Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Gas Shortage: युद्धाचा फटका! छोट्या व्यवसायिकांचा जीवन संघर्ष रस्त्यावर! मुंबईतील चायनीज गाडी व्यवसाय संकटात

गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प असल्यामुळे चायनीज फूड गाड्यांचे धंदे पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत. मोठ्या हॉटेल व्यवसायिकांसाठी लढण्यास त्यांची संघटना आहे,

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 11, 2026 | 05:43 PM
छोट्या व्यवसायिकांचा जीवन संघर्ष रस्त्यावर! मुंबईतील चायनीज गाडी व्यवसाय संकटात

छोट्या व्यवसायिकांचा जीवन संघर्ष रस्त्यावर! मुंबईतील चायनीज गाडी व्यवसाय संकटात

Follow Us
Close
Follow Us:
  • एस्मा कायदा लागू, छोट्या गाडीवाल्यांचे धंदे ठप्प!
  • गॅस टंचाईमुळे मुंबईतील चायनीज गाडी व्यवसाय संकटात
  • छोट्या व्यवसायिकांचा जीवन संघर्ष रस्त्यावर
मुंबई : गॅसच्या तुटवड्यामुळे शहरातील बुर्जी पाव आणि चायनीज फूड गाड्यांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत. केंद्र सरकारने देशभरात एस्मा कायद्याची (आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम) अंमलबजावणी केल्याने आता आवश्यक सेवा आणि वस्तूंचा पुरवठा नियमबद्ध केला गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प असल्यामुळे चायनीज फूड गाड्यांचे धंदे पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत. शहरातील अनेक गाडीवाल्यांकडे गॅसचा साठा संपला आहे, परिणामी सूप, नूडल्स आणि स्ट्रीट फूडचे पदार्थ बनवणे अशक्य झाले आहे. मोठ्या हॉटेल व्यवसायिकांसाठी लढण्यास त्यांची संघटना आहे, मात्र छोट्या व्यवसायिकांची समस्या मांडण्यास व्यासपीठ नसल्याची खंत अनेक धंदेवाल्यानी व्यक्त केली.

वडापाव, सामोसा, बुर्जी पाव आणि चायनीज गाडीवाल्यांचा असा दावा आहे की, ग्राहक येत आहेत पण पदार्थ बनवता येत नाहीत, त्यामुळे महिनो-दरमहा कमाईचे मोठे नुकसान झाले आहे. काही गाड्यांनी तरी घरगुती सिलेंडर वापरून जुगार चालवण्याचा प्रयत्न केला, पण पुरवठा पुरेसा नसल्यामुळे व्यवसायावर फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांत एस्मा कायद्याअंतर्गत आवश्यक सेवा सुरु ठेवण्याच्या आदेशामुळे गाडीवाल्यांना काही प्रमाणात आश्वासन मिळाले आहे, परंतु वास्तविक गॅस उपलब्ध न झाल्याने व्यवसाय ठप्प आहे. स्थानिक गाडीवाले म्हणतात, “ग्राहक येतात, पैसे विचारतात, पण पदार्थ बनवता येत नाहीत. बुर्जी पावसारखे पदार्थ बनवण्यासाठी गॅस आवश्यक आहे, तो नाही. एस्मा कायदा आहे म्हणतात, पण व्यवहारात काही फरक पडलेला नाही.” विशेषत: स्ट्रीट फूड व्यवसायावर गॅस तुटवडा भयानक परिणाम करतो. ग्राहकही फसत आहेत. काही ठिकाणी गाडी बंद असल्याने ग्राहक रस्त्यावरच उभे राहतात, अशी तक्रार केली जाते.

Mumbai Heatwave Alert: मुंबईत उष्णतेचा कडेलोट! 24 तासात अलर्ट बदलला, कुठे किती तापमान? वाचा सविस्तर बातमी

रस्त्यावर उतराव लागतय

“अर्धा सिलेंडर उरला आहे. तो सिलेंडर घेऊन मी धंद्यासाठी रस्त्यावर उतरू शकत नाही. त्यामुळे मला धंदा बंद ठेवावा लागणार बहुधा. माझ्याकडे ४ ते पाच कामगार आहेत. त्यांचेही वांदे होणार. गेल्या ४ दिवसापासून सिलेंडर मिळणं कठीण झालं आहे.”
-राजू रेडीज, चायनीज गाडी मालक, पवई

“मला डिझायर फाऊंडेशनने वडापावची गाडी दिली आहे. पण गेल्या ४ दिवसापासून काय करूं हा प्रश्न माझ्या समोर आहे. माझा संसार बंद होणार. सरकारने घरातील गॅस दिला तरी इकडे कमाई नाही झाली तर घरातला गॅस पेटणार कसा?”
-स्मिता वाघमारे, सामोसे गाडी मालक

“मी छोटे सिलेंडर वापराचा विचार करत होतो. मात्र तो आता शक्य दिसत नाही. नुकसान होणार असल्याने धंदा बंद ठेवून घरी बसावं लागणार.”
-प्रकाश भुरे, वडा व्यवसायिक

“अशी वेळ येईल याची जाणीव नव्हती. माझी किचन व्यवस्था इंडक्शन करून घेतल्याने निर्धास्त आहे. मात्र हॉटेल-कॅफेसाठी आजही सिलेंडर महत्वाचे आहेत. युद्धजन्य परिस्थितीत इंडक्शन किचन मदतपूर्ण ठरत आहे.”
-एस. चंद्रशेखर, फ्रेंड्स कॅफे, ठाणे

दिल्लीपाठोपाठ मुंबईतही समाधान नाही

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या टंचाईच्या प्रश्नावर हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढत असताना आहार (हॉटेल संघटना) पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पेट्रोलियम मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. या भेटीत संघटनेने सिलेंडर पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत निवेदन दिले असल्याची माहिती आहार संघटनेचे सचिव सुनील शेट्टी यांनी दिली. दरम्यान मंत्री भुजबळ यांनी आहार संघटनेचे म्हणणे ऐकून घेतले व दिवसभरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असल्याचे सांगितले. मात्र तत्काळ कोणतेही ठोस आश्वासन देणे शक्य नसल्याचे भुजबळ यांनी चर्चेतूनच आहार संघटनेला स्पष्ट केले.

मात्र गॅस सिलेंडरची समस्या केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून सध्या ती जागतिक पातळीवर निर्माण झाल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तत्काळ कोणतेही ठोस आश्वासन देणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून परिस्थितीत काही दिलासा देता येईल का, याकडे लक्ष दिले जाईल, अशी माहिती आहार संघटनेचे सचिव सुनील शेट्टी यांनी दिली.
दरम्यान, या प्रश्नावर काल दिल्लीत झालेल्या चर्चेतही कोणताही ठोस तोडगा निघाला नाही, त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये नाराजी वाढली आहे. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक लहान-मोठ्या हॉटेल व फूड व्यवसायांवर परिणाम होत असून कामगारांवरही त्याचा फटका बसत असल्याची चिंता संघटनेने व्यक्त केली आहे. परिस्थिती लवकर सुरळीत न झाल्यास राज्यभर बिकट स्थिती उदभवेल असे हॉटेल व्यावसायिकांकडून समजत आहे.

Malvan Panchayat samiti: मालवण पंचायत समितीत शिवसेना-भाजपची निर्विवाद सत्ता; राणेंच्या नेतृत्वात महायुती

Web Title: The life struggle of small business owners on the streets chinese food cart business in mumbai in crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 05:43 PM

Topics:  

  • LPG Gas
  • LPG Shortage
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai News: डीआरपीसाठी धारावीतील नगरसेवक मैदानात; ‘प्रलंबित’ पात्रतेचा तिढा सोडवण्यासाठी विशेष शिबिरे
1

Mumbai News: डीआरपीसाठी धारावीतील नगरसेवक मैदानात; ‘प्रलंबित’ पात्रतेचा तिढा सोडवण्यासाठी विशेष शिबिरे

Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्रवेशाची संधी; संशोधनपूरक आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची
2

Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्रवेशाची संधी; संशोधनपूरक आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची

Oil and LPG Stock: देशात 60 दिवसांचा पेट्रोल-डिझेल आणि 45 दिवसांचा गॅस शिल्लक, सरकारचा खुलासा आता…
3

Oil and LPG Stock: देशात 60 दिवसांचा पेट्रोल-डिझेल आणि 45 दिवसांचा गॅस शिल्लक, सरकारचा खुलासा आता…

Mumbai News : ‘सेंट’चे मुंबईत नवे हेल्थकेअर सेंटर; आजारांचे लवकर निदान करण्यावर भर
4

Mumbai News : ‘सेंट’चे मुंबईत नवे हेल्थकेअर सेंटर; आजारांचे लवकर निदान करण्यावर भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.