Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai High Court : धक्कादायक! हायकोर्टाबाहेरच करणीचे प्रयोग, नारळ, गुलाल, लिंबू, काळी बाहुली अन्…

अंधश्रद्धा निर्मुलन कायदा लागू झाला तरी त्याच्या अंमलबजावणीबाबत उदासिनता दिसून येते. मात्र आता अंधश्रद्धेबाबत सामाजिक जनजागृती यांबाबतचा प्रश्न उच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वावरच उभा ठाकला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 24, 2025 | 10:36 PM
धक्कादायक! हायकोर्टाबाहेरच करणीचे प्रयोग, नारळ, गुलाल, लिंबू, काळी बाहुली अन्...

धक्कादायक! हायकोर्टाबाहेरच करणीचे प्रयोग, नारळ, गुलाल, लिंबू, काळी बाहुली अन्...

Follow Us
Close
Follow Us:

अंधश्रद्धा निर्मुलन कायदा लागू झाला तरी त्याच्या अंमलबजावणीबाबत उदासिनता दिसून येते. मात्र आता अंधश्रद्धेबाबत सामाजिक जनजागृती यांबाबतचा प्रश्न उच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वावरच उभा ठाकला आहे. जातपात, वर्णभेद, लिंगभेद आणि श्रद्धा-अंधश्रध्देला कोणतेही स्थान नसलेल्या मुंबई उच्च न्यायालयाबाहेरच कोणीतरी नारळ, गुलाल, लिंबू, काळी बाहुली अशी काळ्याजादूसाठी म्हणून ओळखली जाणारी सामग्री मांडण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकाराची राज्यभर चर्चा रंगली आहे.

Kunal Kamra : ‘…तरच माफी मागणार’, राडा, तोडफोडीनंतर कुणाल कामरा थेट बोलला

उच्च न्यायालय इमारतीला चारही बाजूंनी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतो. त्यानंतरही इमारतीच्या आवाराबाहेर चारही बाजूला काळी जादू केल्याचे साहित्य आढळून आले आहे, हे कोणी केले ? कडेकोट बंदोबस्त असताना हा प्रकार घडलाच कसा ? असा प्रश्नही उपस्थित उपस्थित केला जात होता. उच्च न्यायालयातील कामकाज सोमवारी इमारतीबाहेर काळी जादू केल्याच्या बातमीनेच सुरू झाले. ही बातमी सर्वत्र परसल्यानंतर इमारतीत सफाई काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे साहित्य उचलण्यासाठी नेण्यात आले. परंतु, त्यांनी ते उचलण्यास नकार दिला. त्यामुळे, इमारतीबाहेरील सफाईचे काम हे महापालिकेचे असल्याने पालिका कर्मचाऱ्यांना हे साहित्य उचलण्यास बोलवण्यात आले. त्यांनीही घाबरून ते उचलण्यास नकार दिला. एका वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

दुपारपर्यंत हे साहित्य असेच होते. सायंकाळी अखेरीस परिसराची स्वच्छता करण्यात आली. असे असले तरी राज्यात अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात असताना आणि सर्वच भावना, भेदापासून दूर केवळ न्यायदानाचे कार्य सर्वोच्च मानणाऱ्या उच्च न्यायालयाबाहेरच काळ्या जादूचा प्रकार घडल्याचे उघडकीस आल्यानंतर सगळ्यांच्या भुवया उंचवल्या.

उच्च न्यायालयाचे वार्तांकन करण्यासाठी उच्च न्यायालय इमारतीच्या बाहेर उभ्या असलेल्या वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना सोमवारी सकाळी इमारतीबाहेर काळ्या जादूचे साहित्य दिसून आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या फलकाखालीच नारळ, लिंबू, काळी बाहुली, हळद, कुंकू, गुलाल असे साहित्य मांडलेले होते. त्यासंदर्भात चौकशी केली असता, दोन-एक दिवसांपासूनच हे काळ्या जादूचे साहित्य उच्च न्यायालय इमारतीच्या बाहेर ठेवण्यात आले असल्याचे, असे काहींनी सांगितले. तसेच हे काळ्या जादूचे साहित्य उच्च न्यायालयाच्या चार वेगवेगळ्या दिशांना म्हणजे उच्च न्यायालयाच्या चार प्रवेशद्वारांबाहेर ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात आले. परंतु, हा प्रकार कोणी केला ? कधी केला ? याबाबत कोणालाच काही माहिती नाही.

AI in Court : सुप्रीम कोर्टातही होणार आता AI चा वापर; 18 भाषांमध्ये मिळणार निकालपत्र

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अथक प्रयत्नानंतर राज्यात अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आला. डॉ. दाभोलकर यांनी हा कायदा अस्तित्वात आणण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले, तो त्यांच्या हत्येनंतर अस्तित्वात आला. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ असे या कायद्याचे पूर्ण नाव असून २६ ऑगस्ट २०१३ रोजी हा कायदा अंमलात आला.

Web Title: Superstition experiment near bombay high court building in mumbai latest news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 10:12 PM

Topics:  

  • Bombay High Court
  • High court
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
1

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Big Breaking: मुंबईकर गुदमरले! मोनोरेल वाटेतच बंद; ऑक्सिजनशिवाय प्रवाशांचे…; रेस्क्यू ऑपरेशन सुरू
2

Big Breaking: मुंबईकर गुदमरले! मोनोरेल वाटेतच बंद; ऑक्सिजनशिवाय प्रवाशांचे…; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

CJI Bhushan Gawai: “आता खंडपीठ उभारणीसाठी…”; CJI भूषण गवई यांचे कोल्हापुरात प्रतिपादन
3

CJI Bhushan Gawai: “आता खंडपीठ उभारणीसाठी…”; CJI भूषण गवई यांचे कोल्हापुरात प्रतिपादन

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…
4

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.