Sanjay Raut Criticized Modi-Shah: ” जर खासदार राहुल गांधींना (Rahul Gandhi) निवडणूक आयोगाने केलेल्या मतचोरीविरोधात यात्रा काढावी लागली, तर महापालिका निवडणुकांमध्ये आपल्या सोयीच्या प्रभाग रचना कराव्यात यासाठी हा मिंध्ये गट, भाजप किंवा इतर लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. जोपर्यंत या देशात मोदी, शहां सारखे लोक सत्तेवर आहेत तोपर्यंत या देशात निवडणुका स्वच्छ आणि स्पष्ट वातावरणात कधीच होणार नाहीत,” अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, मुंबई महानगरपालिका असो विधानसभा किंवा लोकसभा असो कारण इतकेच सांगेल की पैशाचा प्रचंड वापर आणि सत्तेचा गैरवापर यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी हे कोणत्याही थराला जातील, असा हल्लाबोलही राऊत यांनी केला आहे.
ऑपरेशन सिंदूर सुरू असताना केंद्र सरकारने भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना परवानगी दिल्याचा मुद्दा उपस्थित करत शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, “एकीकडे मोदी सरकार म्हणते की पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही. सिंधू नदीचं पाणी अडवतो, पाकिस्तानविरोधात युद्ध सुरू आहे, असं सांगतात आणि दुसरीकडे पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला हिरवा कंदील दाखवतात. हा निर्लज्जपणा आहे.”
“ पण जर देशात दुसरे कुणाचे सरकार असते आणि त्यांनी हा जर निर्णय घेतला असता तर या लोकांनी संपूर्ण देशभरामध्ये एक आंदोलन उभं केलं असतं, पण प्रधानमंत्री यांनी शांतपणे पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्यास परवानगी दिली. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही असं पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री म्हणत आहेत, मग ऑपरेशन सिंदूर संपलेले नसताना ज्या देशाविरुद्ध तुम्ही युद्ध पुकारलेल आहे त्या देशाबरोबर क्रिकेट का खेळायचं आहे, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.
Air India : उड्डाणच्या तयारीत अन् अचानक लँडिंग; एअर इंडियाच्या विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड
“पहलगाममध्ये जवानांचे रक्त सुकलेलं नाही, कुटुंबीयांचे अश्रू आटलेले नाहीत. अशा वेळी पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचा निर्णय म्हणजे शहीदांचा अपमान आहे.या देशातले लोक तिकडे मॅच बघायला जाणार. गृहमंत्री अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा ते दुबईत भारत-पाक सामन्याला ऐटीत बसणार आणि भारताच्या जनतेने पाकिस्तान विरुद्ध नारे द्यायचे, सैनिकांनी हुतात्म्य पत्करायचं, जनतेने प्राण गमवायचे आणि हे पाकिस्तान बरोबर क्रिकेटचे ट्रेड करणार, असा खडा सवालही राऊतांनी उपस्थित केला. तसेच,हा अत्यंत धक्कादायक आणि बेशरमपणाचा प्रकार आहे, आम्ही त्याचा निषेध केलेला आहे, उद्धव ठाकरे आणि संपूर्ण शिवसेना, आदित्य ठाकरे यांनी सुद्धा त्यांचं स्पष्ट आणि परखड मत मांडलं असल्याचे संजय राऊतांनी सांगितले.
जर हा निर्णय दुसऱ्या सरकारने घेतला असता तर भाजपने देशभर आंदोलन पेटवले असते. पण आज मात्र जय शहा (अमित शहांचे सुपुत्र) दुबईत ऐटीत बसून सामना पाहणार आणि भारतीय जनता नारे देणार, सैनिक प्राण देणार. हा प्रकार आम्ही देशद्रोह मानतो. हेच सामने महाराष्ट्रात किंवा दिल्लीत झाले असते तर शिवसेनेने ते उधळून लावले असते. आम्ही ढोंगी नाही. आमचं हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व पक्कं आहे.”
Pune Municipal Corporation Election 2025: पुणे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले! नवी प्रभागरचना
काँग्रेसनेही याबाबत ठाम भूमिका घेतल्याचे राऊत म्हणाले. मात्र शरद पवार यांच्या भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले, हा प्रश्न क्रिकेटचा नसून भारत-पाकिस्तान युद्धाचा आहे. पाकिस्तानचे व्हिसा बंद, त्यांच्या नागरिकांना बाहेर पाठवणं, व्यापार थांबवणं आणि एकीकडे क्रिकेट खेळणं हा दुटप्पीपणा आहे. भारत-पाक सामने म्हणजे हजारो कोटींचा सट्टा, विशेषतः गुजरात-राजस्थानमध्ये. हे सर्व भाजप समर्थकांचे फायदे बघून निर्णय घेतले जातात. जय शहा क्रिकेटचे सूत्रधार आहेत आणि त्यांच्या वडिलांकडे गृहमंत्रिपद आहे. अशा वेळी राष्ट्रीय भावना फक्त आम्ही जपायच्या आणि यांनी मात्र पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायचं — हे देशभक्ती नसून देशद्रोह आहे.” अशी सणसणीत टीकाही त्यांनी यावेळी केली.
“क्रिकेट खेळाडूंना राष्ट्रीय भावना नाहीत का? असतील तर मैदानात उतरू नका. पण ते जातील कारण त्यांच्यावर मोदी-शहा यांचा दबाव आहे. हा गंभीर विषय आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही यावर चर्चा करू. दुबईतील सामन्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटू शकतात.” असंही त्यांनी यावेळी सांगितलं.