पुणे महापालिका निवडणुकीसाठी नवी प्रभागरचना जाहीर
Pune municipal corporation election 2025 new ward structure details: राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना जाहीर कऱण्यात आली. पुणे महापालिकेचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी ही प्रभागरचना जाहीर केली. यावेळी शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रभागरचनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले नसले तरी उपनरातील प्रभागरचनेत काही मोठे बदल करण्यात आले आहेत. या प्रभागरचनेमुळए भाजप आणि शिवसेना शिंदे हटाला फायदा होणार असल्याचे दिसत आहेत. पण त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे वर्चस्व असलेल्या प्रभागात बदल केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मात्र टेन्शन वाढणार आहे. करावा, पर्वती, शिवाजीनगर या मध्यवर्ती भागातील विधानसभा मतदारसंघातील प्रभागांची संख्या कमी होणार नाही.
दुसरीकडे, उपनगरांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आल्याचे दिसत आहे. प्रभाग मोठे करण्यात आल्यामुळे नगरसेवकांची संख्या वाढण्यावर मर्यादा आली आहे. पण याचा फटका अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार आहे. नव्या प्रभागरचनेनुसार, आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी एकूण ४१ प्रभागांची रचना करण्यात आलीअसून १६५ नगरसेवक निवडून येतील. यात ४० प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग पाच सदस्यीय ठेवण्यात आला आहे. एकूण ४१ प्रभागांपैकी प्रभाग क्र. ३८ हा पाच सदस्यीय असून उर्वरित ४० प्रभाग चार सदस्यीय आहेत.
२०११ च्या जनगणनेनुसार पुणे महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या ३४,८१,३५९ इतकी आहे. यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या ४,६८,६३३ तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या ४०,६८७ आहे. यावरून एकूण १६५ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. महानगरपालिकेने सुरुवातीला तीन प्रभाग – तीन सदस्य असा प्रस्ताव नगररचना विभागाला पाठवला होता. मात्र नगररचना विभागाने तो नाकारून पाच सदस्यीय एकच प्रभाग केला आहे. यामुळे या प्रभाग रचनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शीतयुद्ध पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आंबेगाव-कात्रज या प्रभागांतून पाच नगरसेवक तर इतर 40 प्रभागांत प्रत्येकी चार नगरसेवक निवडले जातील. याबाबत कुणाला शंका असल्यास 3 सप्टेंबरपर्यंत यावर हरकती नोंदविता येणार आहेत. चार वर्षांपूर्वी फेब्रुवारी २०२२ मध्ये पुणे महापालिकेची मुदत संपली. त्यातच राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुकाही गेल्या ३-४ वर्षांपासून रखडल्या आहेत. पण सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांच्या आता अधिसुचना काढून निवडणुकांचे आदेश दिले. त्यानंतर राज्य सरकारने महापालिका निवडणुकांच्या हालचाली वाढवण्यात आल्या.
Kolhapur News: कोल्हापुरात हिंसाचार; दोन गटातील वादामुळे दगडफेक, नेमकं झालं काय?
राज्य शासनाने महापालिकेला प्रभागरचना जाहीर करण्यासाठी २२ ऑगस्टची अंतिम मुदत दिली होती. त्याअंतर्गत प्रारूप प्रभागरचना तयार करून ती निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली होती. नगरविकास विभागाने प्रभागरचनेचे वेळापत्रक आधीच निश्चित केले होते. त्यानुसार प्रभागरचना तयार करून आयोगाकडे सादर करण्यात आली. या प्रभागरचनेला मान्यता मिळाल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी ती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.