Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Division MLC Election: आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा ! पैशांचे आमिष, आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपांची निवडणुकीत चर्चा

Pune Division MLC Election: पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत रोजगार, स्पर्धा परीक्षार्थीच्या समस्या, उच्चशिक्षित तरुणांच्या रोजगाराच्या संधी, शिक्षकांचे प्रलंचित प्रश्न आणि शिक्षण क्षेत्रातील अडचणी हे मुद्दे केंद्रस्थानी होते.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 24, 2026 | 10:03 AM
Chandrakant Patil Pune MLC Election, Pune Graduate Constituency Election 2026,

Chandrakant Patil Pune MLC Election, Pune Graduate Constituency Election 2026,

Follow Us
Follow Us:
  • पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान
  • १,०५१ केंद्रांवर ४.५ लाख मतदारांनी नोंदवला कौल
  • २७ ऑक्टोबरला येणार निकाल
  • भाजपच्या दोन्ही उमेदवारांच्या एकतर्फी विजयाचा दावा.
Maharashtra MLC Election: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत शुक्रवारी (दि. २३) मतदानाच्या प्रक्रियेसोबतच राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण चांगलेच तापले. सकाळी आठ वाजता मतदानाला शांततेत सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांत शिक्षक मतदारसंघाने मतदानात आघाडी घेतली, तर दिवसभर पदवीधर आणि शिक्षक मतदारांचा प्रतिसाद, प्रमुख नेत्यांचे मतदान, उमेदवारांचे विजयाचे दावे आणि मतदानाच्या गोपनीयतेसह आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या आरोपांमुळे निवडणूक चर्चेत राहिली.

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत रोजगार, स्पर्धा परीक्षार्थीच्या समस्या, उच्चशिक्षित तरुणांच्या रोजगाराच्या संधी, शिक्षकांचे प्रलंचित प्रश्न आणि शिक्षण क्षेत्रातील अडचणी हे मुद्दे केंद्रस्थानी होते. पुणे हे राज्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्र असल्याने या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले होते.

या निवडणुकीसाठी पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत दोन्ही मतदारसंघांसाठी एकूण १ हजार ५१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. एकूण ४ लाख ४९ हजार ९५९ मतदार मतदानासाठी पात्र होते.

Pune News : राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवं वळण! भिगवण, मांजरी अन् पुणे कनेक्शनची चर्चा

भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा मोठ्या फरकाने विजय

राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा मोठ्या फरकाने विजय होईल, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, कोल्हापूरचा आढावा घेऊन पुण्यात आलो आहे. एका मतदान केंद्राला भेट देऊन मतदारांशी संवाद साधला.

… आता निकालाबाबत उत्सुकता वाढली

दिवसभरात मतदारांचा सहभाग, प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया, उमेदवारांचे विजयाचे दावे आणि आचारसंहितेच्या कथित उल्लंघनावरून झालेली टीका यामुळे पुणे विभागातील दोन्ही मतदारसंघांच्या निवडणुकीला राजकीय रंग चढला. एका बाजूला रोजगार आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविणाऱ्या प्रतिनिधीची अपेक्षा मतदारांनी व्यक्त केली, तर दुसरीकडे निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक राहण्याची मागणी पुढे आली. त्यामुळे मतदानानंतर आता दोन्ही मतदारसंघांतील निकालाकडे राजकीय वर्तुळासह मतदारांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Politics: ‘आंदोलनाशी संबंधित व्यक्तींनी आयुक्तांच्या विरोधात…’; संजय निरुपमांचा निशाणा

 

‘सुशिक्षित आहोत, अशिक्षित नाही’चा संदेश व्हायरल

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदानादरम्यान सोशल मीडियावर एका चिठ्ठीची जोरदार चर्चा रंगली. मतदान यादीतील भाजपच्या उमेदवाराच्या नावावर ‘सुशिक्षित आहोत, अशिक्षित नाही असा संदेश लिहिलेली विडी चिकटवण्यात आल्याचे छायाचित्र व्हायरल झाले. त्यानंतर ‘पैसे आले भाजपाचे, मत मात्र हर्षदा ताईंना!’ या उपरोधिक संदेशातून सोशल मीडियावर राजकीय टोलेबाजी सुरू झाली.

मतदानाच्या दिवशी या छायाचित्रामुळे राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चला उधाण आले. मात्र, या संदेशामागील व्यक्ती कोण आणि त्याची नेमकी पार्श्वभूमी काय, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी एकूण किती मतदान केंद्रे व मतदार होते?

    Ans: पुणे विभागातील ५ जिल्ह्यांमध्ये एकूण १,०५१ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती आणि ४ लाख ४९ हजार ९५९ मतदार मतदानासाठी पात्र होते.

  • Que:  मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीबाबत काय मोठा दावा केला?

    Ans: चंद्रकांत पाटील यांनी दावा केला की भाजपचे दोन्ही उमेदवार ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवून एकतर्फी विजय मिळवतील.

  • Que: या निवडणुकीची मतमोजणी कधी आणि कुठे पार पडणार आहे?

    Ans: सोमवारी, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाईल.

Web Title: Elections pune division graduate teachers mlc election chandrakant patil claims victory as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Maharashtra Politics
  • MLC election Maharashtra
  • Nationalist Congress Party
  • Pune Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘आंदोलनाशी संबंधित व्यक्तींनी आयुक्तांच्या विरोधात…’; संजय निरुपमांचा निशाणा
1

Maharashtra Politics: ‘आंदोलनाशी संबंधित व्यक्तींनी आयुक्तांच्या विरोधात…’; संजय निरुपमांचा निशाणा

पुणे विभागात पदवीधर-शिक्षक निवडणुकीची रंगत; मतदारसंघांत महायुतीच बाजी मारणार, शिवेंद्रसिंहराजेंचा दावा
2

पुणे विभागात पदवीधर-शिक्षक निवडणुकीची रंगत; मतदारसंघांत महायुतीच बाजी मारणार, शिवेंद्रसिंहराजेंचा दावा

जरांगेच्या ऑडिओ बॉम्बवरून महायुतीत पळापळ! भाजप – शिंदेसेनेमध्ये चांगलीच जुंपली, रामदास कदमांच्या आरोपांवरून Pravin Darekar भडकले
3

जरांगेच्या ऑडिओ बॉम्बवरून महायुतीत पळापळ! भाजप – शिंदेसेनेमध्ये चांगलीच जुंपली, रामदास कदमांच्या आरोपांवरून Pravin Darekar भडकले

Sushilkumar Shinde : ‘मी काँग्रेसमध्येच राहणार’; भाजप प्रवेशाच्या चर्चेवर सुशीलकुमार शिंदेंचं उत्तर
4

Sushilkumar Shinde : ‘मी काँग्रेसमध्येच राहणार’; भाजप प्रवेशाच्या चर्चेवर सुशीलकुमार शिंदेंचं उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.