Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई पोलिसांच्या व्हॅनसमोर एकटी दटून राहिली रिया अहिर… तरुणीच्या हिमतीची होतेय सर्वत्र चर्चा; नक्की आहे तरी कोण?

मुंबईतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तिच्या धाडसी कृतीमुळे ती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 24, 2026 | 02:20 PM
मुंबई पोलिसांच्या व्हॅनसमोर एकटी दटून राहिली रिया अहिर... तरुणीच्या हिमतीची होतेय सर्वत्र चर्चा; नक्की आहे तरी कोण?

मुंबई पोलिसांच्या व्हॅनसमोर एकटी दटून राहिली रिया अहिर... तरुणीच्या हिमतीची होतेय सर्वत्र चर्चा; नक्की आहे तरी कोण?

Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान तरुणीच्या धाडसी कृतीने सर्वांचे लक्ष वेधले.
  • व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या ओळखीबाबत सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली.
  • या घटनेनंतर अनेकांनी तिच्या धैर्याचे कौतुक करत विविध प्रतिक्रिया दिल्या.
दिल्लीच्या जंतर-मंतरवर मागील काही काळापासून काॅकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु आहे. सोशल मिडियावर याचे अनेक व्हिडिओज देखील शेअर करण्यात आले आहेत. अशातच आता मुंबईमध्येही विद्यार्थ्यांनी नीट पेपरफुटी प्रकरणावरुन आंदोलने करायला सुरुवात केली आहे. इंटरनेटवर या आंदोलनांची चर्चा होत असतानाच आता एका मुलीचा व्हिडिओ अलिकडे प्रचंड ट्रेंड करत आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगी पोलिस व्हॅनला अडवताना दिसली. खरंतर पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना व्हॅनमध्ये बंद केले होते. अशात मुलीने धाडसाने रस्त्यातच व्हॅन अडवली आणि मुलांना व्हॅनमधून मुक्त केलं. मुलीच्या धैर्याचे आता सोशल मिडियावर काैतुक होत असून याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

तानसा,विहार, तुळशी तलाव तुडुंब भरले. तलावांत एकूण ६१.९० टक्के जलसाठा

पोलिसांची व्हॅन अडवणारी मुलगी आहे कोण?

मुंबईमध्ये पोलिस व्हॅन अडवणाऱ्या मुलीचे नाव आहे रिया यादव. रिया एका अभिनेत्री, माॅडल आणि उद्योजक आहे. रिया सामाजिक आणि राजकीय विषयांवर उघडपणे आपले मत मांडते. एक उद्योजिका म्हणून, ती हाताने कपडे शिवते. तिचा ‘रियासत’ नावाचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड आहे. रियाला नृत्याचीही आवड आहे. तिने अनेक म्यूजिक व्हिडिओमध्येही काम केले आहे ज्यात अलीकडील ‘दिलबरा’ या गाण्याचा समावेश आहे.

स्वभावाने रिया धार्मिक असून तिचा देवावर फार श्रद्धा आहे. ती दररोज मंदिरांमध्ये जाऊन देवाची पूजा-अर्चा करते. रिया मागील काही काळापासून इंटरनेटवर खूप चर्चेत आहे. विद्यार्थ्यांच्या विरोध प्रदर्शनादरम्यान रियाचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच लक्षवेधी ठरला. यात ती पोलिसांसमोर निडर होऊन त्यांची व्हॅन अडवताना दिसून आली. रियाने एकटीनेच पोलिसांना व्हॅन पुढे नेण्यापासून रोखून ठेवले.

पोलिस व्हॅनसमोर उभी राहिली

बुधवारी शिवाजी पार्कमध्ये होत असलेल्या आंदोलनात रिया प्रमुख चेहरा ठरली. रिया दादरमधील कोहिनूर चौकातून शिवाजी पार्ककडे चालत जात असताना तिला ताब्यात घेतलेल्या आंदोलकांनी भरलेली एक पोलीस व्हॅन दिसली. ती लगेच व्हॅनच्या दिशेने वळली आणि व्हॅनचा रस्ता अडवत समोर जाऊन उभी राहिली. इतकंच नाही तर व्हॅनच्या जवळ जाऊन तिने एका हाताने व्हॅनला पुढे जाण्यापासून रोखून धरले. वृत्तानुसार, पोलिसांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला, विद्यार्थ्यांना नंतर सोडून देऊ असेही त्यांनी म्हटले पण शेवटपर्यंत रिया हटण्यास तयार झाली नाही. अखेरीस, रियाच्या प्रयत्नांना यश आले आणि पोलिसांनी सर्व आंदोलकांना व्हॅनमधून सोडून दिले.

Meet Rhiya Ahir [IG: rhiyaahir]👏 One fearless young woman stood in front of a police van during the Mumbai student protests, refusing to back down. Courage can’t be bought. Justice can’t be silenced. Salute to her. 🫡🫡 pic.twitter.com/c9oAvhQPeq — زماں (@Delhiite_) July 22, 2026

FDA On BMC Canteen: मुंबई महापालिका कँटीनवर FDAचा दणका; ताकात माशी सापडल्याने कँटीन सील करण्याचे निर्देश

रियाने आरोप लावला की, पोलिस आपले काम जबाबदारीने करत नाहीयेत. जर ते आपली जबाबदारी नीट पार पाडत नसतील तर आपणच स्वतःच आपल्या नागरिकांची जबाबदारी घेतली पाहिजे. रियाने मिडियाला सांगितले की, ती दलित नाही, ओबीसी नाही, तिचे वडिल शेतकरी आहेत. तिने विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवला कारण पोलिस त्यांना विनाकारण मारहाण करत होते. यासोबतच आपल्या संस्कृतीचा आणि समाजाचा तिला अभिमान असल्याचेही तिने मिडियाला सांगितले.

Web Title: Who is riya yadav mumbai student protest police van viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Mumbai News
  • Mumbai Police

संबंधित बातम्या

CJP Press Conference: CJPच्या टीमला आज रात्री अटक होऊ शकते..; अभिजीत दिपकेंचा खळबळजनक दावा
1

CJP Press Conference: CJPच्या टीमला आज रात्री अटक होऊ शकते..; अभिजीत दिपकेंचा खळबळजनक दावा

Delhi Police: दिल्लीत हाय अलर्ट! वरिष्ठांपासून कॉन्स्टेबलपर्यंत…; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय
2

Delhi Police: दिल्लीत हाय अलर्ट! वरिष्ठांपासून कॉन्स्टेबलपर्यंत…; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय

Maharashtra News: वंचित आघाडीचा रास्ता रोको, पोलिसांकडून आंदोलनकर्ते ताब्यात
3

Maharashtra News: वंचित आघाडीचा रास्ता रोको, पोलिसांकडून आंदोलनकर्ते ताब्यात

वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतरही CJP चे आंदोलन सुरुच राहणार; अभिजित दीपकेंनी केलं मोठं विधान, म्हणाले…
4

वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतरही CJP चे आंदोलन सुरुच राहणार; अभिजित दीपकेंनी केलं मोठं विधान, म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.