Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“इलेक्ट्रिक बस बैठक फुसका बार, मंत्र्यांच्या निर्देशाचे अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही”, एसटी कर्मचारी काँग्रेसची टीका

MSRTC Electric Buses: एसटी महामंडळाचा ५१५० विजेवरील बस कंत्राटी पद्धतीने भाडे तत्वावर घेण्याचा प्रकल्प अपयशी ठरल्या नंतरही सरकारी अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 19, 2026 | 01:08 PM
2035 पर्यंत एसटी बसेस पूर्णत: होणार इलेक्ट्रिक; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

2035 पर्यंत एसटी बसेस पूर्णत: होणार इलेक्ट्रिक; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Follow Us
Follow Us:
  • ५१५० विजेवरील बस कंत्राटी पद्धतीने भाडे तत्वावर
  • एसटीला प्रति किलो मीटरला २८ ते ३० रुपये इतका सरासरी तोटा
  • एसटीचा हा तोटा वाढत आहे
मुंबई : एसटी महामंडळाचा ५१५० विजेवरील बस कंत्राटी पद्धतीने भाडे तत्वावर घेण्याचा प्रकल्प अपयशी ठरल्या नंतरही सरकारी अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा होत आहे. तसेच मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांचे निर्देश गांभीर्याने घेतले जात नसतील तर लोकवाहिनीसाठी हे दुर्दैवी असून अधिकाऱ्यांना या प्रकरणी काहीच गांभीर्य दिसून येत नसल्याची टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

या प्रकल्पामुळे एसटीला प्रति किलो मीटरला २८ ते ३० रुपये इतका सरासरी तोटा आहे. एसटीचा हा तोटा वाढत चालल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणी लक्ष घालून हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राज्याच्या मुख्य सचिवांवर अपर मुख्य सचिव परिवहन व अपर मुख्य सचिव वित्त यांच्यासोबत बैठक घेण्याची जबाबदारी निश्चित केली होती.

‘स्वयंघोषित कॅप्टन’च्या ‘त्या’ कृत्याने हादरला महाराष्ट्र; 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त, धार्मिक विधीच्या नावाखाली…

मात्र १७ मार्च रोजी झालेल्या बैठकीत वित्त विभागाचे कुणीही अधिकारी सहभागी झाले नाहीत, अशी माहिती खात्रीशीर मिळत आहे. या बैठकीत मुख्य सचिव यांनी एसटी महामंडळाला या संदर्भात फेर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. एसटी महामंडळाने वारंवार या प्रकरणी पत्रव्यवहार करून आणि परिस्थिती विषद करून सुद्धा मुख्य सचिव पुन्हा एकदा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देत असतील तर त्यांना या प्रकरणी काही गांभीर्य दिसत नाही.त्यामुळे होणाऱ्या तोट्याची रक्कम सरकारने एसटीला द्यावी किंवा हा प्रकल्प रद्द करण्यात येऊन एसटीला स्व मालकीच्या इलेक्ट्रिक बस घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

२०३७ पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांचे राज्य

महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक वाहतूक अत्याधुनिक आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी एक भव्य योजना सादर केली आहे. राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या म्हणण्यानुसार, २०३७ पर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या (MSRTC) सर्व बसेस इलेक्ट्रिक बसेसमध्ये रूपांतरित केल्या जातील. सध्या, महामंडळाकडे अंदाजे २२,००० बसेस आहेत, त्यापैकी ८०० बसेस आधीच इलेक्ट्रिक आहेत. सरकारची योजना केवळ बसेसपुरती मर्यादित नाही. प्रदूषण दूर करून, २०३७ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला ‘ईव्ही हब’मध्ये रूपांतरित करण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे. ही योजना केवळ सरकारी बसेसनाच नव्हे, तर खाजगी आणि व्यावसायिक वाहनांनाही इलेक्ट्रिक मोडकडे वळण्यास प्रोत्साहित करणारी आहे.

Ritu Tawde : मारहाण प्रकरण महापौरांना भोवणार! शाळेतील वादाच्या खटल्यातून निर्दोष मुक्ततेस न्यायालयाचा नकार

Web Title: Project for hiring a st corporation 5150 bus on a contractual fare basis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • msrtc
  • st bus

संबंधित बातम्या

Belhe Bus Stand : बेल्हे बसस्थानक नियंत्रकांच्या प्रतीक्षेत! सात वर्षांपासून वाहतूक नियंत्रक कक्ष कुलूपबंद
1

Belhe Bus Stand : बेल्हे बसस्थानक नियंत्रकांच्या प्रतीक्षेत! सात वर्षांपासून वाहतूक नियंत्रक कक्ष कुलूपबंद

Ganesh Festival 2026: गणपतीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास धक्का धक्कीचा; रेल्वे फुल्ल, एसटी आरक्षणासाठीही धावपळ
2

Ganesh Festival 2026: गणपतीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास धक्का धक्कीचा; रेल्वे फुल्ल, एसटी आरक्षणासाठीही धावपळ

ST Bus Stand: एसटीत ‘स्वच्छता’ फक्त कागदावर? आगार-बसस्थानकांतील स्वच्छतेचा बोजवारा; नव्याने निविदेची मागणी
3

ST Bus Stand: एसटीत ‘स्वच्छता’ फक्त कागदावर? आगार-बसस्थानकांतील स्वच्छतेचा बोजवारा; नव्याने निविदेची मागणी

MSRTC Volvo Buses: एसटीचा प्रवास होणार आणखी ‘लक्झरी’; 200 व्होल्वो बसेससह ऑनलाइन बुकिंग अन् दर्जेदार आतिथ्य सेवा
4

MSRTC Volvo Buses: एसटीचा प्रवास होणार आणखी ‘लक्झरी’; 200 व्होल्वो बसेससह ऑनलाइन बुकिंग अन् दर्जेदार आतिथ्य सेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.