रेल्वे स्थानकांवरून साडेपाच लाख वस्तू गेल्या चोरीला; रेल्वे पोलिसांसमोर तपासाचं आव्हान
मुंबईत २०२३ ते आत्तापर्यंत म्हणजेच गेल्या अडीच वर्षांत १७ रेल्वे पोलिस ठाण्यात सध्या तपासाधीन असलेले तब्बल २ हजार २४५ गुन्हे प्रलंबित आहेत. यात २०२३ मध्ये १ गुन्हा, २०२४ मध्ये ५२ गुन्हे आणि २०२५ मधील ६ महिन्यांत २ हजार १९२ गुन्ह्यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलिस ठाणे, दादर, कुर्ला, ठाणे, डोंबिवली, कल्याण, कर्जत, वडाळा, वाशी, पनवेल, चर्चगेट, मुंबई सेंट्रल, बांद्रा, अंधेरी, बोरिवली, वसई आणि पालघर या १७ रेल्वे पोलिस ठाण्यांत २०२३ पासून दाखल झालेल्यांपैकी एकूण २२४५ तपासावरील गुन्हे प्रलंबित आहेत. त्यात २०२३ मध्ये पनवेल रेल्वे पोलिस ठाण्यातील तर २०२४ मधील यातील काही पोलिस ठाण्यातील ५२ गुन्ह्यांचा आणि २०२५ मधील ६ महिन्यांच्या कालावधीतील मिळून २१९२ असे एकूण २२४५ गुन्हे तपासातील प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत आहे.
२०२३ ते आत्तापर्यंत अडीच वर्षात १७ रेल्वे पोलिस ठाण्यांत तब्बल ५ लाख ६५ हजार ४० वस्तु लोकल आणि एक्सप्रेस तसेच फलाटवर चोरीला गेल्या होत्या. त्यातील १ लाख १ हजार ४९० वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या असून, इतर वस्तूंचा अद्याप शोध घेतला जात आहे. यात मोबाईल, दागिने यासह लॅपटॉप आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे या हस्तगत केलेल्या वस्तू या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलीस ठाण्यात १३ हजार ५०० तसेच वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात ८७ हजार ९९० वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. यात केवळ ४ आरोपींना अटक केली असून, इतरांचा शोध घेतला जात आहे.
Mumbai Drugs News: मुंबई विमानतळावर ५१ कोटी ९४ लाखांचे कोकेन जप्त; परदेशी नागरिक अटकेत
जूनच्या पहिल्या दोन दिवसांतही २९ गुन्हे दाखल होऊन त्यातील केवळ २ गुन्हे २४ तासांत उघड झाले असून, उर्वरीत गुन्ह्यांचा समावेश आता पूर्वीच्या प्रलंबित गुन्ह्यांत राहणार आहेत. या प्रलंबित अडीच वर्षांतील गुन्ह्यांत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलीस ठाण्यात २२६, दादर २३४, कुर्ला २१६, ठाणे २४५, डोंबिवली ४०, कल्याण ३००, कर्जत ५०, वडाळा ८१, वाशी ६४, पनवेल ३८, चर्चगेट ४४, मुंबई सेंट्रल २०३, बांद्रा ६८, अंधेरी ७६, बोरिवली
१७५, वसई १५२ आणि पालघर रेल्वे पोलीस ठाण्यातील ३३ गुन्ह्यांचा समावेश आहे.