
"वनमंत्री गणेश नाईक यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारावा", प्रकाश महाजन यांचा टोला
बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश महाजन यांनी सांगितले की, महाजन पुढे म्हणाले की, नाईक यांचे वय वाढले आहे. नाईक आता नवी मुंबईचे नाही तर फक्त ऐरोलीपुरता नेते राहिले आहेत. बेलापूर विधानसभा नाईक यांच्या हातून गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाईक यांना वनखातं विचारपूर्वक दिलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका आणि बेताल बडबड करण्यापेक्षा नाईक यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारावा, असे महाजन म्हणाले. एकनाथ शिंदे सारख्या शांत आणि सुसंस्कृत नेत्यावर टीका करणे नाईक यांना शोभत नाही, असे महाजन म्हणाले.
राज्यात सुरु असलेल्या लाडकी बहिण योजनेवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा महाजन यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी महिला सक्षमीकरणावर भर दिला होता. त्यासाठी लाडकी बहिण योजना लागू केली. राज ठाकरेंसाठी १५०० रुपये खूपच छोटी रक्कम असेल. त्यांच्याकडील एका एका कुत्र्याचा दिवसाचा खर्च १५०० रुपये असू शकतो, मात्र गरिब लाडक्या बहिणीला १५०० रुपये ही खूप मोठी मदत आहे. उशीरा का होईना राज ठाकरेंनी लाडकी बहिण योजनेचे अप्रत्यक्ष कौतुक केले, असे महाजन म्हणाले.
प्रकाश महाजन पुढे म्हणाले की, संजय राऊत २५ वर्षांपासून खासदार आहेत, पण मराठी माणसासाठी त्यांनी केलेली पाच कामेही ते जनतेसमोर सादर करू शकत नाहीत. खासदार म्हणून राऊत दिल्लीच्या राजकीय वर्तुळात दलाल म्हणून काम करतात असा आरोप त्यांनी केला. राऊत यांची कॉलर पकडणारी महिला कोण होती असा प्रश्नही महाजन यांनी उपस्थित केला. ती उघड करण्याची मागणी त्यांनी केली.
शिवसेना नेत्याने असेही म्हटले की, उभात यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी पदयात्रा काढणारे दिवंगत कार्यकर्ते चिंतामण रुईकर यांच्या कुटुंबालाही भेट दिली नाही, परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच कुटुंबासाठी घर बांधले. त्यांनी उपरोधिकपणे म्हटले की, शिंदेंना दान कसे द्यावे हे माहित आहे, ठाकरे फक्त घेतात.