Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज ठाकरे उद्या बदलापूरकरांच्या भेटीला येणार; बदलापूरमधील घटनेबाबत नागरिकांशी संवाद साधणार

बदलापूर शाळेच्या सफाई कामगाराने तीन आणि चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्राने तीव्र संताप व्यक्त केला. आरोपीला फाशी देण्याची मागणी महाराष्ट्रात जोर धरू लागली आहे. या सर्व प्रकारानंतर उद्या राज ठाकरे बदलापूर वासीयांची भेट घेणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 25, 2024 | 01:06 PM
राज ठाकरे उद्या बदलापूरकरांच्या भेटीला येणार; बदलापूरमधील घटनेबाबत नागरिकांशी संवाद साधणार (फोटो सौजन्य - सोशल मिडीया)

राज ठाकरे उद्या बदलापूरकरांच्या भेटीला येणार; बदलापूरमधील घटनेबाबत नागरिकांशी संवाद साधणार (फोटो सौजन्य - सोशल मिडीया)

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या सोमवारी 26 ऑगस्ट रोजी बदलापूरकरांच्या भेटीला येणार आहेत. बदलापूरमध्ये झालेल्या घटनेनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे बदलापूरमध्ये येणार आहेत. यावेळी ते बदलापूरमध्ये झालेल्या घटनेबाबत नागरिकांशी संवाद साधणार आहेत. उद्या 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राज ठाकरे बदलापूरकरांची भेट घेणार आहेत. आदिती बँक्वेट हॉल, शामराव विठ्ठल बँक, स्टेशन रोड, सानेवाडी, बदलापूर पश्चिम या ठिकाणी राज ठाकरे बदलापूरमधील नागरिकांची भेट घेणार आहेत. याबाबत ठाण्यामधील मनसेचे अविनाश जाधव यांनी त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटवर माहिती दिली आहे.

हेदेखील वाचा- बदलापूर घटनेच्या निषेधार्थ कणकवलीत मविआचे आंदोलन; काळ्या फिती बांधत सरकार विरोधात घोषणाबाजी

बदलापूरमधील घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. आरोपी अक्षय शिंदेला फाशी द्या, अशी मागणी केली जात आहे. यासाठी बदलापूरमधील नागरिकांनी आंदोलन देखील केलं होतं. बदलापूरमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आतापर्यंत राज ठाकरेंनी कठोर भुमिका घेतली आहे. त्यांनी सोशल मिडीयावर अनेक पोस्ट देखील केल्या आहेत, तसेच या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला कठोर शिक्षा देण्याची मागणी देखील राज ठाकरेंनी केली आहे. या घटनेनंतर सुरु असणाऱ्या राजकारणावरून देखील राज ठाकरे यांनी टिका केली होती.

विदर्भाच्या दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केलं होते. याप्रकणावरून देखील राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता.

हेदेखील वाचा- बदलापूर अत्याचार प्रकरणी मुंबई कोर्टात सुनावणी, सरकारला अहवाल सादर करण्याचे निर्देश

राज ठाकरे म्हणाले होते की, महाविकास आघाडीचे सरकार असतानाही महिलांवरील अत्याचाराच्या घटना होत होत्या. ज्यांनी बंद पुकारला होता, त्यांच्याही काळात या घटना घडल्या होत्या. आज जी प्रकरणे एकामागोमाग उघडकीस येत आहे त्यामागे काही राजकारण आहे का? येणाऱ्या निवडणुका आहेत का? निवडणुका आल्या की सरकारला बदनाम करा असे सुरू आहे. मविआ सरकारच्या काळात असे होतेच की, त्याचे काय करणार? या सर्व प्रकारानंतर उद्या राज ठाकरे बदलापूर वासीयांची भेट घेणार आहेत. बदलापूरमधील आदिती बँक्वेट हॉल या ठिकाणी ही भेट होणार आहे. या भेटीवेळी राज ठाकरे बदलापूरमधील जनतेशी काय बोलणार, आरोपी अक्षय शिंदेला शिक्षा होण्यासाठी कोणती ठोस पावलं उचलली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

काय आहे प्रकरण?

बदलापूर, ठाणे येथे शाळेच्या सफाई कामगार आरोपी अक्षय शिंदेने तीन आणि चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली. आरोपीला फाशी द्यावी, या मागणीसाठी बदलापूरमधील नागरिकांनी मंगळवारी बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन केलं. यावेळी नागरिकांनी शाळेची आणि अक्षय शिंदेच्या घराची देखील तोडफोड केली. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाळेवर कारवाईचे आश्वासन देत या प्रकरणाची त्वरीत चौकशी केली जाईल आणि दोषींना सोडले जाणार नाही, असे सांगितले. आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Raj thackeray is coming in badalapur tomorrow for discuss about badlapur school case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2024 | 01:05 PM

Topics:  

  • Badlapur case
  • Badlapur school case
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Raj Thackeray: ‘रावणाला 1 लाख मुलं, दीड लाख नातवंडं; मग तो कधी जेवत होता की नाही?’ राज ठाकरेंचा हटके प्रश्न अन् एकच हशा पिकला
1

Raj Thackeray: ‘रावणाला 1 लाख मुलं, दीड लाख नातवंडं; मग तो कधी जेवत होता की नाही?’ राज ठाकरेंचा हटके प्रश्न अन् एकच हशा पिकला

‘गणपतीत दंगली घडवण्याचा ‘प्लॅन’? राज ठाकरेंनंतर आदित्य ठाकरेही आक्रमक; म्हणाले, ‘कुठेतरी षडयंत्र दिसतंय!’
2

‘गणपतीत दंगली घडवण्याचा ‘प्लॅन’? राज ठाकरेंनंतर आदित्य ठाकरेही आक्रमक; म्हणाले, ‘कुठेतरी षडयंत्र दिसतंय!’

Gunratna Sadawarte : ‘आधी शिवसेना भवनातील बाळासाहेबांचा फोटो काढा, नाहीतर..,’; सदावर्तेंचा थेट इशारा, 15 दिवसांची डेडलाइन
3

Gunratna Sadawarte : ‘आधी शिवसेना भवनातील बाळासाहेबांचा फोटो काढा, नाहीतर..,’; सदावर्तेंचा थेट इशारा, 15 दिवसांची डेडलाइन

DJ Ban Controversy : ‘राज ठाकरेंच्या डोक्याचा खोका खाली आहे का?’; DJ बंदीवरून गुणरत्न सदावर्तेंचा घणाघाती हल्ला
4

DJ Ban Controversy : ‘राज ठाकरेंच्या डोक्याचा खोका खाली आहे का?’; DJ बंदीवरून गुणरत्न सदावर्तेंचा घणाघाती हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.