Sanjay Raut News: मुंबई महापालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडली. आता तिथे विकासाची हंडी लावली जाणार आणि त्यातील लोणी सर्वसामान्य जनतेला वाटण्यात येईल, यावेळी मुंबई महानगर पालिकेत परिवर्तन अटळ आहे,” अशा शब्दांत काल (१६ ऑगस्ट) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचलं होतं. फडणवीसांच्या या वक्तव्याचा खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
“मुंबई आणि ठाण्याची लूट करणारे सगळे देवेंद्र् फडणवीस यांच्याच सरकारमध्ये आहेत. आमच्या सरकारच्या काळातच मुंबई महानगरपालिकेच्या ९० हजार कोटींच्या ठेवी ठेवण्यात आल्या होत्या, त्या काय मुंबई लुटल्यामुळे ठेवल्या का, ९० हजार कोटींच्या ठेवी ज्या महापालिकेने ठेवल्या त्या महापालिका लुटल्यामुळे ठेवल्या का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
Devendra Fadnavis News: ‘मुंबई महापालिकेत पापाची हंडी आम्ही फोडली’;फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
संजय राऊत म्हणाले, ” मुंबई महापालिकेतील ९० हजार कोटींच्या ठेवींची लूट तुम्ही केली. आताचे नगरविकास मंत्री किंवा पूर्वी जे मुख्यमंत्री होते, त्यांनी २ लाख कोटींची कामे दिली. पण तिजोरीत मात्र खडखडाट आहे. कुणाला कोणते काम दिले याची कोणतीही माहिती नाही, पण या २ लाख कोटींवरील २५ टक्के कमिशन त्यांच्याकडे पोहोचले ते कसे त्यात फडणवीसांचेही लोक आहेत.असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे. याच लुटमाऱ्या करणाऱ्यांच्या हंड्या फोडत तुम्ही मुंबईपासून ठाण्यापर्यंत तुम्ही फरत आहात. या हंड्यांमध्ये जे दही, लोणी आहे. ते ज्यांनी चाटूनपुसून खाल्ले, त्यांच्याच हंड्या तुम्ही फोडत आहात, याला काय म्हणायचे, असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस तुमच्या आसपास चोर, दरोडेखोर, लफंगे आहेत, त्यांना पाठीशी घालू नका. नाहीतर महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी केली.
तसेच, मुंबई कोणी लुटली, कोण लुटतयं, उद्योगपती गौतम अदानींची हंडी कोण फोडतय, अदानींची हंडी फोडणारे लोक कोण आहेत, गौतम अदानींच्या हंडीत जी मलई आहे,ती खाणारी लोकं कोण आहेत, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे.
मुंबई कोणी लुटली आणि कोण लुटत आहे, गौतम अदानींची हंडी कोण फोडत आहे, हे लोक गौतम अदानींची हंडी फोडणारे लोक आहेत. गौतम अदानींच्या हंडीत जी मलई आहे, ती खाणारे हे लोक आहेत. हे आम्हाला काय सांगत आहेत. ज्यांनी धारावीपासून मुंबईतील अनेक महत्त्वाचे भूखंड अदानींच्या घशात घातले, तेच फडणवीस आज आमच्यावर टीका आणि आरोप करत आहेत. हा सगळ्यात मोठा जोक आहे, या शब्दांत संजय राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.