महापालिका निवडणुकीआधी मनसे नेत्याची भावनिक पोस्ट
उद्या 29 महानगरपालिकांसाठी होणार मतदान
16 तारखेला होणार निकाल जाहीर
Bala Nandgaonkar: राज्यातील मुंबई, पुणे महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. मुंबई, पुणे महापालिका जिंकण्यासाठी ठाकरे बंधू, भजप, राष्ट्रवादी कॉँग्रेसने जोरदार प्रचार केला आहे. दरम्यान मुंबई महापालिका निवडणूक ही मराठी-अमराठी, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव, ते महायुती सरकारने केलेली विकासकामे यावर फिरताना दिसली. काल प्रचाराची अंतिम मुदत संपली आहे. त्यानंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी भावनिक पोस्ट केली आहे. त्याचा उदय काही मतदानावार परिणाम होणार का हे 16 तारखेलाच कळणार आहे.
काय म्हणाले मनसे नेते बाळा नांदगांवकर?
उद्या होणाऱ्या महापालिका निवडणुकीत मतदान करताना फक्त 2 मिनिटे शांत चित्ताने विचार करा की ही निवडणूक किती महत्त्वाची आहे. यावेळी मराठी माणूस चुकला तर मग पुन्हा संधी नाही. ठाकरेंना जर सत्तेसाठी एकत्र यायचे असते तर ते कधीच आले असते. पण केवळ आपल्या माय मराठी साठी आपल्या महाराष्ट्र धर्मा साठी ही लढाई किती महत्त्वाची आहे हे जाणून ते नेक इराद्याने एक आले आहे.
ठाकरे बंधूंना भाजप सोबत घेणार? फडणवीस स्पष्टच म्हणाले…
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष असणार आहे. निकाल आला की हे महाराष्ट्र राज्य पंतप्रधान मोदी यांच्या पाठीशी असल्याचे आपल्याला दिसून येईल. महानगरपालिकांमध्ये महायुतीचीच सत्ता येणार आहे. राज्यातील जतना आमच्या बाजूने आहे असा मला विश्वास आहे. आम्ही यांच्या प्रचारात विकासाचा मुद्दाच जास्त उचलून धरला, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
प्रेम टिकवायचं का नाही हे ठाकरे बंधूंनी ठरवावं; बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले
महानगरपालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. काही ठिकाणी मित्रपक्षांचे महापौर असणार आहेत. मुंबई महानगरपालिकेत निवडणुकीचा निकाल आल्यावर गरज भासल्यास ठाकरे बंधूंना सोबत घेणार का असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारण्यात आयाला. त्यावर बोलताना त्यांनी आता कोणत्याही युतीची शक्यता नाही. आम्ही बहुमताने सतेत येऊ. त्यांना सोबत घेण्याची गरज अजिबात नाही.






