नवी मुंबई विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात; ऑगस्टमध्ये टेक ऑफ
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने त्याच्या पहिल्या व्यावसायिक उड्डाण प्रमाणीकरण चाचणीसह कार्यान्वित होण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल काही महिन्यांन पूर्वी उचलले असून नवी मुंबई इंटर नॅशनल विमानतळावरून इंडिगो एअरलाइन्सचे A320 विमान यशस्वीरित्या खाली उतरले होते. विमानतळाची धावपट्टी व इतर कामे आता पूर्ण झाली असून इतर कामे युद्धपातळी सुरू आहेत. येत्या ऑगस्ट महिन्यात उद्घाटन होऊन नवी मुंबई विमाताळवरून पहिले विमान टेक ऑफ होणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितल्याने नवी मुंबई विमानतळाचा मार्ग मोकळा झाला असल्याची चर्चा सुरु आहे.
E-Battery Swapping : मोनो, मेट्रो स्थानकांजवळ ई-बॅटरी स्वॅपिंग; मेट्रोची जपानच्या कंपनीसोबत भागीदारी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ जागतिक दर्जाच्या विमान वाहतूक सुविधाच देणार नाही, तर ते या क्षेत्राचा सर्वांगीण विकासदेखील सक्षम करेल, असे अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल यांनी या आधीच प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
नवी मुंबई विमानतळावर विविध कनेक्टिव्हिटी असणार आहे. मेट्रोसह बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी विमानतळावर असणार आहे. एक्स्प्रेस वे, उपनगरीय रेल्वे, जलमार्गाची कनेक्टिव्हिटी असणार आहे. त्याचा फायदा मुंबई, ठाणे, कल्याण, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला होणार आहे. हे विमानतळ एक माईल्डस्टोन असणार आहे. या विमानतळामुळे मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावरील भारही कमी होणार आहे.
यापूर्वी ११ ऑक्टोबर रोजी सी-२९५ हे भारतीय वायुदलाचे विमान गांधीनगरहून, तर सुखोई ३० हे पुण्यातून आले व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले होते. सी-२९५ विमान एअरक्राफ्टची लेंडिंग आणि सुखोई-३० एअरक्राफ्टची चाचणी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली होती.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उलवा आणि पनवेल दरम्यान १,६०० हेक्टरवर तयार होत आहे. त्यासाठी सिडको नोडेल एजन्सी म्हणून काम करत आहे. पहिल्या टप्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून हा ग्रीनफील्ड एअरपोर्ट प्रोजेक्ट ४ टप्प्यांत पूर्ण होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी त्या विमानतळास दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत कार्यवाही व्हावी, अशी आग्रही मागणी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि रायगड जिल्ह्यातील सर्व प्रकल्पग्रस्त गेली अनेक वर्षे सरकारकडे सातत्याने करत आहेत. त्याकरिता वेगवेगळ्या माध्यमातून अनेकदा आंदोलनेसुद्धा करण्यात आली आहेत, परंतु आता आमदार प्रशांत ठाकूर आणि सर्व प्रकल्पग्रस्तांच्या मागणीला यश आले असून गुगल मॅपमध्ये अनाऊन्समेंट करताना दि. बा.” पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट असा उल्लेख करत असून लवकरच केंद्र सरकारकडून अधिकृतरित्या प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.