Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवारांच्या विमान अपघातावर पार्थ पवारांचं मोठं विधान; म्हणाले, ‘आता याप्रकरणाची…’

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबीय लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या भेटीत अपघाताच्या चौकशीसंदर्भात सविस्तर चर्चा करून सीबीआय चौकशीची मागणी अधिकृतरित्या मांडली

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 06, 2026 | 09:36 AM
अजित पवारांच्या विमान अपघातावर पार्थ पवारांचं मोठं विधान; म्हणाले, 'आता याप्रकरणाची...'

अजित पवारांच्या विमान अपघातावर पार्थ पवारांचं मोठं विधान; म्हणाले, 'आता याप्रकरणाची...'

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला. या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या विमान अपघातावर संशय व्यक्त केला जात आहे. आमदार रोहित पवार, अमोल मिटकरी यांच्याकडून सातत्याने याप्रकरणाच्या चौकशीची मागणी केली जात आहे. असे असताना आता विमान अपघात प्रकरणाबाबत अजितदादांचे पुत्र पार्थ पवार यांनी पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पक्षाच्या कार्यालयात पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना त्यांनी या प्रकरणावर भाष्य केले. पार्थ पवार म्हणाले की, अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्या शंका आमच्याही मनात आहेत. या संपूर्ण घटनेची सत्यता जनतेसमोर यावी, यासाठी स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी होणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात पुढील पावलेही उचलली जाणार असल्याचे पार्थ पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबीय लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या भेटीत अपघाताच्या चौकशीसंदर्भात सविस्तर चर्चा करून सीबीआय चौकशीची मागणी अधिकृतरित्या मांडली जाणार आहे.

सत्ताधाऱ्यांकडूनही चौकशीची मागणी

अजित पवार यांच्या अचानक झालेल्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेभोवती अनेक प्रश्न उपस्थित होत असून, विरोधकांसह सत्ताधारी गटातील काही नेत्यांकडूनही पारदर्शक चौकशीची मागणी केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेदेखील वाचा : Ajit Pawar Death : VSR च्या मालकांची विमानामध्ये डुलकी; जय पवारांनी शेअर केला धक्कादायक व्हिडिओ

VSR विमान कंपनीच्या मालकाची CID कडून चौकशी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्घटनाग्रस्त VSR विमान कंपनीचा मालक आर.के. सिंग पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात चौकशीसाठी आले होते. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संशय आणि आरोप प्रत्यारोपांमुळे संशयाची सुई विमान कंपनीकडे वळाली आहे. त्यातच आमदार रोहित पवार हेदेखील सातत्याने पत्रकार परिषद घेत विमान कंपनी आणि नागरी उड्डाण संचलनालय (डीजीसीए) यांच्या कारभारासंदर्भात प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे राज्य सरकारवरील दबावही वाढत चालला होता. अखेर सीआयडीने आर.के. सिंग चौकशीसाठी बोलावले आहे.

Web Title: Parth pawar big statement on ajit pawar plane crash case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • Maharashtra Politics
  • parth pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: वर्षभराच्या लढाईनंतर माधुरी हत्तीण कोल्हापुरात दाखल
1

Maharashtra Breaking News Today 2026: वर्षभराच्या लढाईनंतर माधुरी हत्तीण कोल्हापुरात दाखल

Mantralaya Staff Relieved Decision: मुख्यमंत्री कार्यालयाचा मोठा निर्णय ! ५७० कर्मचाऱ्यांची मूळ विभागात हकालपट्टी
2

Mantralaya Staff Relieved Decision: मुख्यमंत्री कार्यालयाचा मोठा निर्णय ! ५७० कर्मचाऱ्यांची मूळ विभागात हकालपट्टी

Maharashtra Breaking News Today 2026: नवी दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषदेचा बिगुल, बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप
3

Maharashtra Breaking News Today 2026: नवी दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषदेचा बिगुल, बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप

Maharashtra Breaking News Today 2026: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ९५ डॉलरच्या पार
4

Maharashtra Breaking News Today 2026: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ९५ डॉलरच्या पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.