Sanjay Raut's eye will now be on BJP's stronghold Vidarbha, Nagpur will now be the base ....
मुंबई : द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) या चित्रपटावरुन अनेक प्रतिक्रीया उमटायला सुरुवात झाली आहे. आता राजकारणातून या बद्दल विविध प्रतिक्रीया येताना दिसत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी देखील याबद्दल मत व्यक्त करत काश्मीर फाईल्सचे मोदी हे सर्वात मोठे प्रचारक असल्याचं म्हणटलं. हा एक राजकीय अजेंडा राबवला जात आहे. काश्मीरी पंडितांची (Kashmiri Pandit) वेदना देशात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या इतकी कुणाला माहीत नसेल, असही राऊत म्हणाले.
[read_also content=”मुंबईत मनसेनं IPLची बस फोडली; खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचं काम स्थानिक व्यावसायिकांना न दिल्यानं आक्रमक https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/mns-blows-up-ipl-bus-in-mumbai-aggressive-for-not-handing-over-the-work-of-transporting-players-to-local-professionals-nrps-255605.html”]
संजय राऊत म्हणाले की, काश्मीर फाईलमध्ये अनेक सत्यं दडवली आहेत. ताश्कंद फाईल्स चित्रपटात लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे खापर एका कुटुंबावर फोडण्याचा अजेंडा होता तसाच अजेंडा काश्मीर फाईल्सचा आहे. महाराष्ट्र सरकारने युती सरकारच्या काळात काश्मिरी मुलांसाठी वैद्यकीय आणि इंजिनिअरिंगमध्ये पाच टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या. काश्मीरची खरी फाईल बाळासाहेब ठाकरे यांना माहिती आहे. नुसतं सिनेमा टॅक्स फ्री करून त्यांच्या वेदना कळत नाहीत, असं देखील राऊत म्हणाले.
[read_also content=”भगवंत मान यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ https://www.navarashtra.com/india/bhagwant-mann-swearing-in-ceremony-aam-aadmi-party-arvind-kejriwal-255758.html”]