Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Railways: रेल्वे स्थानक, जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस म्हणजे काय? रेल्वे प्रवाशांनी जाणून घ्या यामागील फरक

मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून मुंबई लोकलची ओळख आहे. रेल्वेने अतिशय जलद आणि कमी वेळात प्रवास होतो. चला तर जाणून घेऊया 'सेंट्रल', 'जंक्शन', 'स्टेशन' आणि 'टर्मिनल वा टर्मिनस' यांच्यात फरक आहे?

  • By सुरुची कदम, दिपाली नाफडे
Updated On: Sep 05, 2026 | 02:35 PM
रेल्वे स्थानक, जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस म्हणजे काय? रेल्वे प्रवाशांनी जाणून घ्या यामागील फरक

रेल्वे स्थानक, जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस म्हणजे काय? रेल्वे प्रवाशांनी जाणून घ्या यामागील फरक

Follow Us
Follow Us:

Indian Railways: रेल्वे अगदी काही वेळासाठी जरी ठप्प झाली ना तरी मुंबईकरांची दैना होते. आपण एखाद्या स्टेशनचं नाव अगदी सहज उच्चारतो. मुंबई सेंट्रल, बांद्रा टर्मिनस, कल्याण जंक्शन हे अगदी आपल्या तोंडावर उच्चार असतात. ट्रेनने प्रवास करताना आपण सर्वांनी सेंट्रल, जंक्शन आणि टर्मिनस हे शब्द ऐकलेत. पण तुम्हाला माहित आहे का की ‘सेंट्रल’, ‘जंक्शन’, ‘स्टेशन’ आणि ‘टर्मिनल वा टर्मिनस’ यांच्यात फरक आहे? जर नसेल, तर आम्ही त्यांच्यातील फरक अगदी सोपा करून आज सांगतोय.(फोटो सौजन्य – istock)

Teachers Day 2026: आधुनिक काळातील शिक्षकांसमोरील आव्हाने! विद्यार्थ्यांना घडविणे हाच स्वधर्म समजने शिक्षकांसाठी गरजेचे

सगळ्यात आधी ‘सेंट्रल’ म्हणजे काय? ते जाणून घेऊया

जेव्हा एखाद्या रेल्वे स्टेशनला ‘सेंट्रल’ म्हटले जाते, तेव्हा याचा अर्थ असा होतो की ते शहरातील सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन आहे आणि त्या शहरात इतरही अनेक रेल्वे स्टेशन्स आहेत. या स्टेशन्सना ‘सेंट्रल’ म्हटले जाते कारण येथून सुटणाऱ्या गाड्या देशाच्या सर्व विभागांना जोडतात. येथून अनेक गाड्या सुटतात. भारतात काहीच स्टेशन्स सेंट्रल आहेत त्यापैकी एक मुंबई सेंट्रल आहे तर एक कानपूर सेंट्रल आहे.

 

आता ‘जंक्शन’ म्हणजे नक्की काय हे समजून घेऊया

जंक्शन हा इंग्रजी शब्द असून याचा मराठी अर्थ म्हणजे ‘जोडणारे’. म्हणून, असे कोणतेही स्थानक जिथे दोन गाड्या वेगवेगळ्या रुळांवरून एकाच वेळी येऊ आणि जाऊ शकतात, त्याला जंक्शन म्हणतात. शिवाय, रेल्वे जंक्शनवर ट्रेनसाठी तीन मार्ग असतात. रेल्वे जंक्शन स्थानकांपेक्षा खूप मोठे असतात. अहवालानुसार, भारतात ३०० पेक्षा जास्त जंक्शन आहेत.

टर्मिनल म्हणजे काय?

टर्मिनलला टर्मिनस असेही म्हणतात. टर्मिनल हे एक असे स्थानक आहे जिथून ट्रेन पुढे जाऊ शकत नाही. याचा अर्थ असा की, हे शेवटचे रेल्वे स्थानक आहे ज्याच्या पुढे कोणतेही रेल्वे रूळ नाहीत. ट्रेन टर्मिनलवर येते आणि नंतर जिथून निघाली होती त्याच ठिकाणाहून पुढे जाते. सध्या आपल्या देशात २७ टर्मिनल आहेत.

ग्रामीण भागात किती वेळ लोडशेडींगला कायदेशीर परवानगी आहे? यासंबंधित तुम्ही कुठे आणि कशी तक्रार नोंदवू शकता? जाणून घ्या

स्टेशन्स म्हणजे नेमके काय आहे?

आपण जिथून ट्रेन पकडतो त्या सर्व स्थानकांना स्टेशन असे म्हणतो. रेल्वे स्टेशन्स मध्यवर्ती, जंक्शन आणि टर्मिनसवरील स्थानकांपेक्षा लहान असतात. ती लहान शहरांना रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रदान करतात. शिवाय, जी रेल्वे स्थानके मध्यवर्ती, जंक्शन किंवा टर्मिनल नसतात, त्यांनाही रेल्वे स्थानके म्हटले जाते. स्थानके लहान असल्यामुळे, गाड्यांना तिथे थांबायला जास्त वेळ मिळत नाही. इथे अगदी काही मिनिट्ससाठी ट्रेन थांबते आणि लोक त्यात बसून निघून जातात.

 

Web Title: Railway station vs junction vs central vs terminus understand the difference in simple terms indian railways

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • central railway
  • History
  • Indian Railway

संबंधित बातम्या

भारतीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; 10 सप्टेंबरपासून ‘या’ मार्गावर 36 दिवसांचा असणार ब्लॉक, अनेक गाड्या होणार रद्द
1

भारतीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; 10 सप्टेंबरपासून ‘या’ मार्गावर 36 दिवसांचा असणार ब्लॉक, अनेक गाड्या होणार रद्द

CSMT Sawantwadi Express: चला, कोकण आपलाच असा…! गणेशोत्सवात कोकणवासीयांना रेल्वेची भेट; CSMT-सावंतवाडी एक्स्प्रेसचा आज शुभारंभ
2

CSMT Sawantwadi Express: चला, कोकण आपलाच असा…! गणेशोत्सवात कोकणवासीयांना रेल्वेची भेट; CSMT-सावंतवाडी एक्स्प्रेसचा आज शुभारंभ

Heritage Conservation: ऐतिहासिक इमारत पाडण्याचा निर्णय तूर्तास स्थगित; वारसा वास्तूच्या संरक्षणासाठी राजकीय नेत्यांचा विरोध
3

Heritage Conservation: ऐतिहासिक इमारत पाडण्याचा निर्णय तूर्तास स्थगित; वारसा वास्तूच्या संरक्षणासाठी राजकीय नेत्यांचा विरोध

आता खासगी कंपन्या ट्रेन चालवणार; 40 टक्केच असणार भारतीय रेल्वेचा हिस्सा
4

आता खासगी कंपन्या ट्रेन चालवणार; 40 टक्केच असणार भारतीय रेल्वेचा हिस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.