Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Heatwave Alert: मुंबईत उष्णतेचा कडेलोट! 24 तासात अलर्ट बदलला, कुठे किती तापमान? वाचा सविस्तर बातमी

Mumbai Heatwave Alert News : मुंबई आणि एमएमआर प्रदेशात उष्णतेच्या लाटेचा कहर सुरूच आहे. नागरिक देखील उष्णतेच्या लाटेने त्रस्त झाले असून मुंबईतील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 11, 2026 | 11:54 AM
मुंबईत उष्णतेचा कडेलोट! २४ तासात अलर्ट बदलला,कुठे किती तापमान?

मुंबईत उष्णतेचा कडेलोट! २४ तासात अलर्ट बदलला,कुठे किती तापमान?

Follow Us
Follow Us:
  • २४ तासात अलर्ट बदलला
  • राम मंदिर ४२.४°, विक्रोळी ४१.६°, भायखळा ४०°
  • कालच्या तुलनेत ४०° तापमानाच्या ठिकाणात वाढ
Mumbai Heatwave Alert News in Marathi: मुंबईसह उत्तर कोकणात मंगळवारी उष्णतेची लाट तीव्र होत आहे. काही ठिकाणी तीव्र उष्णलहरीची स्थिती निर्माण झाली. परिस्थिती गंभीर होत गेल्याने भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी आधी यलो अलर्ट आणि नंतर ऑरेंज अलर्ट जाहीर केला. मुंबईतील अनेक भागांत दुपारी सूर्याने अक्षरशः आग ओकली. राम मंदिर परिसरात सर्वाधिक ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ विक्रोळी ४१.६ अंश, तर भायखळा ४० अंश तापमानाने तडाखा बसला.

विशेष म्हणजे, काल मुंबईतील दोन ठिकाणी तापमान ४० अंशांच्या घरात गेले होते, तर आज त्यात भायखळा परिसराची भर पडल्याने उष्णतेची तीव्रता अधिक वाढल्याचे दिसून आले. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, उपनगरांमध्ये दिवसाचे तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा ७.६ अंश सेल्सिअस जास्त होते. आतापर्यंतच्या नोंदींनुसार, १९५६ पासून आजपर्यंत मुंबईत ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक कमाल तापमानाची नोंद फक्त ६ वेळा झाली आहे.

आता जमीन मोजणी प्रक्रिया महिनाभरात; राज्यात 200 खासगी भूमापकांची नियुक्ती

इतर भागांमध्येही उष्णतेची झळ मोठ्या प्रमाणात जाणवली. बांद्रा येथे ३९.७°, विद्याविहार ३९.५°, चेंबूर ३८.८° आणि दहिसर ३८.८° तापमानाची नोंद झाली. दरम्यान, उत्तर कोकणात उष्णलहरी ते तीव्र उष्णलहरीची स्थिती प्रत्यक्षात दिसून आली. सांताक्रूझ येथे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस हे तापमान सरासरीपेक्षा ७.६ अंश अधिक नोंदले गेले. तर डहाणू येथे ४० अंश सरासरीपेक्षा ९.६ अंश अधिक तापमानासह तीव्र उष्णलहरीची स्थिती निर्माण झाली. तर ठाणे येथे ३९.२ अंश हे तापमान सरासरीपेक्षा ५.४ अंश अधिक नोंदवले गेले. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाने ४० अंशांचा टप्पा गाठल्याने नागरिक हैराण झाले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे आणि उन्हापासून बचाव करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

मुंबईतील काही भागात तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील राम मंदिर परिसरात ४२.४ अंश सेल्सिअस, पूर्व उपनगरात ४१.६ अंश सेल्सिअस आणि दक्षिण मुंबईमध्ये ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वांद्रे येथे ३९.७ अंश सेल्सिअस, विद्याविहारमध्ये ३९.५ अंश सेल्सिअस, चेंबूर आणि दहिसरमध्ये ३८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. एमएमआर प्रदेशात, पालघरमध्ये ४१.२ अंश सेल्सिअस, डोंबिवलीमध्ये ४० अंश सेल्सिअस, कल्याणमध्ये ४१.८ अंश सेल्सिअस, नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये ४१.६ अंश सेल्सिअस आणि पनवेलमध्ये ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यातील साखर उद्योग संकटात; शेतकऱ्यांची 4315 कोटींची एफआरपी थकीत

Web Title: Scorching heat in mumbai the alert changed within 24 hours what is the temperature where

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • heat wave
  • Mumbai
  • Weather Update

संबंधित बातम्या

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…
1

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
2

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…
3

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…

Rain Update : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूरसह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी; अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस होणार?
4

Rain Update : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूरसह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी; अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.