Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Congress Voter Campaign : १३ कोटी मतदारांच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक! भरतसिंह सोलंकींची देशव्यापी मोहिमेची घोषणा

Congress Voter Campaign : मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा दावा केलेल्या मतदारांना पुन्हा मतदानाचा हक्क मिळवून देण्यासाठी काँग्रेस देशव्यापी मोहीम राबवणार आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 24, 2026 | 09:15 PM
congress dharashiv

congress dharashiv

Follow Us
Follow Us:
  • वगळलेल्या मतदारांना पुन्हा हक्क मिळवून देण्यासाठी काँग्रेस मैदानात
  • १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान देशव्यापी जनजागृती मोहीम
  • मतदार यादीतील कथित घोळावरून भाजपवर भरतसिंह सोलंकींचा निशाणा
 

धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : काँग्रेसच्या काळात निवडणूक आयोगाचे आयुक्त नेमण्याची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत केली जात होती. मात्र, भाजप सरकारने ही प्रक्रिया रद्द करून गृह मंत्रालयाच्या माध्यमातून राबविण्यास सुरुवात केली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नियुक्ती केलेल्या ज्ञानेश कुमार यांना हाताशी धरून देशातील १३ कोटी मतदारांना वगळले आहे. त्यांना त्यांच्या संविधानिक मतदानाच्या हक्कापासून दूर लोटली असून त्यांना पुन्हा त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी काँग्रेस संपूर्ण देशभरामध्ये लोकशाही वाचवा, संविधान वाचवा , मत वाचवा, देश वाचवा ही मोहीम दि.१ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत वगळलेल्या १३ कोटी मतदारांना पुन्हा संविधानिक हक्क मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रभारी भरतसिंह सोलंकी यांनी २४ ऑक्टोबर रोजी केले. (Congress Voter Campaign)

धाराशिव शहरातील काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, माजी जिल्हाध्यक्ष ॲड धीरज पाटील, ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे, लातूर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख, राजभाऊ शेरखाने, प्रशांत पाटील, खलील सय्यद, अग्निवेश शिंदे, धनंजय राऊत, विनोद वीर, अरविंद बेडगे, भैय्या निरफळ, आयुब पठाण, दयानंद पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेसची 200 जागांची यादी सादर; लोकसभा निवडणुकीतील यशामुळे पक्षाचा वाढला आत्मविश्वास

“भाजपने ईव्हीएम मशीन आणि मतदार यादीमध्ये घोटाळे केले”

पुढे बोलताना सोलंकी म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजप निवडून येत असे असून भाजपने ईव्हीएम मशीन आणि मतदार यादीमध्ये घोटाळे केले असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच एसआयआरच्या ६२ लाख लोकांना वगळले आहे. वगळलेल्या लोकांना त्यांच्या मतदानाच्या स्वातंत्र्यापासून दूर लोटण्याचे महापाप भाजपने केले असून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसने मोठे योगदान दिले आहे.

संविधानाने देशातील नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला आहे. परंतू, भाजपला देशाच्या स्वातंत्र्याचे किंवा नागरिकांच्या स्वतंत्र्याची काही देणे घेणे नसल्याचा घणाघात त्यांनी केला. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जुन्या मतदाराला पुन्हा नव्याने नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. विशेष म्हणजे अर्थतज्ञ अमर्त्य सेन व सुभाष चंद्र बोस यांच्या नातवाचे देखील नाव मतदार यादीतून वगळले आहे. यांची मतचोरी हरियाणापासून पकडली गेली. ज्ञानेशकुमार यांच्या दोन सहकाऱ्यांनी फक्त १० दिवसांमध्ये चक्क १४ वेळेस ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयाला आव्हान दिल्याचे त्यांनी सांगितले.

मोदी व शहा हे ज्ञानेशकुमार यांना ताकद देत असल्याचा आरोप त्यांनी केला. २०१४ ला लोकपाल आणायच्या नावाखाली अण्णा हजारे यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात गोंधळ घातला. सत्तेवर आल्यानंतर भाजपने लोकपाल बिल का आणले नाही ? असा प्रश्नही त्यांनी विचारला. पश्चिम बंगाल मध्ये भाजपने सत्तेवर येतात अमित शहा च्या सांगण्यावरून सर्व मुख्य अधिकाऱ्यांना त्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असल्याचा आरोप त्यांनी केला.

एसएसआर कार्यक्रम १७ राज्यात

एसआयआर ऐवजी एसएसआर कार्यक्रम देशातील सतरा राज्यांमध्ये बनवला आहे. आगामी काळात पाच राज्यांमध्ये निवडणुका होऊ घातल्या असून भाजपचा त्या ठिकाणी निश्चितपणे पराभव होणार असल्याचा आत्मविश्वास सोलंकी यांनी व्यक्त केला. वगवलेले १३ कोटी मतदार नेमके गेले कुठे, त्यांना का वगळले ? असा प्रश्न विचारीत ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जिल्हा, तालुका, पंचायत समिती, व गाव निहाय बीएलए – २ नेमून वगळलेल्या मतदारांना व नवीन मतदारांना मतदार यादी मध्ये समावेश करून ती यादी बीएलओकडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यासाठी रामलीला मैदानावर दि.१ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ या दोन महिन्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. यामध्ये देशभरातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सोलंकी यांनी आवर्जून सांगितले.

Five Former CMs Rejoin Congress: पाच माजी मुख्यमंत्री पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर; SIR विरोधातील लढा अधिक आक्रमक होणार

Web Title: Congress voter campaign 13 crore voters bharatsinh solanki vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • Congress
  • Election Commission
  • Gyanesh Kumar
  • SIR
  • Voter List

संबंधित बातम्या

INDIA Alliance Mega Rally at Delhi: १ नोव्हेंबरला ‘इंडिया’ आघाडीची महारॅली!; ५ लाखांच्या गर्दीचे लक्ष्य
1

INDIA Alliance Mega Rally at Delhi: १ नोव्हेंबरला ‘इंडिया’ आघाडीची महारॅली!; ५ लाखांच्या गर्दीचे लक्ष्य

Five Former CMs Rejoin Congress:पाच माजी मुख्यमंत्री पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर; SIR विरोधातील लढा अधिक आक्रमक होणार
2

Five Former CMs Rejoin Congress:पाच माजी मुख्यमंत्री पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर; SIR विरोधातील लढा अधिक आक्रमक होणार

चक्क भाजप खासदाराचे नाव मतदारयादीतून गायब; समाजवादी पक्षाचा राज्य निवडणूक आयोगावर निशाणा
3

चक्क भाजप खासदाराचे नाव मतदारयादीतून गायब; समाजवादी पक्षाचा राज्य निवडणूक आयोगावर निशाणा

Pune Division MLC Election: आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा ! पैशांचे आमिष, आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपांची निवडणुकीत चर्चा
4

Pune Division MLC Election: आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा ! पैशांचे आमिष, आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपांची निवडणुकीत चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.