मोनो, मेट्रो स्थानकांजवळ ई-बॅटरी स्वॅपिंग; मेट्रोची जपानच्या कंपनीसोबत भागीदारी
मुंबईसह राज्यात ई-व्हेईकलला चालना दिली जात असून, मुंबईतील २५ मेट्रो आणि ६ मोनो स्थानकांजवळच ई-बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सुरू करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जपानमधील होंडा पॉवर पॅक एनर्जीसोबत महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरशनने (एमएमएमओसीएल) भागीदारी केली आहे.
मार्केटचा नवा किंग कोण? मार्केट कॅपच्या बाबतीत ‘या’ कंपन्यांना टाकले मागे
एमएमएमओसीएलच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत हे एक मोठे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. पर्यावरणस्नेही ऊर्जा उपाययोजना आणि स्मार्ट लास्ट माईल कनेक्टिव्हिटीला चालना देण्यावर भर देण्यात आला आहे. एमएमआरडीएचे आयुक्त आणि महामुंबई मेट्रोचे अध्यक्ष डॉ. संजय मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली एमएमएमओसीएलच्या २९ व्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकी हे धोरण मंजूर करण्यात आले असून होंडाने त्यांची ई-स्वॅप सिस्टीम बसवण्याचे आश्वासन दिले आहे.
या प्रणालीद्वारे इलेट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहनांचे वापरकर्ते त्यांच्या चार्ज संपलेल्या होंडा मोबाइल पॉवर पॅक ई-बॅटरीऐवजी दुसरी पूर्ण चार्ज केलेली बॅटरी केवळ दोन मिनिटांत घेऊ शकतात.
महाराष्ट्रात इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यास महायुती सरकार कटिबद्ध आहे. मेट्रो आणि मोनो रेल्वे स्थानकांजवळ उभारण्यात येणाऱ्या बॅटरी स्वेंपिंग स्टेशन्समुळे डिलिव्हरी कर्मचारी, रोज प्रवास करणारे नागरिक आणि फ्लीट ऑपरेटर यांना ईव्हीकडे वळण्यास मोठी चालना मिळणार आहे.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
येस बँकेची मोठी घोषणा, १६,००० कोटी रुपये उभारण्यास मान्यता; शेअर्स वधारले
हरित पायाभूत सुविधा ही चैन नाही, तर महाराष्ट्राच्या भविष्यासाठीची गरज आहे. मेट्रो स्थानकांवरील बॅटरी स्वॅपिंगसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून नागरिक आणि पर्यावरणाला प्राधान्य देणार आहोत. एकात्मिक आणि हवामान बदलाच्या आव्हानांशी जुळवून घेत त्यावर मात करणारी वाहतूक व्यवस्था उभारण्यात येणार आहे.
– एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
मेट्रो ७ : गुंदवली, मोगरा, जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव पूर्व, आरे, दिडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, देवी पाडा, राष्ट्रीय उद्यान.
मेट्रो २ ‘ए’ दहिसर पूर्व, आनंद नगर, कांदरपाडा, एक्सर, बोरिवली पश्चिम, शिंपोली, कांदिवली पश्चिम, डहाणूकरवाडी, मालाड
हरित पायाभूत सुविधा ही चैन नाही, तर महाराष्ट्राच्या भविष्यासाठीची गरजआहे.
मोनोरेल स्थानके : संत गाडगे महाराज चौक, मिंट कॉलनी, नायगाव, वडाळा, फर्टिलायझर टाऊनशिप, चेंबूर