Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local : पुन्हा लोकलचा जीवघेणा प्रवास! सकाळच्या गर्दीत धडकी भरवणारी घटना, दिवा-मुंब्रादरम्यान महिला थेट पडली रुळावर; Video

Mumbai Local: मुंबई, लोकल आणि सकाळची गर्दी हे एक वेगळे समीकरण झालं आहे.सकाळच्या वेळेत मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असते, विशेषतः सकाळी ७ ते ११ या वेळेत कार्यालयात जाणाऱ्या प्रवाशांची खूप मोठी रेलचेल असते. नेमके याच वेळेत लोकल अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 10, 2026 | 04:51 PM
पुन्हा लोकलचा जीवघेणा प्रवास! सकाळच्या गर्दीत धडकी भरवणारी घटना, दिवा-मुंब्रादरम्यान महिला थेट पडली रुळावर; पाहा Video

पुन्हा लोकलचा जीवघेणा प्रवास! सकाळच्या गर्दीत धडकी भरवणारी घटना, दिवा-मुंब्रादरम्यान महिला थेट पडली रुळावर; पाहा Video

Follow Us
Follow Us:
  • लोकलमधील गर्दी जीवावर!
  • दिवा-मुंब्रादरम्यान महिला थेट रुळावर कोसळली
  • सिग्नलमुळे टळला अनर्थ
 

Mumbai Local : मुंबईची लाईफलाईन म्हणून लोकलकडे पाहिलं जातं. मात्र मुंबईत सकाळच्या ‘पीक अवर्स’ (सकाळी ७.०० ते १०.००) दरम्यान लोकल ट्रेनचा विलंब, गर्दी या सर्व कारणांमुळे प्रवाशांना ऑफीसमधल्या लेटमार्कला सामोरे जावं लागत. विशेषतः मध्य रेल्वे (Central Railway) आणि पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावर तांत्रिक बिघाड, पायाभूत सुविधांची सुरू असलेली कामे (जसे की फलाट विस्तार) आणि ऐन वेळेस रद्द होणाऱ्या फेऱ्यांमुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

याचदरम्यान आज (10 सप्टेंबर 2026) मध्य रेल्वेवरील सकाळच्या गर्दीच्या वेळेत डोंबिवलीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलमध्ये धक्कादायक घटना घडली. डोंबिवली स्थानकातून सकाळी 7.56 वाजता सुटलेल्या लोकलमधून दिवा-मुंब्रादरम्यान एक महिला प्रवासी थेट रेल्वे रुळावर पडली. सुदैवाने सिग्नलमुळे लोकल थांबलेली असल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत महिलेला किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.या घटनेनंतर घाबरलेल्या काही महिला प्रवाशांनी रुळावरून चालत मुंब्रा स्थानक गाठल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे गर्दीच्या वेळेतील लोकल प्रवासाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Mumbai Local: अरे देवा! ‘ट्रेन निघून गेली…’, लोकलने प्रवास करण्यापूर्वी वाचा महत्त्वाची अपडेट; वेळा, मार्ग अन् थांब्यांत बदल

गर्दीमुळे सुटला तोल

सकाळी 7.56 वाजताची डोंबिवली-CSMT लोकल नेहमीप्रमाणे प्रवाशांच्या गर्दीने भरलेली होती. दिवा स्थानक ओलांडल्यानंतर मुंब्र्याजवळ सिग्नल असल्याने लोकलचा वेग कमी झाला आणि गाडी थांबली. याचवेळी डब्यातील प्रचंड गर्दीत दाराजवळ असलेल्या महिला प्रवाशाचा तोल गेला आणि ती खाली रुळावर पडली. महिला रुळावर पडल्याचे पाहून डब्यातील प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत तिला मदत केली. महत्त्वाचे म्हणजे लोकल त्या क्षणी थांबलेली होती. त्यामुळे संभाव्य गंभीर दुर्घटना टळली.

महिला प्रवाशांनी रुळांवरून गाठले मुंब्रा स्थानक

या घटनेनंतर लोकलमधील काही महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. डब्यातील गर्दी आणि पुढील प्रवासाचा धोका लक्षात घेऊन काही महिलांनी लोकलमधून खाली उतरून रेल्वे रुळांवरून चालत मुंब्रा स्थानक गाठण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. ही बाबही प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहे. रेल्वे रुळांवरून चालणे अत्यंत धोकादायक असून दुसऱ्या मार्गावरून येणाऱ्या गाडीमुळे मोठी दुर्घटना घडू शकते.

AC लोकलनंतर साध्या लोकलवर गर्दीचा भार?

स्थानिक प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, सकाळच्या गर्दीच्या वेळेत या मार्गावर आधी वातानुकूलित लोकल धावते. त्यानंतर येणाऱ्या साध्या लोकलमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. प्रवाशांना डब्यात उभे राहण्यासाठीही पुरेशी जागा मिळत नसल्याने अनेक जण दरवाजाजवळ प्रवास करताना दिसतात. त्यामुळे गर्दीच्या वेळेतील लोकलचे नियोजन आणि सामान्य लोकलच्या फेऱ्यांची संख्या याबाबत प्रवाशांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दिवा-मुंब्रादरम्यानचा प्रवास पुन्हा चर्चेत

दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान रेल्वेमार्गावर तीव्र वळण आहे. या भागात यापूर्वीही गर्दीच्या लोकलमधून प्रवासी पडल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत अतिरिक्त लोकल चालवाव्यात, साध्या लोकलवरील प्रवासी भार कमी करण्यासाठी वेळापत्रकाचा फेरविचार करावा आणि दिवा-मुंब्रा पट्ट्यात सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Mumbai Local Megablock : रविवारी प्रवाशांचा खोळंबा! मेगाब्लॉकमुळे ट्रान्स-हार्बरला फटका; वंदे भारतसह एक्स्प्रेसही होणार लेट

Web Title: Woman falls on railway track from crowded dombivli csmt local near mumbra central railway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 04:51 PM

Topics:  

  • central railway
  • Mumbai Local
  • Train

संबंधित बातम्या

Central Railway Mega Block: मुंबई लोकलचं वेळापत्रक बदलणार! मध्य रेल्वेवर मंगळवारी 12 तासांचा मेगा ब्लॉक
1

Central Railway Mega Block: मुंबई लोकलचं वेळापत्रक बदलणार! मध्य रेल्वेवर मंगळवारी 12 तासांचा मेगा ब्लॉक

Indian Railways: रेल्वे स्थानक, जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस म्हणजे काय? रेल्वे प्रवाशांनी जाणून घ्या यामागील फरक
2

Indian Railways: रेल्वे स्थानक, जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस म्हणजे काय? रेल्वे प्रवाशांनी जाणून घ्या यामागील फरक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.