Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी दिवाळीपूर्वी वेतन द्या! परिवहन मंत्र्यांचे एसटी प्रशासनाला निर्देश

Pratap Sarnaik : एसटी महामंडळातील 83 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी नोव्हेंबरचे वेतन देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 25, 2026 | 04:45 PM
Pratap Sarnaik : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी दिवाळीपूर्वी वेतन द्या! परिवहन मंत्र्यांचे एसटी प्रशासनाला निर्देश

Pratap Sarnaik : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी दिवाळीपूर्वी वेतन द्या! परिवहन मंत्र्यांचे एसटी प्रशासनाला निर्देश

Follow Us
Follow Us:
  • एसी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी परिवहनमंत्री आग्रही
  • तातडीने पाठपुरावा करण्याचे आदेश
  • वेतन वितरणाच्या नियोजन करण्याच्या सूचना
 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (ST) सुमारे 83 हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.

एसटी महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याला साधारणतः 7 ते 10 तारखेदरम्यान केले जाते. मात्र, यंदा 6 नोव्हेंबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होत असल्याने कर्मचाऱ्यांना सणापूर्वीच वेतन मिळणे आवश्यक आहे. दिवाळीच्या सणासाठी कुटुंबीयांसह खरेदी, घरगुती खर्च आणि इतर नियोजन करता यावे, यासाठी कर्मचाऱ्यांच्या हातात वेळेत पगार पडणे महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन मंत्री सरनाईक यांनी प्रशासनाला वेतनासाठी आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तातडीने पाठपुरावा करण्याचे आदेश

दिवाळीपूर्वी वेतन देण्यासाठी एसटी महामंडळाच्या अर्थ व नियोजन विभागाने तातडीने शासनाकडे पाठपुरावा करावा. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आवश्यक असलेले अनुदान तसेच मागील महिन्यातील विविध प्रवासी सवलत योजनांच्या प्रतिपूर्तीपोटी शासनाकडून मिळणारी प्रलंबित रक्कम वेळेत उपलब्ध होण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

महापौर निवासस्थानी तिरंगा अन् भगवा ध्वज कायमस्वरूपी लावा; नगरसेवक सुनील पांडे यांची मागणी

वेतन वितरणाच्या नियोजन करण्याच्या सूचना

एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांच्या सणाच्या आनंदावर विरजण पडू नये, यासाठी प्रशासनाने या विषयाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध होण्यासाठी समन्वय साधून वेतन वितरणाचे नियोजन करावे आणि दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना पगार मिळेल, या दृष्टीने दक्षता घ्यावी, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. दरम्यान, परिवहन मंत्र्यांच्या या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात का होईना, दिलासा मिळाला आहे.

आता एसटीचे अर्थ व नियोजन विभाग कशाप्रकारे यावर कार्य करतो ते पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. कारण त्यांच्याच मंत्रालयाशी समन्वयामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

Nagpur Crime : पोलिसांनी उधळला कट ;३ कोटींच्या खंडणीसाठी संचालकाला खोट्या गुन्ह्यात अडकिवण्याचा डाव

💡

Frequently Asked Questions

  • Que: एसटी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरचा पगार दिवाळीपूर्वी मिळणार का?

    Ans: एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी नोव्हेंबरचे वेतन देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, वेतन जमा होण्याची निश्चित तारीख जाहीर झालेली नाही.

  • Que: एसटी महामंडळातील किती कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे?

    Ans: एसटी महामंडळातील सुमारे 83 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याचा लाभ होण्याची अपेक्षा आहे.

  • Que: एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधी कुठून उपलब्ध होणार आहे?

    Ans: शासनाकडून मिळणारे आवश्यक अनुदान आणि प्रवासी सवलत योजनांच्या प्रतिपूर्तीपोटी प्रलंबित असलेली रक्कम वेळेत उपलब्ध करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: St employees november salary before diwali pratap sarnaik rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • Diwali 2026
  • Pratap Saranaik
  • ST Workers

संबंधित बातम्या

Diwali Car Offers: फक्त 6 लाखात घरी आणा Maruti Suzuki Dzire; दमदार मायलेज आणि सुरक्षिततेमुळे ठरू शकते बेस्ट पर्याय
1

Diwali Car Offers: फक्त 6 लाखात घरी आणा Maruti Suzuki Dzire; दमदार मायलेज आणि सुरक्षिततेमुळे ठरू शकते बेस्ट पर्याय

Diwali Firecracker Rules: वेळीच सावध व्हा! रस्त्यावर फटाके फोडाल तर होणार कारवाई, विदेशी फटाक्यांच्या विक्रीलाही मनाई, जाणून घ्या
2

Diwali Firecracker Rules: वेळीच सावध व्हा! रस्त्यावर फटाके फोडाल तर होणार कारवाई, विदेशी फटाक्यांच्या विक्रीलाही मनाई, जाणून घ्या

दिवाळीपूर्वी महाबळेश्वरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू; टपऱ्या-हातगाड्यांवर पालिकेचा धडाका, मुख्य बाजारपेठेकडील रस्ता मोकळा
3

दिवाळीपूर्वी महाबळेश्वरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू; टपऱ्या-हातगाड्यांवर पालिकेचा धडाका, मुख्य बाजारपेठेकडील रस्ता मोकळा

Diwali 2026: धनत्रयोदशी ते भाऊबीजपर्यंत यंदाची दिवाळी कधी? जाणून घ्या संपूर्ण यादी
4

Diwali 2026: धनत्रयोदशी ते भाऊबीजपर्यंत यंदाची दिवाळी कधी? जाणून घ्या संपूर्ण यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.