'शरद पवारांनी आत्मनिरीक्षण करावं'; आशिष शेलारांनी नेमकं काय म्हटलं?
मुंबई : पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याच हल्ल्यावरून राजकीय नेतेमंडळींकडून निषेध व्यक्त करण्यात आला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनीही भाष्य केले होते. त्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी विधान केले. ‘पहलगाम हल्ल्याबाबत राजकारण करणं इतक्या वरिष्ठ नेत्याने, हे अपेक्षित नाही. किंबहुना, कोणीच करू नये. झालेला हल्ला दुर्दैवी, नाहक आणि बळी पडलेले आणि बलिदान पडलेले नागरिक या सगळ्यावर देश एकत्र आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.
आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘पहलगाम हल्ल्याबाबत राजकारण करणं इतक्या वरिष्ठ नेत्याने, हे अपेक्षित नाही. किंबहुना, कोणीच करू नये. झालेला हल्ला दुर्दैवी, नाहक आणि बळी पडलेले आणि बलिदान पडलेले नागरिक या सगळ्यावर देश एकत्र आहे’, असे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या विरोधामध्ये अनेक लोक आहेत. भारताला अनेक लोकं समर्थन देत आहेत. यामुळे राजकीय किंवा धार्मिक विधान करणं, शरद पवार यांनी आत्मनिरीक्षण करावं’, असेही त्यांनी सांगितले.
तसेच मुंबईकरांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा सेवा उपलब्ध करण्यासाठी, पायाभूत सुविधांची प्रगती वाढवण्यासाठी केले आहे. सरकारचे प्रथम कर्तव्य आहे म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सरकारने या प्रस्तावाला गती दिली. आमदार पराग शाह यांनी प्रचंड पाठपुरवठा केला आहे.
दरम्यान, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? यावर त्यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, ‘तो दोन्ही पक्षांचा अंतर्गत विषय आहे. दोन्ही भावांचा प्रश्न आहे. एकाने साद दिली, दुसऱ्यांनी प्रतिसाद द्यायचा की नाही हे त्या दोघांनी ठरवावं. आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत, त्या ठिकाणी आम्ही योग्यवेळी प्रतिक्रिया देऊ आणि राजकीय भूमिका घेऊ, असेही त्यांनी म्हटले आहे.
पुलाच्या नामंतराच्या विषयावर शेलार म्हणाले…
या सगळ्या परिसराला आंबेडकरी चळवळीचे चित्र आहे, त्याचं स्वरूप आहे. या ठिकाणी आंबेडकरांचा पुतळा हा श्रद्धास्थान आहे आणि कामगारांनी मागणी केलेली आहे आणि नागरिकांनी देखील या ठिकाणी मागणी केलेली आहे. यामुळे मी स्वतः आयुक्तांना, मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत या पुलाचे नाव माता रमाई उड्डाणपूल असं नामकरण व्हावं यासाठी सांगणार आहे.