Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thackeray Brothers manifesto: महापालिकेसाठी आज ठाकरे बंधूंचा संयुक्त जाहीरनामा; १६ मुद्द्यांत मुंबईचा विकास

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. या निमित्ताने राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर शिवसेना भवनात पाऊल ठेवणार आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Jan 04, 2026 | 02:32 PM
MNS-Shiv Sena joint manifesto

MNS-Shiv Sena joint manifesto

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रातल्या मिनी विधानसभा म्हणजेच 29 महापालिका निवडणुका
  • मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे बंधुंचा जाहीरनामा
  • राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर शिवसेना भवनात पाऊल ठेवणार
Thackeray Brothers manifesto:  महाराष्ट्रातल्या मिनी विधानसभा म्हणजेच 29 महापालिका निवडणुका पार पडणार आहेत. येत्या १५ जानेवारी मतदान आणि १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पक्षांचा म्हणजेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि मनसे यांचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित केला जाणार आहे. या सगळ्यात सर्वात लक्षणीय बाब म्हणजे, मनसे प्रमुख राज ठाकरे या निमित्ताने २० वर्षांनी शिवसेना भवनात पाऊल ठेवणार आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे बंधुंकडून १६ मुद्द्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आमदार आदित्य ठाकरे व मनसे नेते अमित ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच संयुक्तपणे या १६ मुद्द्यांचं प्रेझेंटेशन केलं होतं. त्यात काही मुंबईच्या विकासाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी मांडल्या होत्या. ठाकरे बंधूंच्या युतीच्या २२७ उमेदवारांसमोर आदित्य आणि अमित ठाकरेंनी हे प्रेझेंटेशन दिले होते. या सगळ्या घडामोडींनंतर आज मुंबईसाठी ठाकरे बंधूं निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करतील. त्यामुळे या जाहीरनाम्यात नेमकं काय असेल, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

राज ठाकरे २० वर्षांनंतर शिवसेना भवनात दाखल होणार

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. या निमित्ताने राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर शिवसेना भवनात पाऊल ठेवणार असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्रितपणे सहा प्रचारसभा घेणार आहेत. दुसरीकडे, आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही प्रचार दौरा सुरू होणार आहे. ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यात वीजबिल सवलत, बेस्ट बसचे दर, पाळणाघर सुविधा तसेच शासकीय महाविद्यालयांबाबत मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जाहीरनाम्यात कोणते मुद्दे असण्याची शक्यता?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध होणाऱ्या जाहीरनाम्यात अनेक लोकाभिमुख आणि विकासात्मक मुद्द्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर (प्रॉपर्टी टॅक्स) माफ करण्याचा प्रस्ताव असू शकतो. तसेच १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणाही अपेक्षित आहे.

घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव असून, कोळी महिलांसाठी ‘माँसाहेब किचन’मधून केवळ १० रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्याचा मुद्दा जाहीरनाम्यात असू शकतो. तरुणांसाठी रोजगार सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याची घोषणाही करण्यात येण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने बेस्ट बसचे तिकीट दर ५ ते १० रुपये तसेच १५ ते २० रुपये या दरम्यान स्थिर ठेवण्याचा प्रस्ताव अपेक्षित आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पाळणाघर उभारण्यात येणार असून, पालिकेच्या शाळांमध्ये ज्युनिअर कॉलेज सुरू करण्यात येतील, असा मुद्दाही समाविष्ट असू शकतो.

याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने भव्य ग्रंथालय उभारण्याची घोषणा, प्रत्येक प्रभागात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची निर्मिती, मुंबई महानगरपालिकेतर्फे मोफत पार्किंग सुविधा, तसेच बीपीटीच्या १,८०० जागांवर गिफ्ट सिटीच्या धर्तीवर विकासकामे करण्याचा प्रस्ताव जाहीरनाम्यात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

संजय राऊत म्हणाले की, आज राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर शिवसेना भवनात येणार आहेत. आजच ठाकरे बंधूंचा वचननामा जाहीर केला जाणार असून, त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. तसेच दोन्ही ठाकरे बंधू मुंबईतील शाखा-शाखांना भेटी देणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले. मनसेच्या तसेच शिवसेनेच्या शाखांना भेट देत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचे काम राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे करणार आहेत. सभा आणि प्रचार दौऱ्यांमधून वेळ मिळेल त्यानुसार मुंबईतील विविध शाखांना भेटी दिल्या जातील, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Thackeray brothers manifesto ahead of maharashtra civic polls thackeray brothers to release joint manifesto raj thackeray returns to shiv sena bhavan after 20 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • MNS Raj Thackeray
  • Uddhav Thackaray

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Pune Visit: राहुल गांधीं आज पुणे दौऱ्यावर; तरुणांशी साधणार संवाद,दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क
1

Rahul Gandhi Pune Visit: राहुल गांधीं आज पुणे दौऱ्यावर; तरुणांशी साधणार संवाद,दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क

Maharashtra Breaking News Today 2026:  NEET, अन् ‘वंदे मातरम्’वरून राजकीय घमासान, राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर
2

Maharashtra Breaking News Today 2026: NEET, अन् ‘वंदे मातरम्’वरून राजकीय घमासान, राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर

Maharashtra Politics: फडणवीसांची सावध पाऊले; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार का घेतला स्वतःकडे?
3

Maharashtra Politics: फडणवीसांची सावध पाऊले; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार का घेतला स्वतःकडे?

Navi Mumbai bars closed: नवी मुंबईत रात्रीचे बार, हॉटेल आणि क्लब बंद? ‘तोंडी आदेश’ नेमका कुणाचा, चर्चांना उधाण
4

Navi Mumbai bars closed: नवी मुंबईत रात्रीचे बार, हॉटेल आणि क्लब बंद? ‘तोंडी आदेश’ नेमका कुणाचा, चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.