कोलकाता: प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी त्यांच्या सन्मानार्थ अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. तसेच मंगेशकरांच्या आवाजाने मंत्रमुग्ध झाल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या. बंगाल आणि पूर्व भारतातील कलाकारांना मंगेशकरांनी दिलेल्या आपुलकीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
ट्विटद्वारे श्रद्धांजली
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट केले की, ‘देशातील महान व्यक्तिमत्त्व, भारतरत्न लता मंगेशकर यांना मी श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या कुटुंबियांबद्दल आणि जगभरातील त्यांच्या अब्जावधी चाहत्यांसाठी माझ्या मनापासून संवेदना.त्या खऱ्या अर्थाने भारताच्या स्वर सम्राज्ञी होत्या.
I pay my heart-felt tribute to the departed icon of India, Bharatratna Lata Mangeshkar. (1/3)
— Mamata Banerjee (@MamataOfficial) February 6, 2022
ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘जगभरातील त्यांचे सर्व चाहते आणि हितचिंतकांप्रमाणेच, मी देखील त्यांचा आवाजाने मंत्रमुग्ध झाले आणि त्यांनी बंगाल आणि पूर्व भारतातील कलाकारांना आणि त्यांच्या अद्भुत जगाला स्नेह दिला याबद्दल मी कृतज्ञ आहे.