फोटो सौजन्य सोशल मीडिया
या प्रकरणातील कथित सूत्रधार आदित्य सुरेशचंद्र गुप्ता (३०, रा. आग्रा) याला अटक करण्यात आली असून, न्यायालयीन आदेशानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त राहुल मदणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राजस्थानातील रतनगढ येथील इरफान अली सलीम तेली (३२) यांची तेल कंपनी आहे.
त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळण्याचा कट आदित्यने रचला. यासाठी नागपुरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला ५ लाख रुपये देण्याचे आमिष दाखविण्यात आले. आदित्यच्या सांगण्यावरून तिने तहसील पोलिस ठाण्यात इरफान यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. प्रारंभी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी इरफान यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता.
मात्र, पुढील तपासात संपूर्ण प्रकरणालाच वेगळे वळण मिळाले. आदित्यने इरफानविरुद्ध पुण्यातही अशाच स्वरूपाचा गुन्हा दाखल करून घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्या प्रकरणात इरफान सध्या कारागृहात आहे. तहसील पोलिसांनी इरफान यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, प्रकरणातील संशयास्पद बाबी उघड होऊ लागल्या.
Spa Nagpur Raid: स्पाच्या आड काळाधंदा! पॉश अचरज टॉवरवर धाड; ३ महिलांची सुटका, संचालिका फरार
स्वतंत्र चौकशीदरम्यान विद्यार्थिनीने इरफान यांना आपण ओळखत नसल्याचे सांगितले. तसेच ‘मीका’ या अॅपवर त्यांच्याशी कधीही संवाद साधला नसून, आदित्यच्या सांगण्यावरूनच तक्रार दाखल केल्याचे तिने पोलिसांना सांगितल्याची माहिती उपायुक्त राहुल मदणे यांनी दिली.
त्यानंतर विद्यार्थिनीच्या मोबाइलमधील माहितीची तपासणी करण्यात आली. या तपासातून आदित्यने इरफान यांच्याविरुद्ध कट रचल्याचे निष्पन्न झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. या आधारे पोलिसांनी आदित्यला अटक केली.
या प्रकरणातील विद्यार्थिनी मूळची चंद्रपूरची असून, गेल्या तीन वर्षांपासून ती नागपुरात भाड्याच्या खोलीत राहते. शहरातील एका नामांकित महाविद्यालयात ती शिक्षण घेत आहे. एका पार्सलच्या माध्यमातून आदित्यला विद्यार्थिनीचा मोबाइल क्रमांक मिळाला.
त्यानंतर दोघांची ओळख झाली. पुढे याच ओळखीचा वापर करून विद्यार्थिनीला तक्रार दाखल करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त राहुल मदणे आणि सहायक पोलिस आयुक्त शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मेंढे, उपनिरीक्षक संदीप भिताळे आणि पोलिस हवालदार धनराज चिंग्वार यांनी केली.
Nagpur News : उच्च न्यायालयात खुलासा; ६ कोटींचा माल जप्त ;अज्ञात कारखान्यात नायलॉन मांजाची निर्मिती
पोलिस निरीक्षक संजय मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार धनराज चिंगुवार करीत होते. तक्रारीत नमूद केलेला व्हिडिओ पुरावा जप्त करण्याच्या अनुषंगाने विद्यार्थिनीची चौकशी सुरू होती. त्यावेळी तिच्यासोबत आलेला आदित्य वारंवार संभाषणात हस्तक्षेप करीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याला बाजूला बसवून पोलिसांनी विद्यार्थिनीची स्वतंत्रपणे चौकशी केली. या चौकशीतून प्रकरणातील महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत .






