Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डीएस ग्रुपच्या पल्स कँडीचा गणेश महोत्सवाचा उत्साह; ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ मोहिमेला सुरुवात

Pulse Candy DS Group Ganesh Festival 2026 : पल्स कँडीकडून महाराष्ट्रात सलग पाचव्या वर्षी ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ या संकल्पनेअंतर्गत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. १४ ते २३ सप्टेंबर २०२६ दरम्यान मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद आणि जळगाव येथे ग्राहकांच्या सहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 19, 2026 | 06:40 PM
Pulse Candy DS Group Ganesh Festival

Pulse Candy DS Group Ganesh Festival

Follow Us
Follow Us:
  • पल्स कँडीचा बाप्पासाठी खास उपक्रम
  • ‘पल्स से अर्पण, बप्पा को समर्पण’ मोहिमेला सुरुवात
  • बाप्पाला डिजिटल अर्पणाची संधी
मुंबई : यंदाच्या गणेश महोत्सवा निमित्त (धर्मपाल सत्यपाल ग्रुप ( डीएस ग्रुप ) या आघाडीच्या एफएमसीजी समूह आणि बहुव्यवसायिक कंपनीच्या लोकप्रिय ब्रँडपैकी एक असलेल्या पल्स कँडी कडून महाराष्ट्रात सलग पाचव्या वर्षी गणेश महोत्सव साजरा करण्यात येत आहे. ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ या व्यापक ब्रँड संकल्पनेला पुढे नेत हा उत्सव साजरा केला जात आहे.

Disha Salian Case : ‘मातोश्री’बाहेर हायव्होल्टेज ड्रामा; आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियन वकिलांसह दाखल

महाराष्ट्रभर गणपती उत्सवाला लाभलेली सामूहिक भावना, परंपरा आणि भक्ती यांना केंद्रस्थानी ठेवत पल्स कँडीने गेल्या काही वर्षांत आपल्या गणेशोत्सवाच्या संकल्पनेत सातत्याने नवनवीन उपक्रमांची भर घातली आहे. ग्राहकांचा सहभाग अधिक वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण अनुभव निर्माण करण्याबरोबरच उत्सवाच्या मूळ भावनेशीही ब्रँडने सातत्याने नाते कायम ठेवले आहे. ही मोहीम १४ ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद आणि जळगाव या प्रमुख बाजारपेठांमध्ये राबविण्यात येणार आहे.

या व्यापक संकल्पने अंतर्गत ग्राहकांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘ पल्स से अर्पण, बप्पा को समर्पण’ या मोहिमेद्वारे नाविन्यपूर्ण अनुभवाची ही परंपरा पुढे नेण्यात येत आहे. या उपक्रमात भक्तांना परस्परसंवादी आणि मूषकावर आधारित अनुभवाच्या माध्यमातून बाप्पाला वैयक्तिक स्वरूपात डिजिटल अर्पण करण्याची संधी मिळणार आहे. भक्तीची शाश्वत भावना, आधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहकांचा सहभाग यांचा संगम साधत हा उपक्रम पारंपरिक भक्तीला आधुनिक स्वरूप देतो. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत असल्याने प्रत्येक भक्ताला स्वतःच्या इच्छेनुसार बाप्पाला अर्पण करता येणे अनेकदा शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन ‘ पल्स से अर्पण, बप्पा को समर्पण’ ’ या उपक्रमाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर करून भक्तांना बाप्पाला वैयक्तिक डिजिटल अर्पण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

भक्ताने आपले अर्पण तयार केल्यानंतर घंटानाद होतो आणि भगवान गणेशांचे दिव्य दूत असलेला मूषक विविध आकर्षक दृश्यरूपांमध्ये प्रकट होऊन भक्ताने निवडलेले अर्पण बाप्पा पर्यंत पोहोचवतो. या संपूर्ण प्रवासाच्या शेवटी पडद्यावर अर्पण पूर्ण झाल्याची पुष्टी केली जाते. त्यामुळे भक्तांसाठी हा एक संस्मरणीय आणि वैयक्तिक अनुभव ठरतो.या विशेष अनुभवात आणखी एक अर्थपूर्ण भर म्हणून सहभागी ग्राहकांना पल्स कँडी चे पाकीट आणि ब्रँडेड, लागवड करता येणाऱ्या बियांच्या कागदापासून तयार केलेले कार्ड प्रतीकात्मक आशीर्वाद म्हणून देण्यात येणार आहे.

व्हाट्सअप च्या माध्यमातून सहभागी होणाऱ्या ग्राहकांना वैयक्तिक स्वरूपातील गणपती शुभेच्छा संदेशही प्राप्त होणार असून, त्यामुळे डिजिटल अनुभवाला आणखी व्यापक स्वरूप मिळणार आहे.याशिवाय, मोहिमेच्या मायक्रो साइटवर उपलब्ध असलेल्या डिजिटल अर्पणाच्या अनुभवाच्या माध्यमातूनही ग्राहकांना सहभागी होता येणार आहे. त्यामुळे ग्राहक कुठूनही या मोहिमेचा भाग बनू शकतात.

या मोहिमेबद्दल बोलताना, डीएस (DS) ग्रुपच्या कन्फेक्शनरी विभागातील मार्केटिंगचे वरिष्ठ महाव्यवस्थापक आशिष भार्गव म्हणाले, “गणेश महोत्सव हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या उत्सवामागील भावना, भक्ती आणि सांस्कृतिक वैशिष्ट्य आम्ही डीएस ग्रुप मध्ये मनापासून समजून घेतो. सलग पाचव्या वर्षी लालबागचा राजा यांच्याशी जोडले जाणे हा ब्रँडसाठी अभिमानाचा क्षण असून, ग्राहकांशी अर्थपूर्ण नाते निर्माण करण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे प्रतिबिंब आहे.

पल्स कँडी साठी अशा सांस्कृतिक क्षणांमधून ‘प्लस ऑफ इंडिया’ ही व्यापक संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळते. भारताला वैशिष्ट्यपूर्ण बनविणाऱ्या विविध भावना, परंपरा आणि अभिव्यक्तींचा उत्सव साजरा करणारे हे व्यासपीठ आहे. सण-उत्सव आणि प्रादेशिक परंपरांपासून ते लोकांना एकत्र आणणाऱ्या दैनंदिन क्षणांपर्यंत, ‘प्लस ऑफ इंडिया’च्या माध्यमातून आम्हाला देशाशी अस्सल, संबंधित आणि विशिष्ट प्लस अनुभवाच्या माध्यमातून जोडले जाण्याची संधी मिळते.

यंदा पल्स से अर्पण, बप्पा को समर्पण’ या उपक्रमाद्वारे आम्ही ही संकल्पना आणखी पुढे नेत आहोत. अर्पणाच्या शाश्वत परंपरेला आधुनिक स्वरूप देत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भक्तांसाठी वैयक्तिक आणि सहभागात्मक अनुभव निर्माण केला जात आहे.भारताचा उत्सव साजरा करण्याची पल्स कँडी ची पद्धत सातत्याने विकसित होत असताना, देशातील विविध सांस्कृतिक भावनांचे अधिक व्यापक आणि सहभागी स्वरूपात दर्शन घडविणे, तसेच ग्राहकांना स्वतःचा वाटेल असा अर्थपूर्ण अनुभव देणे, हा आमचा प्रयत्न आहे.”

डीएस ग्रुप विषयी

धर्मपाल सत्यपाल ग्रुप (डीएस ग्रुप) हा भारतातील आघाडीच्या एफएमसीजी समूहांपैकी एक असून, भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही भक्कम उपस्थिती असलेला बहुव्यवसायिक समूह आहे. १९२९ मध्ये स्थापन झालेल्या या समूहाने उल्लेखनीय इतिहास आणि वारसा यांची सांगड दूरदृष्टीपूर्ण विकासाशी घालत यशस्वी व्यवसायाची प्रेरणादायी वाटचाल केली आहे. (डीएस ग्रुप) च्या विविध व्यवसायांमध्ये खाद्यपदार्थ आणि पेये, कन्फेक्शनरी, माउथ फ्रेशनर, हॉस्पिटॅलिटी, कृषी, लक्झरी रिटेल तसेच इतर गुंतवणुकींचा समावेश आहे. कॅच, पल्स, पास पास, सिल्व्हर पर्ल्स, क्षीर, रजनीगंधा, ओविनो, एल’ओपेरा, ले मार्चे, बर्थराईट, लव्हइट, चिंगल्स, गोलमोल आणि नमः हे समूहाचे काही प्रमुख ब्रँड आहेत.

एक कॉर्पोरेट संस्था म्हणून (डीएस ग्रुप) समाजासाठी योगदान देणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे या सामूहिक हिताच्या मजबूत मूल्यांवर आधारित तत्त्वांनी मार्गदर्शित आहे.
(डीएस ग्रुप) च्या मुख्यालयाला USGBC (US Green Building Council) च्या विद्यमान इमारतींच्या ऑपरेशन आणि देखभाल कार्यक्रमाच्या आवृत्ती ४.० अंतर्गत LEED Platinum प्रमाणपत्र मिळाले आहे. तसेच (डीएस ग्रुप) च्या मुख्यालयाला USGBC कडून LEED Zero Carbon Certification देखील प्राप्त झाले आहे.

जागतिक पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासनविषयक (ESG) प्राधान्यक्रमांशी आपल्या आर्थिक कामगिरीची सांगड घालत (डीएस ग्रुप) ने आपल्या सर्व व्यवसायांमध्ये ‘Double Materiality Assessment’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, भारतातील ३० ठिकाणी कार्यरत असलेल्या समूहाच्या विविध व्यवसायांमध्ये (डीएस ग्रुप) चा Water Positivity Index 1.8 इतका आहे.

Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला अन्…; कुटुंबाने एकुलता एक कर्ता मुलगा गमावला

Web Title: Pulse candy ds group ganesh festival 2026 digital arpan campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026
  • Ganpati Festival

संबंधित बातम्या

अन्नातील भेसळीवर थेट वार! तुकाराम मुंढेंच्या कडक शिस्तीला पुण्याच्या गणेश मंडळांची अनोखी साथ
1

अन्नातील भेसळीवर थेट वार! तुकाराम मुंढेंच्या कडक शिस्तीला पुण्याच्या गणेश मंडळांची अनोखी साथ

Ganeshotsav 2026: अरे देवा! गणेशोत्सवातील DJ, लाऊडस्पीकर अन् ढोल-ताशांचा आवाज हायकोर्टात; नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची मागणी
2

Ganeshotsav 2026: अरे देवा! गणेशोत्सवातील DJ, लाऊडस्पीकर अन् ढोल-ताशांचा आवाज हायकोर्टात; नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची मागणी

Dadar Ganpati Visarjan: दादरच्या विसर्जनस्थळी गोंधळ? ‘VIP लोकांना वाट मोकळी, आम्हालाच अडवता’; VIDEO व्हायरल
3

Dadar Ganpati Visarjan: दादरच्या विसर्जनस्थळी गोंधळ? ‘VIP लोकांना वाट मोकळी, आम्हालाच अडवता’; VIDEO व्हायरल

Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला अन्…; कुटुंबाने एकुलता एक कर्ता मुलगा गमावला
4

Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला अन्…; कुटुंबाने एकुलता एक कर्ता मुलगा गमावला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.