Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्यात तीन महिन्यांत तीनवेळा भेटीगाठी; महापालिका निवडणूक एकत्र लढवणार?

गेल्या दोन महिन्यांत दोन्ही भावांची सार्वजनिक भेट होण्याची ही तिसरी वेळ होती, त्यामुळे दोन्ही पक्षांमधील संबंध सुधारण्याच्या अटकळांना वेग आला आहे. राज ठाकरे यांनी नोव्हेंबर २००५ मध्ये शिवसेना सोडली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 25, 2025 | 07:16 AM
हास्यविनोद करताना कॅमेऱ्यात कैद महापालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या चर्चाना वेग दोन महिन्यांत राज-उद्धव तिसऱ्यांदा भेटले * मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांचे चुलत भाऊ आणि शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत एका लग्न समारंभात भेट झाली, मागील काही आठवड्यांमधील ही तिसरी भेट आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी दोघांमधील राजकीय मतभेद मिटण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राजकीयदृष्ट्या वेगळे असलेले हे दोन्ही भाऊ रविवारी संध्याकाळी अंधेरी येथे सरकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्न समारंभात एकत्र दिसले. लग्न समारंभात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची भेट घेतली. दोघेही एकमेकांशी बोलताना दिसले. यावेळी मीडियाच्या कॅमेऱ्यांनी रश्मी ठाकरे यांना राज ठाकरेंसोबत हसताना कैद केले. दोन्ही पक्षांची अस्तित्वाची लढाई गेल्या दोन महिन्यांत दोन्ही भावांची सार्वजनिक भेट होण्याची ही तिसरी वेळ होती, त्यामुळे दोन्ही पक्षांमधील संबंध सुधारण्याच्या अटकळांना वेग आला आहे. राज ठाकरे यांनी नोव्हेंबर २००५ मध्ये शिवसेना सोडली. पुढील काही महिन्यातच ९ मार्च २००६ रोजी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतःचा पक्ष स्थापन केला. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा भाग असलेल्या शिवसेनेने (यूबीटी) अवघ्या २० जागा जिंकल्या होत्या तर मनसे स्वतंत्र निवडणूक लढली होती, त्यांना एकही जागा मिळाली नाही. दोन्ही पक्षांच्या दृष्टीने सध्या अस्तित्वाची लढाई निर्माण झाली आहे. मुंबईतील आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्यातील जवळीक महत्वाची मानली जात आहे. यापूर्वी दोघे केव्हा भेटले होते ? गेल्या दोन दशकांपासून दोन्ही भाऊ एकमेकांवर टोकाची टीका करत आले आहेत. परंतु अलीकडेच दोन्ही भावांमधील भेटीचे फोटो समोर आले आहेत, त्यात दोघेही मोकळेपणाने बोलत हास्यविनोद करताना दिसत आहेत. १५ डिसेंबर २०२४ रोजी ठाकरे बंधूंना मुंबईतील ताज लँड एंड येथे रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांचा मुलगा शौनक पाटणकर यांच्या लग्नात पाहिले गेले. यानंतर २२ डिसेंबर २०२४ रोजी दोन्ही भाऊ दादर येथील राजे शिवाजी शाळेत राज ठाकरे यांची बहीण जयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नात भेटले होते. आता २३ फेब्रुवारी २०२५ रोजी अंधेरी येथे महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात राज आणि उद्धव ठाकरे यांनी केवळ अनौपचारिक संवाद साधला नाही तर हास्यविनोद करताना दिसले.

Close
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून टीकाटिप्पणी केली जात आहे. असे असताना आता चर्चा सुरु आहे ती ठाकरे बंधूंच्या भेटीची. मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांचे बंधू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत एका लग्न समारंभात भेट झाली, मागील काही आठवड्यांमधील ही तिसरी भेट आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी दोघांमधील राजकीय मतभेद मिटण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, राजकीयदृष्ट्या वेगळे असलेले हे दोन्ही भाऊ रविवारी संध्याकाळी अंधेरी येथे सरकारी अधिकारी यांच्या मुलाच्या लग्न समारंभात एकत्र दिसले. लग्न समारंभात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची भेट घेतली. दोघेही एकमेकांशी बोलताना दिसले. यावेळी मीडियाच्या कॅमेऱ्यांनी रश्मी ठाकरे यांना राज ठाकरेंसोबत बोलताना कैद केले.

दोन्ही पक्षांची अस्तित्वाची लढाई

गेल्या दोन महिन्यांत दोन्ही भावांची सार्वजनिक भेट होण्याची ही तिसरी वेळ होती, त्यामुळे दोन्ही पक्षांमधील संबंध सुधारण्याच्या अटकळांना वेग आला आहे. राज ठाकरे यांनी नोव्हेंबर २००५ मध्ये शिवसेना सोडली. पुढील काही महिन्यातच ९ मार्च २००६ रोजी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतःचा पक्ष स्थापन केला.

20 जागांवर समाधान

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा भाग असलेल्या शिवसेनेने (यूबीटी) अवघ्या 20 जागांवर समाधान मानावे लागले. तर मनसे स्वतंत्र निवडणूक लढली होती, त्यांना एकही जागा मिळाली नाही. दोन्ही पक्षांच्या दृष्टीने सध्या अस्तित्वाची लढाई निर्माण झाली आहे. मुंबईतील आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्यातील जवळीक महत्वाची मानली जात आहे.

डिसेंबर महिन्यातही झाली भेट

१५ डिसेंबर २०२४ रोजी ठाकरे बंधूंना मुंबईतील ताज लँड एंड येथे रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांचा मुलगा शौनक पाटणकर यांच्या लग्नात पाहिले गेले. यानंतर २२ डिसेंबर २०२४ रोजी दोन्ही भाऊ दादर येथील राजे शिवाजी शाळेत राज ठाकरे यांची बहीण जयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नात भेटले होते. आता २३ फेब्रुवारी २०२५ रोजी अंधेरी येथे महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात राज आणि उद्धव ठाकरे यांनी केवळ अनौपचारिक संवाद साधला नाही तर हास्यविनोद करताना दिसले. या सर्व घडामोडीनंतर राजकीय स्तरावर चर्चांना उधाण आले आहे.

Web Title: Raj thackeray uddhav thackeray met three times in three months nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2025 | 07:10 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • raj thackeray
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल
1

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?
2

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
3

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?
4

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.