मुंबईकरांचा लोकल प्रवास आता अधिक सुरक्षित होणार, पश्चिम रेल्वेवर १२,४४६ व्हिडीओ सव्हॅलन्स सिस्टीम
मुंबईकरांचा रोजचा लोकल प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी पश्चिम रेल्वेने उपनगरीय रेल्वे मार्गावरील १ हजार ६१५ कोचमध्ये १२ हजार ४४६ व्हिडिओ सव्हॅलन्स सिस्टम (व्हीएसएस) सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे. तर मध्य रेल्वेवर लोकलमध्ये व्हिडिओ सव्र्व्हेलन्स सिस्टम प्रणाली अंतिम करण्यात येत आहे. लोकलमधील महिला डब्बा आणि रेल्वे स्थानकांमध्ये यापूर्वीच सीसीटीव्ही लागले आहेत.
BMC चे खड्ड्यांसाठी खास App, पावसाळ्याच्या दिवसात मिळतोय असा फायदा; तुम्ही पाहिले का?
१२३ किमी लांबीच्या चर्चगेट-डहाणू उपनगरीय कॉरिडॉरवर चालणाऱ्या शटल ट्रेन्स व्यतिरिक्त, एसी आणि नॉन-एसी लोकल ट्रेन्सच्या सर्व डब्यांसाठी व्हीएसएसचा समावेश असणार आहे. ही प्रणाली मोटरमन कॅब आणि ट्रेन मॅनेजर्सवर देखील लक्ष ठेवेल. मध्य रेल्वे देखील सीएसएमटी-कर्जत/कसारा/पनवेल कॉरिडॉरवर धावणाऱ्या लोकलमध्ये व्हीएसएस बसविण्यात येणार आहे. याकरिता संबंधित विभागांकडून तपशील अंतिम केले जात आहेत.
१८ ऑगस्टला निविदा उघडण्यात येणार
पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, डब्यांमध्ये व्हीएसएसचा पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कमिशनिंगसाठी निविदा मागवल्या आहेत. येत्या १८ ऑगस्ट रोजी निविदा उघडण्यात येणार आहे. त्यानंतर कंत्राटदार निश्चित करण्यात येणार आहे. कंत्राट दिल्यानंतर काम पूर्ण होण्याकरिता सुमारे आठ ते नऊ महिने लागणार आहेत. १२ हजार ४४६ कॅमेरे बसविण्यासाठी सुमारे ९७कोटी ३० लाखांचा खर्च येणार आहे.
Air India : साडेसाती संपेना! मुंबई विमानतळावर एअर इंडियाचे विमान घसरले, टायर फुटले; इंजिनलाही नुकसान
मध्य रेल्वेचे सीसीटीव्ही
सर्व उपनगरीय स्थानकांवर सुमारे ४ हजार १५४ सीसीटीव्ही कार्यरत आहेत. ७७१ महिला डब्यात सीसीटीव्ही लागला आहे.
तपासणीवर लक्ष केंद्रित
११ जुलै २००६ रोजी मुंबई उपनगरीय रेल्वे बॉम्बस्फोटानंतर रेल्वेने गेल्या काही वर्षांत सुरक्षेवर भर दिला आहे. प्रमुख स्थानकांवर क्विक रिअॅक्शन टीम्सची स्थापना, बॉम्ब शोध आणि निकामी पथके तैनात करणे, संवेदनशील भागात RPF-GRP संयुक्त गस्त वाढवणे, राज्य आणि केंद्रीय संस्थांशी गुप्तचर समन्वय वाढवणे, गर्दीच्या वेळेपूर्वी तोडफोडविरोधी तपासणीवर लक्ष केंद्रित केले आहे.
पश्चिम रेल्वेवरील काम
उपनगरीय स्थानकांवर ३,०४८ सीसीटीव्ही आहेत. १४६ लोकलमधील ४५१ महिला कोचपैकी ३०५ मध्ये सीसीटीव्ही आहेत. फेस रेकग्निशन सिस्टम असलेले ४७० सीसीटीव्ही कार्यरत आहेत. स्थानकांवर, हाय डेफिनेशन आयपी-आधारित सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत जे रिअल-टाइम व्हिडिओ फीड स्टेशन कंट्रोल रूममध्ये पाठवतात.