Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Monorail News: मुंबईकरांची प्रतीक्षा लांबली! आचारसंहितेमुळे मोनोरेलच्या निविदा प्रक्रियेला ब्रेक

मुंबई मोनोरेल सुरू होण्यास आता आणखी विलंब होणार आहे. आचारसंहितेमुळे संचलन आणि देखभालीची २९७ कोटींची निविदा प्रक्रिया रखडली असून अदानी आणि कोकण रेल्वे या शर्यतीत आघाडीवर आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 24, 2025 | 04:52 PM
मुंबईकरांची प्रतीक्षा लांबली! (Photo Credit- X)

मुंबईकरांची प्रतीक्षा लांबली! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • मोनोरेल सुरू करण्यासाठी आणखी विलंब होणार
  • आचारसंहितेमुळे संचलन
  • देखभालीसाठी निविदा प्रक्रिया लांबणीवर
Mumbai Monorail: महामुंबई मेट्रो रेल संचलन महामंडळाने (MMMOCL) मोनोरेलच्या संचलन-देखभालीसाठी मागविण्यात आलेल्या निविदेला चार कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. यामध्ये अदानी समुहासह कोकण रेल्वेच्या निविदेचा समावेश आहे. या चार कंपन्यांमध्ये स्पर्धा असून यात कोणतीही कंपनी बाजी मारते हे निविदा अंतिम झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. या निविदा प्रक्रियेतून एका कंपनीची निवड करून मोनोरेल एप्रिलमध्ये सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे (MMRDA) नियोजन आहे, मात्र आता आचार संहितेमुळे संचलन-देखभालीसाठी निविदा प्रक्रिया रखडणार आहे. ही प्रक्रिया रखडल्याने मोनोरेल सुरू करण्यासाठी आणखी विलंब होणार आहे. यामुळे मोनोरेल प्रवाशांना मोनोतून प्रवास करण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.

मोनोरेल बंद असण्याचे कारण काय?

चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकचे संचलन-देखभालीची जबाबदारी याआधी एल अँड टी-स्कोमी कन्सोर्टियम कंपनीकडे होती. मात्र या कंपनीकडून योग्यप्रकारे संचलन-देखभाल होत नसल्याचा ठपका ठेवण्यात आला. मोनोरेलच्या डब्याला २०१७ मध्ये भीषण आग लागली आणि मोनोरेल काही महिने बंद ठेवावी लागली. या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने २०१८ मध्ये एल अँड टी-स्कोमी कन्सोर्टियम यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेतली आणि एमएमएमओसीएलकडे सोपवली.

हे देखील वाचा: Mumbai High Court: “जर परिस्थिती हाताबाहेर गेली असेल तर…”, मुंबईतील वायू प्रदूषणावर उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

तर दुसरीकडे मोनोरेल मार्गिकेवर सातत्याने अपघात होत आहेत. याच अपघाताच्या अनुषंगाने होणाऱ्या टीकेनंतर २० सप्टेंबर २०२५ पासून मोनोरेल मार्गिका अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली. सध्या मोनोरेल गाड्यांचे, विविध यंत्रणेचे अत्याधुनिकीकरण केले जात आहे. दरम्यान, मोनोरेल मार्गिका बंद करण्याआधीच एमएमएमओसीएलने मोनोरेलच्या संचलन देखभालीसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आणि निविदा मागविल्या होत्या.

आचारसंहितेचा प्रक्रीया ढकलली पुढे

या निविदेला आतापर्यंत चार कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. यामध्ये अदानी इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडवेल कन्स्ट्रक्शन आणि पॉवर मेक प्रोजेक्ट्स अशा या चार कंपन्यांचा त्यात समावेश आहे. या निविदांची छाननी करून आर्थिक निविदा खुल्या करण्यात येणार होत्या, मात्र आता आचारसंहिता असल्याने ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. ही निविदा २९७ कोटी रुपयांची आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण करून मोनोरेल नवीन वर्षात एप्रिलमध्ये सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन होते. मात्र आता आचार संहितेचा खोडा आल्याने ही प्रक्रिया पुढे गेली असून मोनोरेल सुरू करण्यासाठी आणखी विलंब होणार आहे.

हे देखील वाचा: नवी मुंबई विमानतळाचे ‘नामकरण’ की ‘नामांतर’? अधिकृत नाव जाहीर, पण प्रकल्पग्रस्तांचा लढा अजूनही सुरूच!

Web Title: There will be further delays in starting the monorail service

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 04:52 PM

Topics:  

  • Mumbai
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Thane Metro : ठाण्याच्या आतील भागातून धावणार ‘ही’ मेट्रो! रेल्वे आणि मेट्रो स्थानकाला जोडणी, कधी सुरु होणार जाणून घ्या
1

Thane Metro : ठाण्याच्या आतील भागातून धावणार ‘ही’ मेट्रो! रेल्वे आणि मेट्रो स्थानकाला जोडणी, कधी सुरु होणार जाणून घ्या

निवडणुकीमुळे मजुरांच्या खिशात खुळखुळणार पैसे! ५०० ते १५०० रुपयांची रोजंदारी; नाका कामगारांना मोठी मागणी
2

निवडणुकीमुळे मजुरांच्या खिशात खुळखुळणार पैसे! ५०० ते १५०० रुपयांची रोजंदारी; नाका कामगारांना मोठी मागणी

आता म्हाडाचं घर घेणं झालं सोपं! कोकण मंडळ स्वतः मिळवून देणार गृहकर्ज; १२ हजार घरांच्या विक्रीसाठी मोठा निर्णय
3

आता म्हाडाचं घर घेणं झालं सोपं! कोकण मंडळ स्वतः मिळवून देणार गृहकर्ज; १२ हजार घरांच्या विक्रीसाठी मोठा निर्णय

Mumbai Crime News : बिर्याणीने घेतला पत्नीचा जीव! जेवणात मीठ जास्त झालं म्हणून इंजिनिअरनं केली २० वर्षीय पत्नीची हत्या
4

Mumbai Crime News : बिर्याणीने घेतला पत्नीचा जीव! जेवणात मीठ जास्त झालं म्हणून इंजिनिअरनं केली २० वर्षीय पत्नीची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.