
प्रचाराची रणधुमाळी थंडावली! मात्र बॅनरवरून नेत्यांचे फोटो गायब, मुंबईतील 'त्या' बॅनरची राज्यभरात चर्चा!
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. उद्या म्हणजेच 15 जानेवारीला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. सर्वांचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे यंदाचा प्रचार अनेक कारणांमुळे चर्चेत ठरला आहे. सोशल मीडियावर AI च्या माध्यमातून प्रचार, बाईक रॅली, चहापान चर्चा, घरोघरी भेटी, मॉर्निंग वॉक इत्यादी माध्यमातून प्रचार करण्यात आला. अनेक उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात उमेदवारांचे स्टिकर्स लावण्यात आले. त्यापैकी एक स्टिकर सध्या सरकारी वर्तुळात चर्चेचा विषय बनत आहे.
दक्षिण मुंबईतील वॉर्ड क्रमांक २१३ मधून शिवसेना पक्षाकडून आशा मामिडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून नतिमा जुनेजा यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून श्रद्धा सुर्वे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेना पक्षाकडून आशा मामिडी यांनी प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी स्टिकर्स लावून प्रचार केल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र या प्रचारातील स्टीकरवर पक्षाच्या एकाही बड्या नेत्यांना स्थान देण्यात आलेलं नाही. महत्त्वाचे म्हणजे या बॅनरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही फोटो नाही. हे लक्षात घेऊन विरोधकांनी यावरुन मामिडी यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन उमेदवारांकडून या स्टीकरवर बड्या नेत्यांना स्थान दिलेले नाही, असा गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात आता स्टीकरवरुन राजकीय वाद उमटण्याची शक्यता आहे.
आहे.
मतदानाची वेळ सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत आहे. मुंबईतील सर्व मतदान केंद्रांवर मतदान होईल. मतदानाबाबत, निवडणूक आयोगाने मतदारांना त्यांच्या नियुक्त केलेल्या मतदान केंद्रांवर निर्धारित वेळेत मतदान करण्याचे आवाहन केले आहे. जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी, १५ जानेवारी २०२६ रोजी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.