिकीट दर, वेळापत्रक अन् थांबे

Mumbai Metro Aqua Line : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) लवकरच आरे ते BKC दरम्यान मेट्रो-3 कॉरिडॉरची सेवा सुरू करू शकते. हा प्रवास अवघ्या 22 मिनिटांत पूर्ण होईल, ज्याला सध्या एक तास लागतो. पहिल्या टप्प्यात 12.44 किलोमीटरच्या मार्गावर दररोज 96 फेऱ्या धावणार आहेत. याचे भाडे 10 ते 50 रुपयांपर्यंत असेल.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 25, 2024 | 12:28 PM
मेट्रो ३ चा पहिला टप्पा लवकरच होणार सुरू; जाणून घ्या तिकीट दर, वेळापत्रक अन् थांबे (फोटो सौजन्य-X)

मेट्रो ३ चा पहिला टप्पा लवकरच होणार सुरू; जाणून घ्या तिकीट दर, वेळापत्रक अन् थांबे (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईतील भुयारी मेट्रोने प्रवास करण्याची अनेक वर्षांपासूनची प्रवाशांची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. बहुप्रतिक्षित असणारी भुयारी मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) च्या एमडी अश्विनी भिडे यांच्या मते, आरे ते बीकेसी दरम्यान मेट्रो-3 कॉरिडॉरची सेवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकते. पहिल्या टप्प्यातील सेवा सुरू झाल्यानंतर आरे ते बीकेसी हा प्रवास अवघ्या 22 मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. सध्या हा प्रवास पूर्ण करण्यासाठी एक तास लागतो. या मार्गावरील तिकीटाचे दर, वेळापत्रक आणि थांबे काय असणार ते जाणून घ्या…

आरे आणि बीकेसी दरम्यानच्या सर्व 9 मेट्रो स्थानकांचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यातील 12.44 किमी मार्गावर दररोज 96 मेट्रो फेऱ्या धावतील. सकाळी 6.30 ते रात्री 10.30 या वेळेत प्रवाशांसाठी मेट्रो सेवा उपलब्ध असेल.

तिकीटाचे दर

या मार्गावर दर 6.30 मिनिटांनी ट्रेनची सुविधा उपलब्ध असेल. एकदा संपूर्ण मार्गावर सेवा सुरू झाल्यानंतर, 6 मिनिटांचा कालावधी सुमारे 3 मिनिटांपर्यंत कमी होईल. मेट्रो-3 च्या पहिल्या टप्प्यात प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 10 ते 50 रुपये मोजावे लागणार आहेत. या संपूर्ण मार्गावरून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना सुमारे 70 रुपये खर्च करावे लागणार आहेत. मार्च 2025 पर्यंत संपूर्ण मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याच्या योजनेवर काम सुरू आहे.अश्विनी भिडे यांच्या मते, मेट्रो रेल्वे सेफ्टी बोर्ड (CMRS) पहिल्या टप्प्यातील रोलिंग स्टॉकची तपासणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. स्थानकांसाठी सीएमआरएस प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कागदपत्रे तयार केली जात आहेत.

भुयारीत पाणी साचणार नाही

तसेच गेल्या 100 वर्षांतील पावसाचा अभ्यास करून मेट्रो-3 भुयारी बांधण्यात आला आहे. अभ्यासानुसार पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत मुसळधार पाऊस असूनही मेट्रोपर्यंत पाणी पोहोचणार नाही. मेट्रो-3 कॉरिडॉर शहरातील अनेक महत्त्वाच्या संकुलांजवळून जाणार आहे. एकदा संपूर्ण मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर, सुमारे 6.30 लाख वाहने रस्त्यावरून कमी होण्याची अपेक्षा आहे. मेट्रो-1 आणि मेट्रो-7च्या जोडणीमुळे इतर मेट्रो मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवासही सुकर होणार आहे.

लास्ट माईल कनेक्टिव्हिटी

मेट्रो-3 मधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे. अशा स्थितीत मेट्रो स्थानकातून बाहेर पडल्यानंतर प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी नेण्यासाठी मेट्रो स्थानकाजवळ बेस्ट बस आणि ऑटो टॅक्सी स्टँड तयार करण्याचे नियोजन सुरू आहे. भिडे यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक स्थानकावर बससेवा देण्यासाठी बेस्टशी चर्चा सुरू आहे.

Web Title: Mumbais first underground metro line bkc to aarey in 30 minutes for rs 50 phase 1 of mumbai metro line 3 set for october 4 opening

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2024 | 12:28 PM

Topics:  

  • metro news
  • Mumbai
  • Mumbai Metro

संबंधित बातम्या

Maharashtra Election 2025 : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह; १,००,००० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल
1

Maharashtra Election 2025 : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह; १,००,००० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
2

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा
3

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा

मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल
4

मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.