खड्ड्यांसाठी बीएमसीचे नवे App (फोटो सौजन्य - iStock/Google App)
मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुसळधार आणि सततच्या पावसामुळे मुंबई महानगर प्रदेशातील रस्त्यांवरील खड्डे त्वरीत दुरुस्त करण्यासाठी ‘पॉटहोल क्विक फिक्स’ मोबाईल अॅप सेवा सुरू केली आहे. हे मोबाईल अॅप 9 जूनपासून महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नागरिकांसाठी सुरू केले आहे. गेल्या 40 दिवसांत या अॅपवर खड्ड्यांशी संबंधित एकूण 3,451 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्यापैकी 3,237 तक्रारी 48 तासांत सोडवण्यात आल्या आहेत. तर उर्वरित 114 तक्रारींचे निराकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे असे आता सांगण्यात आले आहे.
तुम्ही हे अॅप अजूनपर्यंत पाहिले नाही का? अथवा तुम्हाला याबाबत काहीच कल्पना नसेल तर आम्ही या लेखातून तुम्हाला सांगत आहोत. कसे आहे हे अॅप आणि याचा वापर तुम्ही कसा करू शकता याबाबत आपण समजून घेऊया.
अॅपवर इतर विभागांकडूनही तक्रारी
अॅपवर खड्ड्यांचे फोटो आणि स्थान अपलोड करण्याची परवानगी आहे. खड्ड्यांव्यतिरिक्त, या अॅपवर इतर विभागांकडूनही 931 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारी संबंधित विभागांना पाठवण्यात आल्या आहेत. मात्र या अॅपवर मूलतः खड्ड्यांबाबत तक्रारी पाहिल्या जात असून त्याचे निवारण करण्यात येत आहे.
Mangal Prabhat Lodha: “…यात महाराष्ट्राचे भरीव योगदान राहणार”; मंत्री मंगल प्रभात लोढांची ग्वाही
अॅप कसे काम करते
हे अॅप नागरिकांना एक सोपा आणि सोयीस्कर डिजीटल पर्याय प्रदान करते, ज्यामध्ये खड्ड्यांचे चित्र, स्थान आणि तपशील अपलोड करून त्वरित तक्रारी नोंदवता येतात. नोंदणीकृत तक्रार संबंधित विभागाच्या कार्यालयात आपोआप पोहोचते, जेणेकरून पालिका अभियंते त्वरित कारवाई करू शकतील. तुम्ही केलेल्या तक्रारी त्वरीत अभियंत्यांकडून तपासण्यात येतात आणि त्यावर लगेच कारवाई करून त्याचे निवारण करण्यात येत आहे.
मुंबईतील प्रवाशांचा खड्ड्याबाबतचा त्रास लवकरात लवकर कमी व्हावा यासाठी हे अॅप काम करत आहे. तसंच अनेक लोक याचा वापर करत असून त्यावर कारवाईदेखील करण्यात येत असल्याचे आता समोर आले आहे.
नागरिकांचा सहभाग वाढवणे
रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यावर आणि नागरिकांसाठी खड्ड्यांशी संबंधित तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सोपी करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ‘Pothole QuickFix’ हे युजर्स-अनुकूल मोबाइल अॅप आहे.
अॅप उघडल्यानंतर, 5 क्लिकपेक्षा कमी वेळात यशस्वीरित्या तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया उपलब्ध झाली आहे. मोबाइल अॅपद्वारे केलेली तक्रार थेट संबंधित विभागापर्यंत पोहोचते आणि खड्डे दुरुस्त करण्याची प्रक्रिया त्वरित सुरू होते. त्यामुळे तुमच्या क्षेत्रातही कोणत्याही खड्ड्यांची समस्या असेल तर तुम्ही या अॅपचा उपयोग करून ती समस्या लवकरात लवकर दूर करण्यासाठी बीएमसीची मदत घेऊ शकता.
मुंबईतील नागरिकांसाठी हे अत्यंत उपयुक्त असे अॅप असल्याचे आता दिसून येत आहे. मुळात रस्त्यातील खड्डे यामुळे लवकरात लवकर बुजतील अशी अपेक्षा आता नागरीक करताना दिसून येत आहेत.