मिरा-भाईंदरहून थेट मुंबईत पोहचता येणार; मेट्रो-७ अ लवकरच सेवेत होणार
मुंबईसह उपनगरात मेट्रोचे जाळे पसरत आहे. उपनगरामध्ये विविध भागात मेट्रोचे काम सुरू आहे. मुंबईमध्ये मेट्रो-३ या मार्गिकेसह आणखी एक भुयारी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. मेट्रो-७ अ च्या १.६५ किमी अपलाईन बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंबईतील दुसरी भुयारी मेट्रो मार्गिका लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या मेट्रोमुळे मिरा-भाईंदरहून थेट मुंबई गाठता येणार आहे. दुसरी भुयारीमेट्रोमार्गिका असलेल्या शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व ७ अ मार्गिकेच्या भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या मेट्रोमार्गिकेवरील १.६५ किमी लांबीच्या अपलाइन बोगद्याचे भुयारीकरण सोमवारी पूर्ण झालं आहे.
Central Railway: मध्य रेल्वेवर गणपती विशेष गाड्यांची घोषणा, मात्र तासाभरातच प्रवाशांना मोठा धक्का…
एमएमआरडीने या मेट्रोच्या भुयारी मार्गात ६ भागांमध्ये तयार करण्यात आलेल्या प्रिकास्टरिंग सेगमेंट्सचा वापर टनेल लाइनर म्हणून केला आहे. तसेच अंतिम बोगद्याचा व्यास ५.६ मीटर आहे. मेट्रो ७ ए हा मुंबईतील मेट्रो प्रकल्पांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. मुंबईतील ७ मेट्रो प्रकल्प एकमेकांशी जोडले जाणार आहेत. मेट्रो ७ए च्या ३.४ किमीच्या प्रकल्पामुळे वसई-विरार, मिरा-भाईंदर तसेच ठाणे: नवी मुंबईसारखे परिसर थेट मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाजोडला जाणार आहेत. मेट्रो ७ अ वर दोन स्थानके असणार आहेत एक- एअरपोर्टकॉलनी आणि एक मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी दोन स्थानके असणार आहेत. मेट्रो मार्ग ७ अने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मेट्रो मार्ग-३ आणि आंतराष्ट्रीय विमानतळादरम्यान भूमिगत स्थानकावर आंतरबदल करण्याची सुविधा सहज उपलब्ध होणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसोबतच इतर शहरांना जोडणी देणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकासप्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) मेट्रो-७मार्गिकेची उभारणी सुरू असून, ही मार्गिका ३.४ किमी लांबीची आहे. या मेट्रो मार्गिकेवर एकूण दोन मेट्रो स्थानके आहेत. यातील डाऊन लाइन मार्गाचे भुयारीकरण १७ एप्रिलला पूर्ण झाले होते. पुढील तीन महिन्यात दुसऱ्या बाजूच्या बोगद्याचेही भुयारीकरण पूर्ण झालं आहे. एमएमआरडीएने दुसऱ्या बोगद्याच्या भुयारीकरणाचे काम ४ नोव्हेंबर २०२३ अला सुरू केले होते. मेट्रो-३ मार्गिकेच्या बोगद्याच्या बाजूने या मेट्रोचे भुयारीकरण करण्यात आले आहे. तसेच सहार उड्डाणपुलाच्या रॅम्प खालून हा भुयारी मार्ग गेला. त्यामुळे वर्दळ सुरू असलेल्या सहार उड्डाणपुलाखाली भुयारीकरण करणं, आव्हानात्मक काम होतं. तसेच या बोगद्याच्या मार्गात मोठ्या भूमिगतमल जलवाहिन्या, पाण्याची मोठी मार्गिका होती. त्यातूनही मार्ग काढत पावणे दोन वर्षात हे भुयारीकरण एमएमआरडीएने पूर्णत्वास नेले.