नामांतरासाठी नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचा सुरू आहे लढा (Photo Credit - X)
नवी मुंबई विमानतळाचे ‘नामकरण’ की ‘नामांतर’?
‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे अधिकृत नाव सरकारच्या अधिकृत कागदपत्रांवरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा लढा नामकरणासाठी नावे तर नामांतरणासाठी असणार आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते तेजस पाटील यांनी राज्यातील विमानतळांच्या नामकरणाबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे विचारणा केली होती.
दोनच विमानतळांना महापुरुषांची नावे
मंत्रालयाचे अंडर सेक्रेटरी दीपक नागपाल यांनी १९ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, राज्यातील १६ विमानतळांपैकी केवळ मुंबई आणि नागपूर या दोनच विमानतळांना महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत.
नामांतरासाठी २५ डिसेंबर ‘निषेध दिवस’
मानकोली भिवंडी ते नवी मुंबई विमानतळ अशी तीन दिवसीय पायी दिंडी आचारसंहितेमुळे पोलिसांनी परवानगी नाकारल्याने तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. २५ डिसेंबर ‘निषेध दिवस’ विमानतळावरून दिबांच्या नावाविना विमान उडणार असल्याच्या निषेधार्थ २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता गावोगावी काळे झेंडे दाखवून आणि काळी फित लावून निषेध नोंदवला जाईल.
आचारसंहितेनंतर मंत्रालयावर धडक
आचारसंहिता संपल्यानंतर पाचही सागरी जिल्ह्यातील भूमिपुत्र अधिक मोठ्या ताकदीने मुंबईतील मंत्रालयावर धडकणार असल्याचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे.






