Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC Election: ‘मुंबई पालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंसोबत लढणार नाही’; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. नेत्यांच्या नीही. गेली वर्षानुवर्षे जे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहेत. काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन उभे आहेत,

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 22, 2025 | 12:38 PM
BMC Election

BMC Election

Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार नाही
  • स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका
  • BMC निवडणुका स्वबळावर लढण्याबाबतचा निर्णय काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांवरच सोडावा,

BMC Election: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार नाही, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य काँग्रेसचे वरिष्ठ नेते भाई जगताप यांनी केले आहे.

भाई जगताप हे अनेक वर्षांपासून काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात. ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष राहिले असून पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मुंबईतील राजकारणात काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि इतर महाविकास आघाडीच्या पक्षांमधील समीकरणांवर या घोषणेचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Delhi Air Pollution : दिल्लीकरांचा श्वास कोंडला! दिवाळीच्या मुहूर्तावर मोडला प्रदुषणाचा मागील चार वर्षांचा रेकॉर्ड

यासंदर्भात बोलताना भाई जगताप म्हणाले की, मुबंई महापालिका निवडणुकीत राज ठाकरे सोडाच पण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच काँग्रेस लढणार नाही, मी काँग्रेसचा अध्यक्ष असताना ही गोष्टी डंके की चोट पर सांगितली होती. आमच्या राजकीय कामकाज समितीची बैठक झाली होती. त्या बैठकीतही मी रमेश चेन्निथला यांच्यासमोर ही गोष्ट सांगितली होती.

राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. नेत्यांच्या नीही. गेली वर्षानुवर्षे जे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहेत. काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन उभे आहेत, आपण कधी ना कधी निवडणूक लढवावी, अशी त्यांचीही इच्छा असते. त्यामुळे या निवडणुका कार्यकर्त्यांना लढू द्या, कोणी कोणासोबत लढायचे हे स्थानिक कार्यकर्त्यांना ठरवू द्या, आम्ही मुंबईतील स्थानिक कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही मुंबईत स्वबळावर लढुयात, असे काँग्रेसच्या बैठकीत ठरल्याचे भाई जगताप यांनी सांगितले.

भाई जगताप म्हणाले, महापालिका निवडणुकीत उद्धवजींसोबत जाऊ नये,असे मी सांगितले होते. तर राज ठाकरेंचा प्रश्नच येत नाही. काँग्रेसने आजपर्यंत कधीही राज ठाकरेंना सोबत घेऊ, असे म्हटलेले नाही. महाविकास आघाडीत शिवसेना एकटी नाही, उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत आले त्यावेळी शिवसेना एकटीच होती. आता दोन शिवसेना झाल्या. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याबाबतचा निर्णय काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांवरच सोडावा, स्थानिक कार्यकर्त्यांची ठाकरें बंधुसोबत एकत्र निवडणूक लढण्याची इच्छा नाही.

1993 Bomb Blast: १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषीसाठी दयेची मागणी; भाजप नेत्याचे मुख्यमंत्री रेखा गुप्तांना पत्र

  मनसेशी आमचे मुलभूत मतभेद, अंतिम निर्णय हायकमांड घेणार

काँग्रेसच्या मिडिया सेलचे प्रमुख सचिन सावंत म्हणाले की, “मनसेसोबत आमचे मुलभूत मतभेद आहेत आणि त्यामध्ये काही शंका नाही. आमची बैठक चेन्नीथला यांच्यासोबत झाली असून त्यावेळी आम्ही आमची मते स्पष्टपणे मांडली आहेत. प्रत्येक नेत्याची भूमिका चेन्नीथला यांनी बारकाईने ऐकून घेतली.

“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांशी चर्चा करून वरिष्ठ नेते निर्णय घेतात. काँग्रेस हायकमांड सर्व संबंधितांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेईल.” सावंत यांच्या या वक्तव्यामुळे मनसेसोबत संभाव्य युतीच्या चर्चांवर नव्या चर्चांना ऊत आला आहे.

 

Web Title: Will not contest with thackeray brothers in mumbai municipal elections claims senior congress leader

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 12:38 PM

Topics:  

  • BMC Election
  • Congress

संबंधित बातम्या

मोदी-फडणवीसांकडून सोयाबीन उत्पादकांची फसवणूक, मतदार म्हणून तरी शेतकऱ्यांना मदत करा; काँग्रेसची मागणी
1

मोदी-फडणवीसांकडून सोयाबीन उत्पादकांची फसवणूक, मतदार म्हणून तरी शेतकऱ्यांना मदत करा; काँग्रेसची मागणी

स्वतः जेवण बनवले, आदिवासींसोबतच मुक्काम; सपकाळांनी साजरी केली अनोखी दिवाळी
2

स्वतः जेवण बनवले, आदिवासींसोबतच मुक्काम; सपकाळांनी साजरी केली अनोखी दिवाळी

तेजस्वी यादव महाआघाडीचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा, दोन उपमुख्यमंत्र्यांचीही नियुक्ती; अशोक गेहलोत यांची मोठी घोषणा
3

तेजस्वी यादव महाआघाडीचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा, दोन उपमुख्यमंत्र्यांचीही नियुक्ती; अशोक गेहलोत यांची मोठी घोषणा

Congress on Medha Kulkarni: तुम्ही किती बुरसटलेल्या विचारांचे आहात हे जनतेला कळेल; काँग्रेस नेत्याने उडवली मेधा कुलकर्णींची खिल्ली
4

Congress on Medha Kulkarni: तुम्ही किती बुरसटलेल्या विचारांचे आहात हे जनतेला कळेल; काँग्रेस नेत्याने उडवली मेधा कुलकर्णींची खिल्ली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.