Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raj Thackeray : येत्या 27 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्र या! राज ठाकरेंनी दिले आदेश, काय घोषणा करणार?

राज ठाकरेंनी मनसैनिकांना येत्या 27 तारखेला शिवाजी पार्कवर मोठ्या संख्येनं एकत्र जमण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये मोठ्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 20, 2025 | 11:50 PM
येत्या 27 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्र या! राज ठाकरेंनी दिले आदेश, काय घोषणा करणार?

येत्या 27 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्र या! राज ठाकरेंनी दिले आदेश, काय घोषणा करणार?

Follow Us
Close
Follow Us:

राज ठाकरेंनी मनसैनिकांना येत्या 27 तारखेला शिवाजी पार्कवर मोठ्या संख्येनं एकत्र जमण्याचे आदेश दिले आहेत.केंद्रानं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतरचा पहिलाच मराठी भाषा दिन यंदा साजरा होत आहे. हीच संधी साधून आगामी काळात मराठी भाषेचा मुद्दा मनसे उचलून धरण्याच्या हेतूनं मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये मोठ्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. याचमुळे मनसैनिकांना राज ठाकरेंनी यंदा मराठी भाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करायचा असून या सोहळ्याला सहकुटुंब या, असं आवाहन केलं आहे.

राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनसेची मुंबईत गुरुवारी(ता.20)महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी मनसेच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या धर्तीवर महत्वाच्या सूचना केल्या. तसेच यावेळी त्यांनी संघटनात्मक बदलाचे संकेतही दिले. मुंबई महापालिका निवडणुकीसह मनसेच्या पुढील राजकीय दिशा,ध्येयधोरणं,यांसह रणनीतीवरही ठाकरेंनी यावेळी भाष्य केलं.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर विधानसभेला मनसेनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.राज्यात मुंबई-पुणे-नाशिक या मोठ्या शहरांसह तब्बल दीडशेच्या आसपास उमेदवारही रिंगणात उतरवले. राज ठाकरेंनी आपली पूर्ण ताकद लावली. दौरे,सभा,मेळावे,बैठका यांनी मनसेला बळही दिलं. पण महायुतीच्या लाटेसमोर मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी मनसैनिकांना मोठा आदेश दिला आहे.

केंद्र सरकारकडून घटस्थापनेच्या दिवशीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर पसरलेल्या तमाम मराठी जनांचं अतिशय मनापासून अभिनंदन, अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली होती.

केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले होते.राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीआधी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची अपेक्षा जाहीरपणे व्यक्त केली होती. मोदी हे पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी जो पाठींबा दिला होता,त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी ही ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा’,असंही त्यावेळी राज ठाकरेंनी म्हटलं होतं.

 

Web Title: Raj thackeray call mns worker gathering on shivaji park in 27 feb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 11:50 PM

Topics:  

  • Maharashtra Local Body Election
  • mns news
  • raj thackeray

संबंधित बातम्या

‘तुझं माझं पटेना अन्…; गुहागरमध्ये भाजपा-शिवसेनेत प्रतिष्ठा पणाला, दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल
1

‘तुझं माझं पटेना अन्…; गुहागरमध्ये भाजपा-शिवसेनेत प्रतिष्ठा पणाला, दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल

Local Body Election: भाजपचे नियोजन अन् कॉँग्रेस कचाट्यात…;  चिपळूणमध्ये ‘इतके’ अर्ज अवैध
2

Local Body Election: भाजपचे नियोजन अन् कॉँग्रेस कचाट्यात…; चिपळूणमध्ये ‘इतके’ अर्ज अवैध

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ
3

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ

Maharashtra Local Body Election : एक नगराध्यक्ष, २३ नगरसेवकांसाठी ३५ केंद्रांवर मतदान! धरणगावात प्रशासनाची तयारी पूर्ण
4

Maharashtra Local Body Election : एक नगराध्यक्ष, २३ नगरसेवकांसाठी ३५ केंद्रांवर मतदान! धरणगावात प्रशासनाची तयारी पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.