Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sheetal Mhatre: मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी करा; शीतल म्हात्रेंची मागणी

Sheetal Mhatre: मिठी नदी गाळ उपसा प्रकरणावरून शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. दिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे यांच्यात व्यावसायिक संबंध असल्याचा दावा म्हात्रे यांनी केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 03, 2026 | 02:34 PM
मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी करा; शीतल म्हात्रेंची मागणी

मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी करा; शीतल म्हात्रेंची मागणी

Follow Us
Follow Us:
  • मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यात आदित्य ठाकरेंची चौकशी करा
  • दिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे यांच्यात व्यावसायिक संबंध
  • कोविड काळातील मुंबई महापालिकेतल्या कंत्राटांची श्वेतपत्रिका काढा
  • शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप
मुंबई : मिठी नदी गाळ उपशात झालेल्या ६५ कोटींच्या घोटाळ्यात अभिनेता दिनो मोरिया याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली असून या प्रकरणी उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांची चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केली. आदित्य ठाकरे आणि दिनो मोरिया यांचे व्यावसायिक संबंध असून कोविड काळात मुंबई महापालिकेतून दिलेल्या कंत्राटांची श्वेत पत्रिका काढावी अशी मागणी म्हात्रे यांनी यावेळी केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.(Sheetal Mhatre)

यावेळी शीतल म्हात्रे यांनी सांगितले की, दिनो मोरियाची अटक हे मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यातील हिमनगाचे टोक आहेत. या घोटाळ्यात दिनो मोरियाचा मित्र आदित्य ठाकरे याचा थेट संबंध आहे. मोरिया आणि आदित्य खास मित्र आहेत हे सर्वश्रुत आहे. महापालिकेत नगरसेवक असताना दिनो मोरिया पालिकेत वारंवार यायचा. दिनो मोरिया आणि कंत्राटदार केतन कदम पार्टनर असल्याचे संभाषणातून सिद्ध झालाय.

Wai Municipal School: वाई पालिकेच्या शाळा क्रमांक १ मधील कारभारावर प्रश्नचिन्ह; ठेकेदाराच्या कामाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी

दिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे यांची प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमध्ये कमिशन घेणारी वसुली गँग आहे असा खळबळजनक आरोप म्हात्रे यांनी केला. कोविडकाळातील खिचडी घोटाळा, बॉडी बॅग घोटाळा, कोविड सेंटर घोटाळा, ऑक्सिजन प्लॅन्ट अशा कॉन्ट्रॅक्टची सखोल चौकशी होऊन श्वेत पत्रिका काढावी अशी मागणी म्हात्रे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांकडे केली.

तसेच दिशा सालियन हत्ये प्रकरणात दिनो मोरिया याचे नाव आहे. मिठी नदी घोटाळा असो किंवा दिशा सालियन हत्याकांड असो दिनो मोरिया याचे नाव पुढे येत आहे. त्यामुळे दिनो मोरिया याच्या मोबाईल मधील चॅट आणि कॉल डेटा जनतेसमोर यायला हवा. यातून अनेक गोष्टींचा उलगडा होईल.

दिनो मोरियाची ज्या प्रकारे चौकशी सुरू आहे त्याच प्रकारे आदित्य ठाकरेची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करावी अशी मागणी म्हात्रे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली. यासंदर्भात शिवसेनेकडून मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र दिले जाईल, असे म्हात्रे म्हणाल्या. ठाण्यातील प्रदीप पुर्णेकर हत्येचा पोलीस तपास करत आहेत. तपासातून सत्य समोर येईल असे त्या म्हणाल्या.

कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान विशेष मेगाब्लॉक; ‘या’ स्थानकांदरम्यान लोकल गाड्या ठप्प

Web Title: Sheetal mhatre demands aaditya thackeray probe mithi river desilting scam dino morea bmc contracts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Dino Morea
  • Mithi River

संबंधित बातम्या

Dino Morea Arrested: डिनो मोरियाच्या अडचणीत वाढ, मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेत्याला अटक; राहत्या घरातून घेतलं ताब्यात
1

Dino Morea Arrested: डिनो मोरियाच्या अडचणीत वाढ, मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेत्याला अटक; राहत्या घरातून घेतलं ताब्यात

Pradeep Purnekar Case: ‘आदित्य ठाकरेला अटक…’, दिशा सालियन प्रकरणावरून मीनाक्षी शिंदे आक्रमक; उद्धव-आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप
2

Pradeep Purnekar Case: ‘आदित्य ठाकरेला अटक…’, दिशा सालियन प्रकरणावरून मीनाक्षी शिंदे आक्रमक; उद्धव-आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार
3

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार

Aditya Thackeray: “शेतकरी संकटात, तातडीने मदत द्या!”; खानापूरमध्ये आदित्य ठाकरेंची पाहणी अन् धीर!
4

Aditya Thackeray: “शेतकरी संकटात, तातडीने मदत द्या!”; खानापूरमध्ये आदित्य ठाकरेंची पाहणी अन् धीर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.