Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या तापमानाचा फटका शाळांनाही; शाळा 22 जूनपासून होणार सुरु

शिक्षण विभागाने याबाबत परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, विदर्भातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा २२ जूनपासून सुरू केल्या जाणार आहेत. तर उर्वरित राज्यात मात्र सोमवार १५ जूनपासून नियमित वेळेत शाळा सुरू होईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 10, 2026 | 11:59 AM
वाढत्या तापमानाचा फटका शाळांनाही; शाळा 22 जूनपासून होणार सुरु

वाढत्या तापमानाचा फटका शाळांनाही; शाळा 22 जूनपासून होणार सुरु

Follow Us
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. विदर्भात तापमान अद्याप वाढलेले असून, विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. ही बाब विचारात घेऊन शिक्षण विभागाने फक्त विदर्भातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा २२ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिक्षण विभागाने याबाबत परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, विदर्भातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा २२ जूनपासून सुरू केल्या जाणार आहेत. तर उर्वरित राज्यात मात्र सोमवार १५ जूनपासून नियमित वेळेत शाळा सुरू होईल. सर्व सबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे शिक्षण विभागाने प्रसिद्धीपत्रक काढून सर्व शाळा-महाविद्यालयांना कळवले आहे. संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत एकवाक्यता व सुसंगती आणण्याच्या दृष्टीने सूचना निर्गमित केल्या होत्या.

‘प्रशासनाचा आणि पोलिसांचा हात असल्याशिवाय..,’ पुणे रेव्ह पार्टीवरून विजय वडेट्टीवारांचा गृहखात्यावर निशाणा

याच अनुषंगाने राज्यातील शाळांची सन २०२६ ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू करण्याबाबत सर्व राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना कळविले होते. त्यानुसार, राज्यात सोमवार १५ जूनपासून शाळा सुरू होणार होत्या. विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी व नियमित शाळा सुरू करण्याबाबत बदल करण्यात आला आहे.

तापमानाचा धोका विचारात घेऊन निर्णय

सध्याचा तापमानाचा संभाव्य धोका विचारात घेऊन विदर्भात २२ ते ३० जून २०२६ दरम्यान विदर्भातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरतील. त्यानंतर ०१ जुलै २०२६ पासून शाळा नियमित वेळेत भरतील, असे कळवण्यात आले आहे. सदरचे प्रसिद्धीपत्रक माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर आणि प्राथमिक शिक्षण संचालक डॉ. शरद गोसावी यांनी काढले आहे.

यापूर्वीही उशीरा शाळा झाल्या सुरु

गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भातील शाळा २६ जूनपासून सुरू होत होत्या. परिसरातील हवामानाचा विचार करून न्यायालयानेही यापूर्वी २६ जूनपासून शाळा सुरू करण्यास समर्थन दिले होते. यंदा मात्र राज्यभर एकसमान दिनांक निश्चित करत शासनाने १५ जूनपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच १५ ते ३० जून या कालावधीत शाळा सकाळच्या सत्रात चालविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विदर्भात यंदा तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, जून महिन्यातही अपेक्षित पाऊस झालेला नाही. सध्या अनेक भागात दुपारचे तापमान ४० अंशांच्या वर कायम आहे.

Tulapur Rave Party Case : रेव्ह पार्टीला हाऊस पार्टी ठरवण्याची घाई कुणाला वाचवण्यासाठी? सुषमा अंधारेंचा पुणे पोलिसांना सवाल

Web Title: Schools in vidarbha to reopen from june 22

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • Education Department
  • Maharashtra school

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.