Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाणीकपातीचा निर्णय रद्द करा, अन्यथा…; मनसेचे पुणे महापालिका प्रशासनाला निवेदन

पुणे महापालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तातडीने रद्द करून पुणेकरांना नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 15, 2026 | 06:50 PM
पाणीकपातीचा निर्णय रद्द करा, अन्यथा...; मनसेचे पुणे महापालिका प्रशासनाला निवेदन

पाणीकपातीचा निर्णय रद्द करा, अन्यथा...; मनसेचे पुणे महापालिका प्रशासनाला निवेदन

Follow Us
Follow Us:
  • पाणीकपातीचा निर्णयावरुन मनसे आक्रमक
  • पाणीकपातीचा निर्णय रद्द करा
  • मनसेचे महापालिका प्रशासनाला निवेदन
पुणे : धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही पुणे महापालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तातडीने रद्द करून पुणेकरांना नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मनसेचे पुणे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे. या मागणीसाठी मनसेतर्फे मटका फोड आंदोलनही करण्यात आले.

 

खडकवासला धरणातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्या आणि वितरण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याचा दावा मनसेने केला आहे. जलवाहिन्यांची तपासणी करून गळती तातडीने दुरुस्त करावी, अशी मागणी करण्यात आली. बांधकामे आणि रस्त्यांवरील दुभाजकांच्या देखभालीसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले. बांधकामांसाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर बंधनकारक करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा : प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

नियोजनातील त्रुटींचा भार नागरिकांवर का?

आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवस कमी दाबाने किंवा अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. विशेषतः उंचावरील भागांत पाणी पोहोचत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटींची शिक्षा नागरिकांना का, असा सवाल मनसेने उपस्थित केला.

हे सुद्धा वाचा : ‘छत्रपती’चा गळीत हंगाम सुरू, ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; सभासदांसह गेटकेन ऊसालाही समान दर देण्याची ग्वाही

💡

Frequently Asked Questions

  • Que: एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय का घेतला?

    Ans: पुणे महापालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असताना हा निर्णय घेण्याची गरज काय, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केला आहे.

  • Que: पुणेकरांसाठी मनसेने कोणती मागणी केली आहे?

    Ans: पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय तातडीने रद्द करून पुणेकरांना नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी मनसेने केली आहे.

  • Que: पुण्यात पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर मनसेने कोणते आंदोलन केले?

    Ans: पाणीपुरवठ्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी मनसेतर्फे मटका फोड आंदोलन करण्यात आले. तसेच मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ संभाजी बाबर यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन दिले.

Web Title: The mns has issued a warning to the pune municipal corporation administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • mns news
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Rapido पुण्यात मोठा झटका! बाइक टॅक्सी सेवा बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नेमकं कारण काय?
1

Rapido पुण्यात मोठा झटका! बाइक टॅक्सी सेवा बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नेमकं कारण काय?

PFRDA Pune NPS News: पुण्यात ‘एनपीएस’चा मोठा डंका!; १२,१७१ कोटींची मालमत्ता जमा, PFRDA चे सदस्य संजय पांडेंची माहिती
2

PFRDA Pune NPS News: पुण्यात ‘एनपीएस’चा मोठा डंका!; १२,१७१ कोटींची मालमत्ता जमा, PFRDA चे सदस्य संजय पांडेंची माहिती

शिवणे–नांदेड सिटीदरम्यान पूल उभारण्याचा मार्ग मोकळा, महापालिकेची तांत्रिक मान्यता; कामासाठी हालचालींना वेग
3

शिवणे–नांदेड सिटीदरम्यान पूल उभारण्याचा मार्ग मोकळा, महापालिकेची तांत्रिक मान्यता; कामासाठी हालचालींना वेग

Pune Metro : हिंजवडी मेट्रो दिवाळीआधी सुरु होणार? 3 नोव्हेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता
4

Pune Metro : हिंजवडी मेट्रो दिवाळीआधी सुरु होणार? 3 नोव्हेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.