Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Panvel News: वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने नागरिक त्रस्त; पनवेलच्या प्रश्नांवर मंत्रालयात खलबतं

पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 09, 2026 | 06:17 PM
वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने नागरिक त्रस्त; पनवेलच्या प्रश्नांवर मंत्रालयात खलबतं

वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने नागरिक त्रस्त; पनवेलच्या प्रश्नांवर मंत्रालयात खलबतं

Follow Us
Follow Us:
  • वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने नागरिक त्रस्त
  • पनवेलच्या प्रश्नांवर मंत्रालयात खलबतं
  • पनवेलमधील वारंवार वीज खंडितीवर मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक
पनवेल :   पनवेल पालिका क्षेत्र तसेच पनवेल ग्रामीण भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारत संताप व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुंबईतील मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली.

महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा विद्युत विभागाच्या मंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर,आमदार महेश बालदी, महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, मंडल अध्यक्ष, नगरसेवक तसेच विद्युत विभाग आणि महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

MNS Protest : ‘सात दिवसांत नाले साफ करा’; कुर्ल्यात मनसे आक्रमक, जनआंदोलनाचा इशारा

बैठकीत पनवेल महानगरपालिका हद्दीतील तसेच पनवेल ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याच्या समस्या, वारंवार होणारी वीज खंडिती, अपुरी यंत्रणा, वाढलेला वीज भार आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींबाबत लोकप्रतिनिधींनी सविस्तर माहिती दिली. नागरिकांच्या व्यथा आणि स्थानिक पातळीवरील समस्यांचे वास्तव चित्र मंत्री महोदयांसमोर मांडण्यात आले.

यावेळी राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विद्युत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत पनवेलमधील वीज समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. ज्या ठिकाणी भूमिगत (अंडरग्राउंड) केबलची आवश्यकता आहे तेथे त्वरित केबल टाकण्यात याव्यात, ज्या भागात नवीन ट्रान्सफॉर्मरची गरज आहे तेथे तातडीने ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावेत तसेच आवश्यक साहित्य आणि निधी उपलब्ध करून देताना कोणत्याही प्रकारची कमतरता ठेवू नये, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पनवेलकरांना अखंडित आणि सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात याव्यात आणि नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात, असेही आदेश बैठकीत देण्यात आले.
या बैठकीमुळे पनवेल शहर व ग्रामीण भागातील वीज समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, कळंबोलीतील विविध सेक्टरमध्ये वारंवार होणाऱ्या केबल फॉल्टमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या बिघाडामुळे सेक्टर 14 आणि सेक्टर 5 ई मधील तब्बल दहा तास वीजपुरवठा खंडित राहिला. यामुळे परिसरातील हजारो नागरिकांना उकाड्यात रात्र जागून काढावी लागली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून महावितरणने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

MMRDA : मान्सूनपूर्व महा मुंबई मेट्रो अलर्ट मोडवर; २,४९६ सीसीटीव्ही अन् २अ, २ब, ७ आणि ९ मार्गिकांवर आराखडा लागू

Web Title: Panvel power cut issues high level meeting ministry mahavitaran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 06:17 PM

Topics:  

  • electricity
  • mahavitaran
  • panvel

संबंधित बातम्या

महावितरणकडून महत्त्वाची बातमी! राज्यात बसवले 1.14 कोटी स्मार्ट मीटर, घरगुती ग्राहकांना प्रति युनिट मिळणार तब्बल ‘इतकी’ सवलत
1

महावितरणकडून महत्त्वाची बातमी! राज्यात बसवले 1.14 कोटी स्मार्ट मीटर, घरगुती ग्राहकांना प्रति युनिट मिळणार तब्बल ‘इतकी’ सवलत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.