Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KEM Hospital : केईएममध्ये ‘व्हिडिओ-ईईजी’द्वारे फिटचे उगमस्थान शोधणे शक्य

व्हिडिओ-ईईजी’ तपासणी प्रणाली केईएम रुग्णालयात कार्यरत असून तिच्या मदतीने गेल्या २५ वर्षांत सुमारे ७५० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 11, 2026 | 05:05 PM
केईएममध्ये ‘व्हिडिओ-ईईजी’द्वारे फिटचे उगमस्थान शोधणे शक्य

केईएममध्ये ‘व्हिडिओ-ईईजी’द्वारे फिटचे उगमस्थान शोधणे शक्य

Follow Us
Follow Us:
  • देशातील ५ मोजक्या केंद्रांपैकी केईएम एक
  • २५ वर्षांत ७५० रुग्णांवर शस्त्रक्रिया
  • आणखी एका मशीनची भर पडणार
राम खांदारे, मुंबई: एपिलेप्सी (फिट्स) नेमकी मेंदूतील कोणत्या भागातून सुरू होते हे अचूक ओळखण्यासाठी उपयुक्त ठरणारी ‘व्हिडिओ-ईईजी’ तपासणी प्रणाली केईएम रुग्णालयात कार्यरत असून तिच्या मदतीने गेल्या २५ वर्षांत सुमारे ७५० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. देशात मोजक्या म्हणजे चार ते पाच ठिकाणीच ही प्रगत यंत्रणा उपलब्ध असून त्यापैकी केईएम रुग्णालय हे एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. सध्याच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत १९९९ मध्ये कंप्रीहेंसिव्ह एपिलिपसी केअर विषय ऑस्ट्रेलियाला शिकून आल्यावर हे केंद्र सुरु करण्यात आले.

दरम्यान औषधोपचारांनंतरही फिट्स नियंत्रणात न येणाऱ्या रुग्णांमध्ये शस्त्रक्रियेचा विचार केला जातो. मात्र त्यासाठी फिट्सचा उगम मेंदूतील नेमक्या कोणत्या भागातून होतो हे शोधणे अत्यंत आवश्यक असते. व्हिडिओ-ईईजी तपासणीत रुग्णाच्या मेंदूतील विद्युत क्रिया आणि त्याचवेळी शरीरातील हालचाली व्हिडिओद्वारे नोंदवल्या जातात. त्यामुळे फिट्स सुरू होण्याचा मेंदूतील भाग ओळखता येतो. या प्रक्रियेत रुग्णाला दोन ते तीन दिवस विशेष निरीक्षण कक्षात ठेवले जाते. काही वेळा फिट्स नोंदवण्यासाठी औषधे कमी केली जातात. त्यावेळी रुग्णाला झटका आल्यास मेंदूतील विद्युत क्रिया ईईजी मशीनमध्ये नोंदवल्या जातात, तर बाह्य हालचाली कॅमेराद्वारे टिपल्या जातात. या दोन्ही नोंदींच्या आधारे डॉक्टर फिट्सचा उगम मेंदूतील कोणत्या भागातून होतो हे निश्चित करतात. त्यानंतर एमआरआय आणि न्यूरोसायकॉलॉजिकल चाचण्यांद्वारे त्या भागाचे परीक्षण करून आवश्यक असल्यास शस्त्रक्रिया केली जाते. व्हिडिओ-ईईजी तपासणीमुळे काही रुग्णांमध्ये चक्कर येणे किंवा झटके मानसिक कारणांमुळे आहेत की एपिलेप्सीमुळे, हेही स्पष्ट होऊ शकते.

Dhule News: धुळ्यातील ४ सरकारी रुग्णालयांचा कायापालट; १५.७२ कोटींतून उभारणार ‘आंतरराष्ट्रीय दर्जाचा’ दवाखाना

रुग्णभार वाढल्याने आणखी एक ‘व्हिडिओ-ईईजी’ मशीन येणार

केईएम रुग्णालयात एपिलेप्सीच्या तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने आणखी एक ‘व्हिडिओ-ईईजी’ मशीन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या रुग्णालयात उपलब्ध असलेल्या यंत्रणेद्वारे अनेक रुग्णांची तपासणी केली जाते. मात्र वाढत्या रुग्णभारामुळे प्रतीक्षा कालावधी वाढू नये यासाठी नवीन मशीन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एपिलेप्सी तपासणीसाठी आणि शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आणखी एक व्हिडिओ-ईईजी मशीन घेण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठात्री डॉ. संगीता रावत यांनी दिली.

“केईएम रुग्णालयात २००१ पासून व्हिडिओ-ईईजी सुविधा उपलब्ध आहे. एपिलेप्सी शस्त्रक्रिया सुरू झाल्यानंतर या तपासणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. देशात केवळ चार ते पाच केंद्रांमध्येच ही सुविधा आहे आणि त्यापैकी केईएम हे एक महत्त्वाचे केंद्र आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आणखी एक व्हिडिओ-ईईजी मशीन घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने आतापर्यंत सुमारे ७५० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत,” अशी माहिती केईएम रुग्णालय अधिष्ठात्री डॉ. संगीता रावत यांनी दिली.

Mumbai Heatwave Alert: मुंबईत उष्णतेचा कडेलोट! 24 तासात अलर्ट बदलला, कुठे किती तापमान? वाचा सविस्तर बातमी

Web Title: At kem t is possible to locate the origin of a seizure through video eeg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • health
  • KEM HOSPITAL
  • Mumbai

संबंधित बातम्या

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम
1

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
2

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Tukaram Mundhe: ‘अल्गोरिदमच्या मागे धावू नका, अल्गोरिदमला लीड करा’; मल्हार २०२६मध्ये तुकाराम मुंढेंचा तरुणांना कानमंत्र
3

Tukaram Mundhe: ‘अल्गोरिदमच्या मागे धावू नका, अल्गोरिदमला लीड करा’; मल्हार २०२६मध्ये तुकाराम मुंढेंचा तरुणांना कानमंत्र

Mumbai Ganeshotsav 2026: लालबागमध्ये यंदा साकारली जाणार २२ फूट उंच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; ज्योतिबाच्या रूपाची अनोखी संकल्पना
4

Mumbai Ganeshotsav 2026: लालबागमध्ये यंदा साकारली जाणार २२ फूट उंच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; ज्योतिबाच्या रूपाची अनोखी संकल्पना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.